शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शीतलदेवींचा असाही ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’

By राजा माने | Updated: March 7, 2018 00:32 IST

‘वंशाचा दिवा’ मुलगीही ठरू शकते, हा विचार ग्रामीण भागात रुजल्याशिवाय मुलींचा जन्मदर वाढणार नाही. त्यासाठी प्रबोधनाबरोबरच औषधोपचारापासून शैक्षणिक सवलतीपर्यंतचे उपक्रम यशस्वी झाले. शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ ग्रामीण महाराष्ट्राला या चळवळीत नवी दिशा देऊ शकतो.

आज देशभर बेटी बचाव आणि महिलांना सर्वार्थाने सशक्त बनविण्याची चळवळ गतिमान होताना दिसते. चळवळ करणाºया संस्था आणि त्यात क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसते. पण महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि मुलींच्या जन्मदराबाबत समाजात असलेली उदासिनता मात्र म्हणाव्या तशा गतीने कमी होताना दिसत नाही. त्याच उदासिनतेला हद्दपार करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न चालल्याचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे मिळते. जिल्हा परिषद सदस्या सौ.शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्टÑापुढे महिला सबलीकरणाचा नवा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ ठेवला आहे.केवळ शासकीय योजनांवर अवलंबून राहून मुलींचा जन्मदर वाढणार नाही. त्यासाठी सर्वच स्तरातील महिलांना प्रबोधनाबरोबरच सवलत सुविधाही द्याव्या लागतील याची जाणीव शीतलदेवी यांना झाली. या जाणिवेतून मुलगी हाच आपल्या कुटुंबाच्या वंशाचा दिवा ठरू शकते हा विचार रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या उपक्रमांना एका छताखाली आणून केला. डॉटर्स मॉम, शिवरत्न फाऊंडेशन, शिवरत्न नॉलेज सिटी आणि माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांच्या परिश्रमाला एकत्रित बळ देण्याचे काम त्यांनी केले. गर्भजल चाचणीसारखा गुन्हा ज्यावेळी अकलूजसारख्या गावात घडला, त्यावेळी त्यांनी त्या प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन उभे केले. अशा प्रवृत्तींना केवळ वेळोवेळी विरोध करून भागणार नाही तर ग्रामीण भागातील कुटुंबांमध्येच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे; या भावनेने त्यांनी महिला आणि मुलींच्या आरोग्यावर विशेष काम करण्याचा निर्णय घेतला. वेळीच औषधोपचार न झाल्याने अथवा औषधोपचारासाठी पैसा नसल्याने महिलांच्या होणाºया हेळसांडीवर उपाय करण्यासाठी संघटन उभे केले. माळशिरस तालुक्यातील तब्बल ५४७ डॉक्टर्सशी संपर्क साधून त्यांना नारीशक्ती सबलीकरण चळवळीत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या या डॉक्टर्सनी महिलांना आजारपणात औषधोपचार खर्चात विशेष सूट देण्यास प्रसंगी मोफत औषधोपचार करण्यास सुरुवात केली. ही सुरुवात पाहता पाहता चळवळीत रुपांतरित झाली. त्याचाच परिणाम म्हणून ज्यावेळी २०१७-१८ या वर्षात महिलांच्या उपचारावर झालेल्या खर्चाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी या वर्षभरात डॉक्टर्सनी दिलेल्या योगदानामुळे ४ कोटी ८७ लाख रुपये एवढ्या खर्चाची बचत झाल्याचे सिद्ध झाले.ऊर्मिलादेवी शिष्यवृत्ती योजना, मिशन राजकुँवर, लेक वाचवा-लेक शिकवा यासारख्या योजनांचे काटेकोरपणे आयोजन करीत असतानाच परिसरातील मंगळवेढा, अक्कलकोट, सदाशिवनगर, मुस्ती, माळेवाडी येथील केवळ मुली असलेल्या १६०० कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. मेळावे, चर्चासत्र, पदयात्रा यासारख्या जनजागृती मोहिमा घेत असताना मुलींसाठी शिक्षण क्षेत्रात सवलती देणाºया योजनाही त्यांनी सुरू केल्या. आज आपल्या देशाचे सहा वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण १००० मुलांमागे ८९४ मुली एवढे आहे. देशपातळीवरही ते प्रमाण ९९४ एवढे आहे. ही विषमत: दूर करण्याचा प्रयत्न सौ.शीतलदेवी मोहिते-पाटील यांचा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ करतो आहे. 

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र