शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सेकंड ओपिनिअन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:58 AM

बऱ्याचदा उपचार सुरू असताना पेशंट रुग्णालयात अ‍ॅडमिट असतो व सेकंड ओपिनिअन घेण्याची रुग्णांच्या नातेवाइकांची इच्छा असते. अशा वेळेला सेकंड ओपिनिअनसाठी रुग्णाला हलवणे त्रासदायक ठरते. त्या वेळी रुग्णालयाच्या व मूळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या परवानगीने रिपोर्ट्स व पेपर्सचे झेरॉक्स सेकंड ओपिनिअन देणाऱ्या डॉक्टरला दाखवू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते 

उपचार घेत असताना आपल्याला दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा वाटणे, हे साहजिकच आहे व त्यात वावगे काही नाही. डॉक्टर व रुग्ण दोघांनी सेकंड ओपिनिअनबद्दल खुला दृष्टिकोन बाळगणे उपचारांच्या दृष्टीने गरजेचे असते; पण सेकंड ओपिनिअन असे घ्यावे की, मूळ उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचा विश्वास कायम राहील व त्यांच्याशी असलेल्या नात्याला तडा जाणार नाही. यासाठी सेकंड ओपिनिअन घेण्याआधी आपली शंका संबंधित डॉक्टरना विचारावी. बºयाचदा दुसरा डॉक्टरही कमी-जास्त फरकाने तोच सल्ला देण्याची शक्यता असते, म्हणून आपल्या मूळ डॉक्टरकडून समाधान न झाल्यासच सेकंड ओपिनिअनचा विचार करावा. सेकंड ओपिनिअन घेताना शक्यतो ते कोणाकडून घ्यावे, त्याचे नाव आपण उपचार करत असलेल्या डॉक्टरलाच विचारावे. सेकंड ओपिनिअन घेण्याचे नक्की झाल्यावर मूळ उपचार करत असलेल्या डॉक्टरला असे सांगावे की, आमचा तुमच्या उपचारांवर पूर्ण विश्वास आहे व आम्ही उपचार तुमच्याकडेच सुरू ठेवणार आहोत. केवळ आमच्या मानसिक समाधानासाठी आमच्या ओळखीच्या डॉक्टरचे आम्ही सेकंड ओपिनिअन घेऊ इच्छितो. ज्याच्याकडून आपण सेकंड ओपिनिअन घेणार आहोत, त्याची डीग्री ही उपचार घेत असलेल्या डॉक्टरांच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा उच्च असावी, याची काळजी घ्यावी. तसेच आतापर्यंत काय उपचार सुरू होते हे एका पत्राच्या स्वरूपात डॉक्टरांकडून लिहून घ्यावे व ते सेकंड ओपिनिअन देत असलेल्या डॉक्टरना दाखवावे. अनेक वेळा आपल्याला असा अनुभव येईल की, दुसरा डॉक्टरही मूळ उपचार करत असलेल्या डॉक्टरचाच सल्ला देऊन ते उपचार सुरू ठेवण्यास सांगेल. अशा वेळी आपल्या मूळ डॉक्टरला त्याची माहिती देऊन मूळ उपचार सुरू ठेवावेत. यदाकदाचित त्या सल्ल्यामध्ये तफावत आढळून आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण वैद्यकीय शास्त्रामध्ये एकाच आजाराच्या उपचारांवर अनेक मतप्रवाह असू शकतात. अशा वेळी बºयाचदा दोन्ही वेगळ्या पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर हे आपापल्या जागी बरोबर असतात.अशा वेळी सर्वप्रथम शक्य झाल्यास दोन्ही डॉक्टरचे बोलणे करून द्यावे. सेकंड ओपिनिअन प्रमाणे उपचार घेतल्यास काय फायदा होईल, याची चर्चा दुसºया सेकंड ओपिनिअन दिलेल्या डॉक्टरशी करावी. त्यानंतर उपचार कुठे करायचे हे आपल्याला कुठल्या डॉक्टरांच्या सल्ल्याबद्दल जास्त विश्वासार्हता वाटते, यावर ठरवावे. वेगळे सेकंड ओपिनिअन आढळल्यास कधीही परत जाऊन आपल्या मूळ डॉक्टरांशी वाद घालू नये. तसेच ज्या डॉक्टरांकडे सेकंड ओपिनिअन घ्यायला जातो तो पहिल्या डॉक्टरांविषयी वैयक्तिक टीका करत असेल, ते चांगले लक्षण नाही. अशा डॉक्टरांचे सेकंड ओपिनिअन न घेतलेलेच बरे. बºयाच रुग्णांचे सेकंड ओपिनिअन सारखे निघाल्यावरही समाधान होत नाही व त्यापुढे जाऊन ते थर्ड व फोर्थ ओपिनिअनही घेतात, हे मात्र चांगले लक्षण नाही. शक्यतो दोन डॉक्टरांनी सारखाच सल्ला दिल्यास इतर डॉक्टरही तोच सल्ला देण्याची शक्यता असते. तसेच दर वेळी छोट्या छोट्या गोष्टींकरिता सेकंड ओपिनिअन घेणेही योग्य नाही. कारण बरे होण्यासाठी उपचारांबरोबरच आपला डॉक्टरांवर असलेला विश्वासही काम करत असतो.बºयाचदा उपचार सुरू असताना पेशंट रुग्णालयात अ‍ॅडमिट असतो व सेकंड ओपिनिअन घेण्याची रुग्णांच्या नातेवाइकांची इच्छा असते. अशा वेळेला सेकंड ओपिनिअनसाठी रुग्णाला हलवणे त्रासदायक ठरते. त्या वेळी रुग्णालयाच्या व मूळ उपचार करणाºया डॉक्टरांच्या परवानगीने रिपोर्ट्स व पेपर्सचे झेरॉक्स सेकंड ओपिनिअन देणाºया डॉक्टरला दाखवू शकता व त्याच्या परिस्थितीवरून मूळ उपचार करणाºया डॉक्टरशी फोनवर बोलणे करून देऊ शकता. अशाप्रकारे सेकंड ओपिनिअन असे घ्यावे की ते उपचारांना पूरक ठरावे, मारक नाही. 

टॅग्स :doctorडॉक्टर