शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शोध श्रीखंड्याचा

By admin | Updated: March 30, 2016 03:00 IST

जनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच

- सुधीर महाजनजनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख आहे. संतपरंपरेतील एकनाथांकडेच व्यवहारचातुर्य, तसेच प्रशासनाचे कसब होते. शिवाय सर्वांठायी ईश्वर पाहून त्यांनी सामाजिक उत्थानाचा प्रयत्नही त्यांनी इतर संतांप्रमाणे वारंवार केला. ते गाढवाला गंगाजल पाजणे असो, की पितरांच्या श्राद्धात अस्पृश्यांना बोलावणे. माणसाप्रती प्रेम आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा यामुळेच श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने नाथांच्या घरी घरगडी म्हणून राहिला. पडेल ती कामे केली. ज्याक्षणी याचा साक्षात्कार नाथांना झाला, त्यावेळी त्यांना दु:ख झाले ते श्रीकृष्णाला कष्टाची कामे करावी लागली याचे. पुढे नाथांच्या निर्वाणानंतर गावातील नाथांच्या वाड्यातील रांजण नाथषष्ठीला भरण्याची परंपरा सुरू झाली. तुकाराम बीजेपासून हा रांजण भरण्यास सुरुवात होते आणि नाथषष्ठीला तो भरतो. त्यासाठी शेकडो लोक गोदावरीतून पाणी आणतात. ज्याच्या घागरीने तो भरतो त्याला श्रीखंड्याचा मान मिळतो. त्याचा सत्कार केला जातो. त्याच्या ठायी वारकरी श्रीकृष्णाला पाहतात.याही वर्षी नाथषष्ठीचा सोहळा झाला. नाथांचा रांजण भरला. औरंगाबादच्या श्रीराम कुलकर्ण्यांना श्रीखंड्याचा मान मिळाला; पण तो भरण्यासाठी वारकऱ्यांना आटापिटा करावा लागला. याचे कारण गोदावरी कोरडीठाक पडली आहे. जायकवाडीसारखे धरण अगदी काखेला असताना नाथांच्या पैठणमध्ये ही परिस्थिती. रणरणत्या उन्हात वारकऱ्यांची एक प्रकारे घेतलेली परीक्षाच होती, असे म्हणायला हरकत नाही. नाथांच्या काळात गोदावरीला महामूर पाणी होते. म्हणून श्रीखंड्यापुढे पाणी शोधण्याचा प्रश्न नव्हता; पण आज तो प्रश्न पडला. पाण्याअभावी रांजण भरतानाच त्रास झाला नाही, तर संपूर्ण यात्रेवरच या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे सावट पडले आहे. एकनाथ आणि श्रीखंड्या हे भक्त आणि भगवंत यांच्या नात्याचे एक सुंदर उदाहरण आहे. मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईने घेरले आहे. ११ पैकी ७ मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. जायकवाडी आणि माजलगाव धरणात मृत साठा उरला आहे. येलदरीमध्ये ५/६ टक्के पाणी आहे. ७३५ मध्यम व लघुप्रकल्पांपैकी ६० टक्के धरणे कोरडीठाक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढणार. सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी १६०० टँकर धावतात. मेमध्ये हा आकडा २५०० वर पोहोचू शकतो.टँकर काय वाढविता येतील; पण ते भरण्यासाठी पाणी असायला हवे. टंचाई निवारणासाठी सरकारने साडेतीनशे कोटींची तरतूद केली. पाण्यासारखा पैसा वाहणार; पण पाणी मिळणार नाही, ही अवस्था आहे. गेल्या दोन महिन्यात पाण्यासाठी ३१ जणाना जीव गमवावा लागला. लातूर शहराची अवस्था बिकट आहे. पाण्यावरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून १४४ कलम लावले. याचा अर्थ पाणी येथे स्फोटक बनले आहे. लोकानी पाण्याचे टँकर लुटू नयेत, पाणी मिळविण्यासाठी जमाव बेभान होऊ नये यासाठी सरकारलासुद्धा या पातळीवर उपाय योजावे लागले यावरून परिस्थिती किती नाजूक आहे याचा अंदाज येतो. लातूर हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. या शहरात शिक्षणासाठी लाख-सव्वा लाख विद्यार्थी आलेले आहेत. त्यांनासुद्धा येथे थांबता येणार नाही अशी स्थिती आहे. पाण्यासाठी यापेक्षा आणखी कोणती परिस्थिती निर्माण होणार?नाथांचा रांजण भरण्यासाठी श्रीखंड्याच्या रूपात प्रत्यक्ष भगवंत आला होता. नाथ हे सामान्य माणसाचे प्रतीक समजले तर आज राज्यकर्त्यांना श्रीखंड्या समजावे लागेल. कारण या श्रीखंड्यांच्या सत्तेचा आधार जनतेची सेवाच असतो आणि आता श्रीखंड्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व श्रीखंडे कोरडा पडलेला जनतेचा रांजण कसा भरणार? कारण या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख. या जनतेच्या रांजणाला श्रीखंड्या खरंच मिळणार का?