शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधील चकमकीचा देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 04:20 IST

योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे, असे भासविले जाते. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांतील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते.

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलीस चकमकीत झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करणारा असला, तरी उत्तर प्रदेशपोलिसांना त्याची फिकीर नाही, असे त्यांच्या वर्तनावरून दिसते. विकास दुबे याने पोलिसांच्या गाडीतून पळताना पोलिसांचे पिस्तूल हस्तगत करून हल्ला केला व त्या वेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असे पोलीस सांगतात. पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याने विकासला पळण्याची संधी मिळाली, असेही सांगितले जात आहे. रस्त्यावर उलटलेली पोलिसांची गाडी सर्वांनी पाहिली. तरीही अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि हे प्रश्न विकास दुबेच्या बचावासाठी नसून, पोलिसांचा खुलासा व घटनाक्रमावर आहेत.मुळात विकास दुबे याला उज्जैन येथे अटक झाली की तो शरण आला, इथंपासून संशयाला सुरुवात होते. उज्जैनमधील महाकाल मंदिरातील सुरक्षारक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने स्वत:हून नाव जाहीर केले. पोलिसांचा ससेमिरा चुकविणारी व्यक्ती असे नाव जाहीर करीत नाही. याचा अर्थ तो पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत होता. शरण येणारी व्यक्ती पोलिसांवर हल्ला करील हे संभवत नाही. ज्या गाडीतून त्याला कानपूरला नेण्यात आले, त्याच गाडीला अपघात झाला की दुसऱ्या गाडीला याबाबतही संशय आहे. शिवाय बेड्या घातलेल्या विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल हस्तगत केले कसे? एका पायाने लंगडणारा दुबे सुमारे अर्धा किलोमीटर पळाला कसा? विकास दुबेला घेऊन येणा-या गाड्यांच्या मागे असणाºया पत्रकारांच्या गाड्यांना टोलनाक्यावर का रोखले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चकमकीचा जो बनाव पोलिसांनी उभा केला आहे तो हास्यास्पद आहे. तथापि, त्याहून चिंताजनक बाब म्हणजे माध्यमांचे बारीक लक्ष असूनही अशी चकमक करण्यास पोलीस धजावले. पोलिसांच्या निर्ढावलेपणाचे हे उदाहरण आहे. गेल्या तीन दशकांत देशात अनेक चकमकी झाल्या. त्यातील खºया किती व बनाव किती, हे निर्विवादपणे कधीच बाहेर आले नाही. परंतु, दुबेला चकमकीत ठार मारले जाईल, असे जाहीरपणे बोलले जात असतानाआणि दुबेच्या मागोमाग माध्यमांचे कॅमेरे असताना ही चकमक घडली किंवा घडवून आणली गेली, ही बाब केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर देशासाठी चिंताजनक आहे. कानपूरच्या रस्त्यावर दुबेची गाडी उलटवून योगी आदित्यनाथ यांनी आपले सरकार उलटण्यापासून वाचविले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्याच्या घटनेपुरती ती बरोबर असली तरी अखिलेश, मायावती यांची आधीची सरकारे धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नव्हती. दुबेच्या कुटुंबीयांचे राजकारणातील संवर्धन अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने केले. भाजपच्या राज्यमंत्र्यांवर पोलीस ठाण्यातच खुनी हल्ला करण्याचे धाडस दुबेने वीस वर्षांपूर्वी दाखविले ते सर्वपक्षीय राजकीय संरक्षणाच्या जोरावर. कानपूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २०० पोलीस दुबेचे खबरे होते असे म्हणतात. दुबेच्या घरावर धाड टाकताना दुबेने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या अधिकाºयाने दोन महिन्यांपूर्वीच वरिष्ठांना पत्र लिहून दुबेने पसरविलेल्या जाळ्याची माहिती दिली होती. दुबे याला सर्वपक्षीय पाठिंबा होता आणि तो त्याने एका व्हिडिओत उघडही केला होता. त्याची रीतसर चौकशी झाली असती, तर दुबेचे अनेक लागेबांधे उघड झाले असते. तसे होऊ न देण्यात उत्तर प्रदेशातील भ्रष्ट यंत्रणा या चकमकीतून यशस्वी ठरली.
योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे असे भासविले जाते. असा नायनाट करण्यामागे उद्देश काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते. योगींचा उद्देश साफ असेल तर दुबेला मदत करणाºया भ्रष्ट यंत्रणेतील सर्व म्होरके त्यांनी शोधून काढावेत आणि त्यांना न्यायालयात हजर करावे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता योगींनी हे काम केले, तर त्यांच्या उद्देशाबद्दल खात्री पटेल.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस