शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 4:22 AM

अजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे.

- सुधीर महाजनअजिंठा, भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण), सिन्नर, नाणेघाट ते नालासोपारा. सातवाहनांच्या काळातील हा आंतरराष्ट्रीय मार्ग, या मार्गाने रेशमी वस्त्रे, सोने, दागिने आदींचा व्यापार परदेशाशी होत असे. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून भोगवर्धन, प्रतिष्ठान आणि तगर ही नगरे प्रसिद्ध होती. आताच्या भाषेत आंतरराष्टÑीय व्यापार केंद्रे होती आणि हा मार्ग म्हणजे ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडॉर’ होता.आज मराठवाड्यातून राजधानी मुंबईकडे जाणारे रस्ते व इतर राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मराठवाड्याला इतर राज्यांशी जोडणारे सगळेच रस्ते हे केवळ दोन पदरी आहेत. नांदेडहून हैदराबादकडे जायचे किंवा औरंगाबादहून इंदूरला जायचे म्हटले तरी रस्ते दोन पदरीच. पुण्याकडे जाणारा एकमेव चौपदरी रस्ता आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी; पण येथून मुंबईला जाण्यासाठी वैजापूर, येवला, नाशिक हा मार्ग किंवा शिर्डी, सिन्नर, ढोकी हा मार्ग हे दोन्ही खडतर, दोन पदरी, खड्डेमय आणि प्रवाशांची परीक्षा पाहणारे आहेत. तिसरा समृद्धी महामार्ग हा अजून कागदावरच आहे. नांदेड किंवा बीडहून मुंबईला जायचे म्हटले तरी औरंगाबादहूनच जावे लागते. बीड-औरंगाबाद राष्टÑीय महामार्ग क्र. २११ चे काम धिम्यागतीने चालू आहे. या मराठवाड्याचा राजधानी मुंबईशी थेट संपर्क सुलभ नाही. ही प्रमुख मार्गांची अवस्था आहे. मराठवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट. रस्ते हे जीवनवाहक असतात. ते चांगले असतील तर व्यापार-उदीम वाढतो; पण ही लाइफलाइनच खराब असल्याने बाजारपेठा भरभराटीला येत नाहीत.रेल्वेचा विचार केला, तर औरंगाबाद-नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी केवळ चार रेल्वेगाड्या. त्यांच्या वेळाही फारशा सोयीच्या नाहीत. रेल्वे डब्यांची अवस्था त्याहूनही वाईट. दिल्लीला जाण्यासाठी एकच रेल्वे. एवढ्या तुटपुंज्या रेल्वेसेवेने विकासाला कोणता हातभार लागणार? सोलापूर-जळगाव हा मार्ग घोषणेपलीकडे सरकला नाही. अहमदनगर-परळी हा मार्ग कधी पूर्ण होणार? याविषयीच्या घोषणांची आणि आश्वासनांची लांबीच या मार्गापेक्षा मोठी असेल. अशी ही रेल्वेसेवा. तिचा मराठवाड्याच्या विकासाला उपयोग तो किती?औरंगाबाहून विमानसेवा बºयाच वर्षांपासून पर्यटनस्थळ या अर्थाने परदेशी पर्यटकांसाठी ही सेवा होती. पुढे उद्योग आल्यानंतर त्यात वाढ झाली; परंतु आता मुंबईसाठी ३, तर दिल्लीसाठी दोनच विमाने आहेत. जयपूरसेवा बंद आहे. हैदराबादची सेवा विस्कळीत झाली आहे. शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्यामुळे त्याचा परिणाम औरंगाबादवर झाला. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. हे सगळे रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग विकासाचे मार्ग असतात. त्यांचा विकास व वृद्धी हाच भरभराटीचा मार्ग असतो; परंतु याच मार्गांवर सगळे अडथळे निर्माण झाले आहेत. दळणवळणाची अद्ययावत साधनेच विकास आणतात. सध्या मंत्रालयात मुंबई-पुणे कॅप्सूलसेवेची जोरदार चर्चा आहे. वर्षभरात हे अंतर केवळ २८ मिनिटांत गाठता येईल. याचे पॉवर पॉइंट दाखविले जाते. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ही दोन शहरे उपनगरांइतक्या अंतरावर आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे; पण त्याचवेळी राज्याच्या इतर भागांकडे किती काळ दुर्लक्ष करणार? मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग खडतर आहे, हे विसरता येत नाही.(संपादक, लोकमत औरंगाबाद)

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा