शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात; निष्क्रिय यंत्रणेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:28 IST

२०२० पर्यंत सरकारला बरेच काही करायचे आहे़ त्यात अपघातातील हानी ५० टक्क्यांवर कमी करायची आहे़ जे प्रत्यक्षात जवळपासही दिसत नाही़

- धर्मराज हल्लाळेनिवडणुका २०१९ मध्ये असल्या तरी केंद्रातील विद्यमान सरकार २०२० पर्यंत बरेच काही करू शकते, असे त्यांच्या घोषणा सांगतात़ त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा ९ जून २०१६ रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली़ देशात रस्ते अपघातामध्ये मोठी जीवितहानी होते़ जवळपास वर्षाला ५ लाख अपघात होतात़ त्यात १ लाख ८० हजार लोक मृत्युमुखी पडतात़ ज्यामध्ये १८ ते ४५ या वयोगटातील ६९ टक्के नागरिकांचा बळी जातो़गेल्या अनेक वर्षातील आकडेवारीचे विश्लेषण केले तर वर्षाला अपघात अन् मृत्यूंची संख्या वाढली आहे़ वाहनांच्या अमर्याद वेगामुळे ६१ टक्के अपघात होतात़ ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलचा वापर अशी वेगवेगळी कारणे अलीकडे दिसत आहेत़ त्यावर दंडात्मक वाढ तसेच कायदेशीर कारवाई कठोरपणे करण्याचा निर्णय केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी घेतला, ही बाब स्वागतार्ह आहे़ काही कालावधी उलटल्यानंतर त्याचे चांगले परिणामही समोर येतील़ जानेवारी ते जून २०१६ मध्ये महाराष्ट्रात २१ हजार ३६५ अपघात झाले़ तर उपरोक्त कालावधीत २०१७ मध्ये अपघातांची संख्या १८ हजार ७३० वर आली आहे़ त्यामुळे ५० टक्क्यांनी अपघात कमी होण्याची घोषणा पूर्णत: सफल होणे जवळपास दिसत नाही़ तरीही काहीशी संख्या घटली हे मान्य करावे लागेल़ मात्र हा बदल राष्ट्रीय महामार्ग, विशेषत: मोठ्या शहरांना जोडणा-या महामार्गावरील नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे आहे़ गेल्या तीन-चार वर्षांत नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात उलट दिवसेंदिवस वाढत आहेत़ रत्नागिरी ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सोलापूर - लातूर ते नांदेड यादरम्यान अधिक धोकादायक बनला आहे़ मराठवाड्यातील सर्वाधिक अपघात होणारा रस्ता अशी त्याची ख्याती आहे़ राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर काही भागात रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले़ परंतु, अरुंद रस्ता, साईडपट्ट्या न भरलेल्या, वाहनांचा अमर्याद वेग आणि बेमुर्वतपणे वाहन चालविणारे चालक या सर्वांचा परिणाम म्हणून लातूर-नांदेड या १३५ किलोमीटर अंतरात वर्षाला बळींचा आकडा शतक पार करतो़ गेल्या पंधरवड्यात लातूर जिल्ह्यात १७ जणांनी प्राण गमावले़नव्याने घोषित झालेले राष्ट्रीय महामार्ग धोकादायक आहेतच, त्यात राज्य महामार्ग तर मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सर्वात सुरक्षित समजल्या जाणाºया एसटीचा प्रवासही धडकी भरविणारा ठरत आहे़ देशात दिवसाला चारशेच्या वर लोक अपघाताचे बळी ठरतात़ त्यात महाराष्ट्र दुसºया स्थानावर असून, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येनंतर मृत्यूचे सर्वात मोठे कारण अपघात आहे़ महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिसांचे संख्याबळ कमी पडते़ कारवाई करणाºया पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्याइतपत धारिष्ट्य काही प्रसंगांमध्ये दिसले आहे़ दंडात्मक कारवाई वाढली आहे़ महाराष्ट्र महामार्ग सुरक्षा विभागाने जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत ७४ कोटींचा दंड वसूल केला आहे़ तरीही सेव्ह लाईफ फाऊंडेशन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे़ तरुण, कर्तबगार नागरिक रस्त्यावरचे बळी ठरत आहेत़ महानगरांना जोडणाºया महामार्गांवरील अपघातातील बळींचे जितके मोल तितकेच जिल्ह्यांना जोडणा-या रस्त्यावरील मनुष्य हानीचे मोल निष्क्रिय यंत्रणा करणार आहे की नाही, हा सवाल आहे़

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गGovernmentसरकार