शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

देशाचे अवकाशभान उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 2:42 AM

१४ नोव्हेंबरचा बालदिन इस्त्रो अर्थात, भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी बाल्यावस्थेपेक्षा तारुण्यातील एक आणखी सळसळता दिवस होता, असे म्हणायला हवे.

- शैलेश माळोदे(विज्ञान पत्रकार आणि लेखक)१४ नोव्हेंबरचा बालदिन इस्त्रो अर्थात, भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी बाल्यावस्थेपेक्षा तारुण्यातील एक आणखी सळसळता दिवस होता, असे म्हणायला हवे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ‘युवा’ भारत त्याच्या ६५ टक्क्यांपेक्षा अधिक युवा लोकसंख्येसह इस्त्रोच्या माध्यमातून आंतरराष्टÑीय अवकाश बाजारपेठेत अमेरिका आणि चीनचे आव्हान केवळ पेलविण्यास नव्हे, तर परतवून पुढे मुसंडी मारण्यास सज्ज झालाय. हे जी सॅट-२१ या सुमारे साडेतीन टनी संचार उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केल्यामुळे दिसून येतेय.जीसॅट २९ हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले प्रक्षेपण यान जीएसएलव्ही मॅक ३ ने यशस्वीरीत्या उपग्रह भूस्थिर कक्षेत पोचवून दाखवून दिलेय की, आता विकसनशील देशांनाच नव्हे, तर विकसित राष्टÑांनाही त्यांचे वजनदार उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी भारताच्या इस्त्रोसारखा अत्यंत उत्तम आॅप्शन आता उपलब्ध आहे. क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात अमेरिकेने घातलेला खोडा आणि त्यामुळे निर्माण झालेले अडथळे या दोन्हींवर डोळसपणे मात करीत, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी पुढील दोन महिन्यांमधील जवळपास दहा अवकाश प्रक्षेपण मोहिमांसाठी सुसज्ज झाल्याचे स्पष्ट मत व्यक्त केलेय. इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. शिवन यांनी आता जीएसएलव्ही मॅक ३ पूर्णपणे कार्यान्वित असल्याचे ठासून सांगितले आणि पुढच्या दोन महिन्यांमधील सगळी ‘हेक्टिक शेड्यूल’ चीही आठवण करून दिली.जी सॅट-२९ या संचार उपग्रहावरील ट्रान्सपॉन्डर्समुळे जम्मू आणि काश्मीर, तसेच ईशान्य भारतांमधील दूरसंचार आणि डेटाविषयक अनेक समस्या सुटण्यास मदत तर होईलच, पण त्याचबरोबर अगदी ग्रामस्तरावरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनियोग आणि व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने करण्याची क्षमता विकसित करता येईल. भूस्थिर कक्षेत उपग्रह प्रक्षेपित केल्यामुळे संचार सुविधांचा विचार करून विकासमार्गावर घोडदौड करता येते. या भूस्थिर उपग्रहाची कल्पना सर्वप्रथम आर्थर सी क्लार्क या विज्ञान लेखकाने सर्वप्रथम एका विज्ञान कथेतून मांडली, पण ती प्रत्यक्षात उतरल्यामुळेच आज भारतासहित अनेक देश मोबाइल आणि संचार क्रांतीची फळे चाखताना दिसत आहेत. भविष्यामध्येच नव्हे, तर आताच ‘डेटा कल्चर’ची अनुभूती आपले संपूर्ण जीवन व्यापत असतानाच, स्पर्धात्मक आयुष्यात अनेक नवी आव्हाने निर्माण करताना दिसत आहे. अशा काळात जी सॅट-२९ मुळे भारत आपले स्वत:चे अस्तित्व मान वर राखत टिकवू शकेलच, पण इतरांनाही उपयोगी ठरेल.आज अवकाश बाजारपेठ अत्यंत गुंतागुंतीची बनत आहेच, पण त्याचबरोबर वेगाने वाढत आहे. डिजिटल डिव्हाइड दूर करण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच, ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारण्यासाठी भारताला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने मुसंडी मारावीच लागेल. जी सॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण २०१८ संपूण्यापूर्वीच फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण केंद्रातून एरियानद्वारे करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरच्या वर्षात ‘वजनदार’ प्रक्षेपणानंतर भारत आता अशा प्रक्षेपण सुविधांचा पुरवठादार देश बनलाय. २०१४ मधील जीएसएलव्ही मॅक ३ चे प्रायोगिक उड्डाण याची प्रथम पायरी असल्याचे प्रस्तुत लेखकाने म्हटले होते, याची आठवण होते. जी सॅट-२ हा भूस्थिर उपग्रह ५,७२५ किग्रॅ वजनाचा आणि ४० ट्रान्सपॉन्डर्स असलेला असणार आहे, हे सर्व के यू आणि का बॅन्डमधील असणार आहेत. ४ डिसेंबरला त्याचे प्रक्षेपण होणार आहे. तूर्त भारताच्या जीएसएलव्ही एरिआन प्रक्षेपण यान वापरले जाणार आहे.इस्त्रो या सरकारच्या संस्थेलाच ही सर्व जबाबदारी एकट्याने पार पाडणे शक्य होणार नाही आणि कालापव्ययदेखील खूप होईल हे लक्षात घेता, खासगी क्षेत्राला या कार्यात सामावून घेण्याचे सरकारचे धोरण फायदेशीर ठरत असल्याचे दिसते. म्हणूनच या मोहिमेतील जवळपास ९० अ‍ॅक्टिव्हिटी प्रक्षेपक यान आणि उपग्रह या दोहोंबाबत उद्योग क्षेत्रांनी निभावल्याचे डॉ. शिवन यांनी गौरवाने म्हटले. त्यांनी अत्यंत उत्तम यंत्रणा यासाठी पुरविल्या आहेत.जी सॅट-२९ आणि जी सॅट-११ दोहोमुळे, तसेच त्यानंतरच्या जी सॅट-२० मुळे संपूर्ण देशात उच्च गतीची इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होऊन नागरी आणि ग्रामीण भागांमधील दरी साधली जाईल. जीएसएलव्ही मॅक ३चे हे एक केवळ दुसरे यशस्वी प्रक्षेपण असल्यामुळे येत्या मोठ्या मोहिमांसाठी त्यांना या प्रकारच्या प्रक्षेपण यानांचा दर्जा उत्तम राखावा लागणार आहे. त्यासाठी अत्यंत कुशल आणि कुशाग्र मनुष्यबळ आवश्यक ठरणार आहे. आव्हाने अंगावर घेण्यास तयार असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी असेल. केवळ नासाकडे धाव घेण्याऐवजी देशातच इस्त्रोमार्फत अवकाशाला गवसणी घालण्याच्या अनेक सुवर्णसंधी आता खासगी आणि शासकीय क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. त्याद्वारेच इस्त्रो आणि भारताचा अवकाश पेठेतील यशस्वीतेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी साकारला जाईल, हे नक्की.

टॅग्स :isroइस्रो