- बी. व्ही. जोंधळेसामाजिक विषयांचे अभ्यासकमहात्मा जोतीराव फुले यांनी १८८३ साली ‘शेतकºयाचा असूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे दैन्य प्रथमच जगाच्या वेशीवर टांगले. त्यांनी या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेचे जे दाहक वर्णन केले आहे त्या शेतकºयांच्या दैन्यावस्थेत आजही फारसा फरक पडलेला नाही. शेतकºयांना दररोज आत्महत्या कराव्या लागत आहेत. वस्तुत: म. फुले हे कुणी अर्थशास्त्रज्ञ नव्हते. त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांची शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली आहे, असेही नव्हे. पण येथील जातीय नि वर्गीय व्यवस्थेमुळे शेतकºयांचे जे अमानुष शोषण होत आले त्याची पहिली जाण ही जोतीरावांनाच झाली आणि ती त्यांनी रोखठोक लेखनातून प्रभावीपणे व्यक्त केली; म्हणूनच ‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथाचे महत्त्व आज १३६ वर्षांनंतर कायम आहे, हे विशेष!‘शेतकºयाचा असूड’ या ग्रंथात शेतकºयांच्या दुर्दशेची कारणमीमांसा करताना जोतीराव म्हणतात, ‘ब्राह्मण हे भूदेव आणि राजा हा ईश्वराचा अंश’ असल्यामुळे आपणावर काही अन्याय होतोय ही कल्पनाच येथील शेतकºयांच्या मनाला शिवली नाही. धर्म नि राज्यव्यवस्थेकडून होत आलेले शोषण म्हणजे आपल्या नशिबाचाच एक भाग आहे, असे समजून शेतकरी वागत आल्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले. शेतकºयांचे अज्ञान, त्यांचे अडाणीपण यामुळेही शेतकºयांची पिळवणूक होत आली, असे निरीक्षण नोंदवून जोतीराव म्हणतात, ‘शेतकºयांनी आपले अज्ञान, आळस, धर्मभोळेपणा, व्यसनाधीनता व गतानुगतिकतेचा त्याग केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही.’सावकार-अंमलदार शेतकºयांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना कसे लुबाडतात, याचे मर्मभेदी वर्णन करताना जोतीराव लिहितात, ‘शेतकºयाने स्टांप आणल्यानंतर कुलकर्णी वगैरे लोकांकडून त्याजमध्ये नाना प्रकारच्या अटी लिहून घ्याव्या आणि त्याजवर त्याची वा त्याच्या भाऊबंदाची किंवा मुलाची सही साक्ष घेऊन त्याच्या हातावर लिहिणावळीचा वगैरे खर्च कमी करून दहा-बारा रुपयांबद्दल नऊ-दहा रुपये ठेवावे. तो कागद लिहून त्यास काही दिवस लोटल्यावर त्याचे व्याज मुद्दल जरी त्यास मिळून चुकले तरी त्या व्याजाचे व्याज आणि पडव्याज जुळून त्याच्या मुलाच्या लग्नाकरिता थोडेसे पैसे देऊन त्याजबद्दल नवीन कागज लिहून घ्यावा. येणेप्रमाणे क्रम चालून तीन-चार वर्षांत सुमारे दोनशे-अडीचशे रक्कम फुगली म्हणजे सरकारात फिर्याद टाकून त्या खर्चासह तीनशे अथवा सव्वा तीनशे रुपयांचा हुकूमनामा काढून अन्नधान्य काढण्याच्या वेळी शेतीवर जप्ती बसवावी.’ जोतीरावांच्या काळात सावकार आणि अधिकाºयांच्या भ्रष्ट युतीमुळे शेतकºयांची जशी पिळवणूक नि फसवणूक होत असे तशी ती आजही होते म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे आपले दाहक समाजवास्तव.
आजच्या काळात ‘शेतकऱ्याचा असूड’ची प्रासंगिकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:02 IST