शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

श्वासापुरत्या(च) ऑक्सिजनचा  ‘पुणे प्रयोग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:00 IST

जम्बो कोविड सेंटरचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली.

देशभरात ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांचा आक्रोश चालू असताना पुण्यात ऑक्सिजन काटकसरीने वापरण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे, त्याबद्दल...दि.२० एप्रिल २०२१ पासून पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीओईपी जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. मागणी २३ टनांची आणि पुरवठा १३ टनांचा अशी स्थिती निर्माण झाली होती.  एक दिवस असा आला की ऑक्सिजन संपतो की काय? संपलाच तर ७०० रुग्णांचे करायचे काय? चिंतेचे ढग दाटून आले असताना एका अधिकाऱ्याची कल्पकता जागी झाली. सीसीटीव्ही मॉनिटरिंग रुममधून त्यांनी अनेक रुग्णांना ऑक्सिजन मास्क काढून मोबाईलवर गप्पा मारताना पाहिले होते. अनेकजण ऑक्सिजन न लावताही टॉयलेटला जाऊन येत होते. येथेच त्यांच्या डोक्यात चमकली ‘आयडियाची कल्पना.’ पुण्यातील या जम्बो रुग्णालयात एकूण ७०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ५४० खाटा, आयसीयूच्या ६९ खाटा तर एचडीयूच्या १०० खाटा आहेत. ऑक्सिजन बचतीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्यासोबतच पुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान निर्माण झाले.जम्बो कोविड सेंटरचे समन्वयक आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांची ऑक्सिजन बचतीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलून धरली. वैद्यकीय टीमच्या मदतीने सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ज्या रुग्णांना ० ते २ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्या रुग्णांना नेसल कॅन्यूला सिस्टीमवर घेण्यात आले. तर २ ते ६ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना सिंपल ऑक्सिजन मास्क लावण्यात आले. जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत आणि २४ तासांत कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे आढळून आले, अशा रुग्णांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेलमधील कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले.उर्वरित दर दोन-तीन रुग्णांच्या खाटांमध्ये एक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आला. रुग्णांबाबत, प्रत्येकी ३ ते ४ रुग्णांमागे १ वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करून १५ ते २० मिनिटांसाठी त्यांचा मास्क बाजूला काढून ऑक्सिजन पातळी ९४-९५ पर्यंत स्थिर राहील याचे नियोजन करण्यात आले. या कालावधीत त्यांच्यासाठी असलेला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. हा प्रयोग करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची सक्त देखरेख ठेवण्यात आली होती. प्रत्येक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा ‘’मॉनिटर’’ करण्यात येत होता. अनेकांना अवघा ३ ते ५ लिटर/मिनिट असा ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होत होता. या प्रक्रियेवर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. रात्रभर हा प्रयोग कोणत्याही रुग्णाला त्रास न होता सुरू होता. या प्रयोगामुळे एकाच रात्रीत तब्बल ८ टन ऑक्सिजन वाचला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या ऑक्सिजनची चिंता काही प्रमाणात कमी झाली. पुण्याच्या या कोविड सेंटरमध्ये २१ एप्रिल रोजी सुरू झालेला हा प्रयोग अद्याप सुरू आहे. यामध्ये रुग्णांनी मोठे सहकार्य केले. रुग्णांनाही प्रसाधनगृहात जाताना, जेवताना, आवश्यकता नसताना ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात येतात. यासाठी स्पीकरद्वारे सतत मार्गदर्शन केले जाते. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या गॅस पाईपलाईनची सतत तपासणी आणि गळती थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न उपयोगी ठरले.आता हाच प्रयोग विभागीय स्तरावर पश्चिम महाराष्ट्रात राबविण्याची हालचाल सुरू झाली आहे. आतापर्यंत एकट्या सीओईपी जम्बो कोविड सेंटरमध्ये जवळपास १३० टन ऑक्सिजनची बचत झाली आहे. दिवसाला जिथे २३ टन ऑक्सिजन लागायचा तिथे १५ टनाची मागणी आहे.ऑक्सिजन काळजीपूर्वक वापरण्याबद्दल रुग्णालयातील सर्व अधिप्रयोगकारी, कर्मचारी, नर्सेस व वॉर्डबॉय यांना दररोज प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रयोगासाठी कोणत्याही महागड्या तंत्रसामग्रीची गरज नाही. हवी ती चौकस दृष्टी आणि कामात प्रयोगशीलता आणून प्रश्नांवर तत्काळ उत्तरे शोधण्याची प्रवृत्ती! पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती  दाखवली आहे.- लक्ष्मण मोरे, वरिष्ठ वार्ताहर/उपसंपादक, लोकमत पुणे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस