शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

माल डागी असल्याने लासलगावात मुगाच्या दरात चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 5:35 AM

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव समितीमध्ये सध्या जुन्या मालाची आवक कमी झाली असून, नवीन मुगाची आवक सुरू आहे.

- संजय दुनबळे, नाशिकनाशिक जिल्ह्यातील लासलगाव समितीमध्ये सध्या जुन्या मालाची आवक कमी झाली असून, नवीन मुगाची आवक सुरू आहे. मुगाला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. बाजारात येणाऱ्या बहुतांश मुगाची प्रत फारशी चांगली नसल्याने भावामध्ये चढ उतार होत आहेत. सुमारे ७५ टक्के माल डागी असून, केवळ १० ते २० टक्के माल चांगला असतो, असे अडत व्यापाºयांनी सांगितले. सध्या गव्हाची आवक कमी असून, गव्हाला १९०० ते २२०० रुपये सरासरी २०४० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील सप्ताहात २३७ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावर्षी पाण्याची परिस्थिती फारशी चांगली नाही. यामुळे रबीत गव्हाचा पेरा कमी होण्याची चिन्हे आहेत.लासलगाव बाजारात सोयाबीनची आवक कमी असून, भाव काहीसे वाढले. मागील सप्ताहात सोयाबीनला ३३०० ते ३४२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. सोयाबीनची नवी आवक पुढील महिन्यात येण्याची अपेक्षा असली तरी त्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीच्या पावसावर शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली; मात्र नंतर पावसाने दीड ते दोन महिने उसंत घेतल्याने त्याचा फटका बसला आहे. यामुळे सोयाबीनच्या भावात फारसा फरक पडेल, असे व्यापाºयांना वाटत नाही. लोकल बाजरीला लासलगाव बाजारात १२०० ते १६६१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत असून, आवक खूपच कमी झाली आहे. साधारणत: दसºयाच्या आसपास नवीन बाजरीचे पीक बाजारात येण्याची अपेक्षा असून, सध्यातरी बाजरीचे भाव स्थिर आहेत.जिल्ह्यात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मक्याला १३८० ते १५०० आणि सरासरी १४६१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. स्थानिक मक्याची आवक कमी असली तरी लासलगाव बाजारात सध्या बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून मक्याची आवक होत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांकडून हा मका खरेदी केला जात असून १४५० ते १५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. कळवण बाजार समितीत मागील १५ ते २० दिवसांपासून मक्याचे बाजार बंद आहेत.यावर्षी मक्याला पावसाचा फटका बसला आहे. वेळेत पाऊस न झाल्याने पिकाची वाढ झाली नाही. कोरडवाहू शेतकºयांचे तर हातचे पीक गेले आहे. ज्यांनी विहिरीतील पाण्यावर मका जगविला त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. यामुळे यावर्षी मक्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करुन नवीन मक्याची आवक आणि त्याची प्रत यावरच भाव ठरतील, असे व्यापाºयांनी सांगितले. लोकल ज्वारीची केवळ एक क्विंटल आवक झाली. ज्वारीला लासलगाव बाजारात १५०१ ते १९२६ रुपये क्विंटलचा भाव आहे. विशाल हरभºयाची २२ क्विंटल, तर लोकल हरभºयाची ७२ क्विंटल आवक झाली. हरभºयाचे भाव चांगले असून, स्थिर आहेत. उडीद आवक फारशी नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक