शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अविश्वासामुळे चिंतित होते प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:24 AM

काँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती.

- व्यंकटेश केसरीकाँग्रेससाठी संकटमोचक अशी ओळख असलेले भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेवर १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या पक्षाने भरवसा ठेवला नाही, याची त्यांना खंत वाटली होती. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांचा विचार झाला आणि त्यानंतर त्या पदासाठी डॉ. मनमोहनसिंग यांची निवड करण्यात आली यामुळे त्यांना धक्का बसला होता आणि ते दुखावले गेले होते’’ असा खुलासा त्यांच्या द कोअ‍ॅलिशन इयर्स १९९६-२००२ या पुस्तकातून करण्यात आला आहे.गेल्या शुक्रवारी या पुस्तकाचे विमोचन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, ‘‘पंतप्रधानपदाची दावेदार व्यक्ती ही अनुभवी राजकारणी असावी, असा विचारप्रवाह काँग्रेसपक्षात बळावला होता. त्या व्यक्तीला पक्षाचे व्यवहार आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींचा अनुभव असायला हवा, याविषयी पक्षात एकमत झाले होते. त्यामुळे (सोनिया गांधींनी) डॉ. मनमोहनसिंग यांची निवड केली आणि त्यांनीही त्यास मान्यता दिली.’’प्रणवदा यांच्या मतानुसार ‘‘सरकारात सामील होण्याची माझी इच्छा नव्हती आणि मी ही गोष्ट सोनिया गांधींजवळ बोलून दाखवली होती. पण मी सरकारमध्ये असायला हवे, कारण सरकार चालविताना माझी भूमिका महत्त्वाची राहणार होती. तसेच डॉ. मनमोहनसिंग यांना माझी मदत मिळाली असती’’ असे सोनियांना वाटत होते.पर्याय सुचवा२००७ साली जेव्हा डाव्या पक्षांनी राष्ट्रपतिपदासाठी माझ्या नावाचा पुरस्कार केला तेव्हा सोनिया गांधींनी मला बोलावून सांगितले की आपण संसद आणि सरकारचे प्रमुख स्तंभ आहात. त्याविषयी प्रणवदांनी पुस्तकात लिहिले आहे की माझ्याविषयीचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, मला तो मान्य राहील. त्यानंतर २०१२ सालीसुद्धा चर्चेच्या ओघात सोनियाजी म्हणाल्या होत्या की या पदासाठी आपण सर्वात लायक व्यक्ती आहात पण सरकारात आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असल्यामुळे राष्टÑपतिपदासाठी आपण एखादे पर्यायी नाव सुचवू शकता का? त्यावेळी मला वाटले होते की सं.पु.आ. चा राष्टÑपतिपदाचा उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव त्या पुढे करून माझ्याकडे पंतप्रधानपद सोपवतील.’’मंत्रालयाबाबत विचारणा केलीत्यानंतर सोनिया गांधींनी प्रणवदा यांना विचारले की संरक्षण, गृह, विदेश किंवा वित्त या मंत्रालयांपैकी कोणते मंत्रालय हवे? त्यांची इच्छा होती की प्रणवदांनी संरक्षण मंत्रालय सांभाळावे. पंतप्रधानांच्या आर्थिक धोरणाविषयी मतभेद असल्यामुळे मुखर्जींनी वित्तमंत्रालय घेण्यास नकार दिला होता. संरक्षण मंत्रालय घेण्याबाबतही प्रणवदांनी टाळाटाळ करून त्यांनी विदेश मंत्रालयाऐवजी गृहमंत्रालय मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण पदग्रहण समारंभाचे वेळी त्यांना समजले की त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपविण्यात येणार आहे.’’पुस्तकात नमूद केलेल्या आणखी काही गोष्टी- पंतप्रधान होण्यास सोनिया गांधींनी नकार दिल्यानंतर पंतप्रधानपदासाठी माझी निवड करण्यात येईल असे मला वाटले होते. कारण मला सरकारमध्ये काम करण्याचा भरपूर अनुभव होता.- मी गृहमंत्रालयाचा भार स्वीकारावा असे लालूप्रसादांना वाटत होते. पण मी त्यास नकार दिला.- सरकारचा भाग बनण्याची शरद पवार यांची इच्छा नव्हती. पण आपण आल्याने सरकार मजबूत होईल असे मी त्यांना म्हटले तेव्हा त्यांनी कृषिमंत्री पद स्वीकारण्यास मान्यता दिली.- लोकसभा अध्यक्षपदी ए.आर. अंतुले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ती चर्चा शिवराज पाटील आणि मीराकुमार यांच्या नावापर्यंत पोचली तेव्हा सोमनाथ चॅटर्जी यांचे नाव मी सुचविले.- मीडियाच्या काही स्तंभलेखकांनी असेही लिहून टाकले की कनिष्ठ व्यक्तीच्या (डॉ. मनमोहनसिंग) हाताखाली मी काम करणार नाही, त्यामुळे मी सरकारमध्ये सामील होणार नाही.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीIndiaभारत