शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

निंदानालस्तीतच राजकारण्यांना रस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:39 AM

गेल्या काही महिन्यांत राजकारणी लोकांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गाठली.

गेल्या काही महिन्यांत राजकारणी लोकांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत मजल गाठली. त्यांची भाषणे निंदात्मक, किळसवाणी आणि राजकीय संघर्ष करण्यापर्यंत मजल गाठलेली होती. यापूर्वी या देशात अशी भाषा कधीच वापरण्यात आली नव्हती. त्यांनी ताळतंत्र सोडून एकमेकांचे जे वाभाडे काढले, ते अशोभनीय होते. राजकीय पक्षापेक्षा पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या वक्तव्यांनी देशाला लाज आणली. त्यांच्या भाषणावरून आणि एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीवरून भविष्यातील राजकारण कसे राहील, याचा अंदाज सहज बांधता येतो. त्यांच्या टीकेत भ्रष्टाचाराचा जसा उल्लेख होता, तसाच एकमेकांवर व्यक्तिगत आरोप करण्यातही ते कुठे मागे राहिले नाहीत. या गदारोळात राजकीय नेते आणि त्यांचे अनुयायी, तसेच त्यांचे विरोधक यांचे वर्तन योग्य नव्हते, त्यात राजकीय उमेदवाराचा मात्र अंत झाला, लोकांचेही नुकसान झाले.

१५०० साली फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेली भविष्यवाणी जशी खरी ठरू पाहत आहे, तद्वतच रॉबर्ट पेन या १९४६ सालच्या पुलित्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या ‘आॅल द किंग्ज मेन’ या कादंबरीत भविष्यातील राजकारण कसे निंदात्मक राहील, याचे जे वर्णन केलेले आहे, त्याचा प्रत्यय सध्याच्या राजकारणातून पाहायला मिळत आहे. या कादंबरीत राजकीय भ्रष्टाचाराचे वर्णन लेखकाने केले आहे. त्यातून विली स्टार्क या काल्पनिक गव्हर्नरचा कसा उदयास्त होतो, हे मार्मिकपणे दर्शविण्यात आले आहे. त्यातील स्टार्क हा आपल्या मित्रास मदत करता-करता आपण कसे सर्वश्रेष्ठ आहोत, या भावनेने कसा पछाडला जातो, हे स्पष्ट केले आहे. राजकीय निंदा कशी करण्यात येते आणि बदनामी कशी केली जाते व ती खालपर्यंत कशी झिरपत जाते, हे प्रत्ययकारी पद्धतीने दर्शविण्यात आले आहे.

निंदात्मक वक्तव्यात बदनामी कशी दडलेली असते, हे त्यातून दाखविण्यात आले आहे. शाब्दिक टीकेने त्याची सुरुवात होते आणि त्यातून निंदात्मक लेखन सुरू होते. सध्याच्या काळात एकमेकांची शाब्दिक निंदा करण्यावर भर दिला जात आहे. एखाद्या व्यक्तीविषयी खोटी वक्तव्ये करून, त्याच्या लौकिकास कलंकित करण्यात येत आहे. निंदा करणे हा काही गुन्हा नाही, पण सार्वजनिक टीका हा न्यायालयीन खटल्याचा विषय होऊ शकतो. व्यक्तीविषयी करण्यात आलेले उल्लेख हे सत्य घटनांवर आधारित असायलाच हवेत किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तीचे ते स्वत:चे अधिकृत मत असायला हवे. रागाच्या भरात केलेली खोटी वक्तव्ये ही निंदात्मक अभिव्यक्तीत मोडली जातात.

सध्याचे युग हे खोट्या बातम्याचे, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप करण्याचे आहे. असे आरोप केले जात असताना संबंधित व्यक्तीवर न्यायालयात खटला का भरला जात नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटते. राजकारणी व्यक्तींवर टीका करताना त्याविषयीचा पुरावा बाळगणे आवश्यक असते, पण अशा आरोपांकडे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली दुर्लक्ष करण्याची भूमिका निवडणूक आयोगाने घेतल्याचे दिसून आले. या आरोपांच्या संदर्भात वृत्तपत्रांनी पक्षपाती दृष्टिकोन बाळगल्याचे दिसून आले.एका नेत्याने दुसºया नेत्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला, तर दुसºयाने पहिल्या व्यक्तीने आपल्या बायकोचा त्याग केला असल्याने, त्याला कुटुंबाच्या अडचणींची कल्पना कशी येणार, अशा शब्दात त्याचे वाभाडे काढले. एकमेकांना या तºहेने शिव्या देण्याची चढाओढ सुरू झाल्यावर त्या शिव्यांची चळतच निर्माण झाली. एकाने दुसºयाला मूर्ख म्हटले, तर दुसºयाने पहिल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणून हिणवले. कुणी कुणाला दुर्योधन म्हटले, तर आणखी कुणी काही म्हटले. व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपातून कुटुंबांचीही सुटका झाली नाही. त्यातून मृत व्यक्तींचाही उद्धार करण्यापर्यंत मजल गाठण्यात आली. विरोधकांनी सत्तारूढ नेत्याला रक्तपिपासू आणि आधुनिक काळातील सीझर, हिटलर किंवा नेपोलियन असल्याचा उल्लेख केला.

आपण व्यक्त केलेले मत हे आपले व्यक्तिगत मत होते, असे सांगून राजकारणी लोक न्यायालयाच्या संतापापासून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन सर्व लोक स्वत:ची मते व्यक्त करीत असतात, मग ती मते इतरांना हानिकारक का ठरेनात! एकमेकांची निंदा करण्याचा प्रकार पूर्वीदेखील होत होता, पण सध्या तंत्रज्ञानामुळे ही निंदा सर्वदूर पसरायला वेळ लागत नाही. राजकीय निवडणुकांमुळे स्पर्धात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे एकमेकांना कमी लेखण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्या स्पर्धेमुळे जर कोट्यवधी रुपयांचा लाभ होणार असेल, तर त्या स्पर्धेला घाणेरडे स्वरूप प्राप्त होते. बदनामी करण्याच्या प्रचारमोहिमेने फायदा होत असल्यामुळे, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची राजकीय पक्षांची तयारी असते. बंगालच्या राजकीय रणभूमीवर एक ज्येष्ठ राजकारणी म्हणाला. ‘हुकूमशाहीत विनोदाला स्थान नसते. हुकूमशहांना आपल्याकडे बघून कुणी हसलेले आवडत नसते.’ त्याचे हे म्हणणे सत्तारूढ पक्षाला अचूक लागू पडते, हे जर त्याने स्वीकारले, तर राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर येणे सोपे जाईल, पण राजकीय तेढ इतकी विकोपाला पोचली आहे की, ती पुन्हा पूर्व पातळीवर आणणे कठीण झाले आहे.

- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण