शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:18 IST

हरियाणातली भाजपची राज्यसभेची एक जागा थोडक्यात गेली. या घटनेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. कारण धनखड प्रकरण अद्याप मिटलेले नाही !

हरीष गुप्ता नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

आसाम, ओडिशा आणि बिहार या तीन राज्यांत भाजपला राज्यसभेच्या तीन अधिक जागा मिळाल्या; परंतु हरियाणातील एक जागा अगदी एखाद्या मताने गेली. काही आकड्यात गडबड झाली का? तर तसे नाही. राजकारणात भुते क्वचितच गाडली जातात. जगदीश धनखड यांना विचारा. एकेकाळी वाजत-गाजत उपराष्ट्रपतिपदावर बसवल्या गेलेल्या धनखड यांना अचानक पायउतार व्हावे लागले. पक्षाच्या म्हणण्यानुसार तो विषय आता मागे पडला आहे. आता पुनरागमन नाही, कारण तशी परंपरा नाही. पुन्हा निवडणूक नाही. एकप्रकारे राजकीय कोंडीच । परंतु राजकारणात एक अचूक वेळ साधण्याचा दुष्टावा असतोच.

निवडणूक न लढवता, प्रचार न करता, ब्र ही न काढता धनखड यांनी शांतपणे राज्यसभेची जागा हलवली. देवीलाल यांचे वारसदार अभय चौताला यांच्यापाशी हा विषय पोहोचला. राजीनाम्यानंतर धनखड चौताला यांच्या फार्महाउसवर पाहुणे म्हणून नव्हे तर अगदी कुटुंबातले सदस्य म्हणून राहत आहेत. मतदान झाले तेव्हा इंडियन नॅशनल लोकदलाच्या दोन आमदारांनी तटस्थ राहायचे ठरवले. ते मौन खूप काही सांगणारे होते. ही मते भाजपकडे झुकली असती तर गेलेली जागा नक्कीच मिळाली असती. गणित आणि भावना एकत्र येतात त्या अशा.

धनखड प्रकरण मिटलेले नाही हे लक्षात आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना अशोभनीयरीत्या जावे लागल्याने जाट मंडळी दुखावली आहेत. केवळ हरियाणातच नव्हे तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाटांना हे रुचलेले नाही. याच समाजाला एकेकाळी धनखड उपराष्ट्रपती झाल्याने प्रतीकात्मक बळ मिळाल्याची भावना होती. आपल्याला राजकीय दणका मिळाला असे त्यांना आता वाटते आहे. ज्या प्रदेशात प्रचारापेक्षाही जात जातीय गणिते महत्त्वाची असतात अशा भागात हे घडले. नुकसान काय? तर राज्यसभेची एक जागा गेली. एका जागेने होणारे नुकसान? -टोचत राहणारी राजकीय खदखद । भारतीय राजकारणात गाजावाजा होत ज्यांना जावे लागते त्यांच्यापेक्षाही ज्यांचा आवाज होत नाही त्यांचे प्रतिध्वनी दीर्घ काळ उठत राहतात.

धनखड पायउतार होऊन आता आठ महिने झाले आहेत. माजी उपराष्ट्रपतींना अजूनही अधिकृतपणे मिळालेल्या बंगल्याची प्रतीक्षा आहे. एपीजे अब्दुल कलाम रोडवर ल्युटियन्स दिल्लीत ही वास्तू आहे. बंगला मिळत का नाही? तर दुरुस्ती चालली आहे, तांत्रिक अडचणी आहेत, कागदोपत्री पूर्तता व्हावयाची आहे... नोकरशाही देत असलेले यातले कोणतेही कारण घ्या.

बंगला तसे पाहता काही महिन्यांपूर्वीच दिला गेला असेच सांगितले जाते. मात्र हा खेळ असा की धनखडांना तो अजून प्रत्यक्षात मिळालेला नाही. दरम्यान, धनखड साहेब मात्र खाजगी फार्महाउसवर आराम फर्मावत आहेत.

पदनामे अस्पष्ट होतात. शिष्टाचार बाजूला पडतात. फाइल मात्र फाइल असते. ती तिला हवा तेवढा काळ फिरत (च) राहाते. धनखड यांना हा धडा अनपेक्षित असेल; पण तो चुकणारा नव्हता. दिल्लीत तुम्ही भले कायदे कानून, नियम लागू करणारे असाल, पण आज ना उद्या तुम्हालाही ते लागू होतातच.

नितीश कुठेही जात नाहीत! 

प्रकृती अस्वास्थ्याबद्दल सातत्याने बोलले जात असतानाच ते दिल्लीला जायला निघाले खरे; पण नितीश कुमार इतक्यात काही बिहारच्य राजकारणातून बाहेर पडत नाहीत. राज्यसभे जाण्याची तयारी सुरू असतानाही संयुक्त जनत दलाचे अध्यक्षपद त्यांनी आपल्याकडेच ठेवले.

मुख्यमंत्रिपदावरून नितीश पायउतार झाल असले तरी सत्तेची सूत्रे ते आपल्याच हातात ठेवणार आपला उत्तराधिकारी निवडण्यात त्यांचीच भूमिक महत्त्वाची असेल असे पक्षाच्या अंतस्थ सूत्रांचे म्हणप आहे. सम्राट चौधरी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासार्ट घेतले जात असले तरी अंतिम निर्णय नितीश हे घेतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी ते आपल्या पुत्राचे ना जाहीरपणे घेत आहेत. त्यात त्याला राजकारणात पुर नेण्याबरोबरच घडामोडींवर आपले लक्ष राहील, अश ही व्यवस्था असेल. आत्तापर्यंत राजकारणापासून दू असलेले त्यांचे पुत्र आता भविष्यातले सूत्रधार म्हणू. सादर केले जात आहेत. सत्ता न सोडता भविष्यकात आपल्या हातात ठेवण्याचा नितीश यांचा इराद त्यातून उघड दिसतो.

भाजपच्या बाजूने पाहू जाता ही व्यवस्थ कोणताही संघर्ष उत्पन्न न करता पुढे चाल मिळवू देणारी आहे. संयुक्त जनता दलासाठी त्यांचे सामाजिक जुळणी हलत नाही. प्रकृतीमुळे काह मर्यादा आल्या असतील; परंतु नितीश कुमारांच्य राजकीय आकांक्षा त्यामुळे संपलेल्या नाहीत कालबाह्य होण्यापेक्षा भूमिका बदलण्यात त्यांचे कलाकारी दिसते. बिहारच्या राजकारणातून नितीः बाहेर पडत नसून ते फक्त जागा बदलत आहेत.

 harish.gupta@lokmat.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanakd's silent move: Political chess without uttering a word.

Web Summary : Dhanakd's quiet maneuvering impacts Haryana politics. A Rajya Sabha seat loss reveals Jat community discontent over his unceremonious exit. Nitish Kumar, despite health concerns, retains control in Bihar, strategically positioning himself and his son for the future.
टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाHaryanaहरयाणा