केंद्रात आलेल्या अनेक सरकारांनी काही विषयांवर लोकसभेत कायदा संमत करून घेण्यास अपयश आल्यानंतर, वटहुकूम काढून तो विषय कायद्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. २००३ सालापासून असे जवळजवळ १०० वटहुकूम जारी करण्यात आलेत. ...
अलीकडेच पूर्ण झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ या स्वच्छता सर्वेक्षणाच्या पाहणीत देशभरच्या ४२३७ शहरांना स्वच्छतेच्या संदर्भात मानांकन देण्यात आले. त्यात मुंबईला ४९वा क्रमांक मिळाला, जो गेल्या वेळपेक्षा ३९ पायऱ्या खाली घसरलेला आहे. ...
गोव्यातील असूनही स्वतःची हिंदू अशी ओळख पुसण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. उलट ही ओळख अधोरेखित होईल अशीच वक्तव्ये व कृती वेळोवेळी केली. ही हिंदू आयडेंटिटी कायम ठेवूनही गोव्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये लोकप्रियता मिळविली. ...
पर्रीकरांच्या झंझावाती राजकारणाचे सावट बराच काळ गोव्यावर असेल. नव्या शासकांचे मूल्यमापन करताना पर्रीकरांची कार्यक्षमता, दराऱ्याचा निकष लावला जाईल. नोकरशाहीच्या सुस्त कारभाराला नाके मुरडताना ऐकताना पर्रीकरांचे स्मरण हमखास होईल. ...
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या वेळी ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहर यास ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात चीन साथ देईल, अशी वेडी आशा भारतात काही लोकांनी बाळगली होती. खरं तर चीन असे करेल याची कल्पना करणेही मुश्कील आहे. ...
गोव्याच्या राजकारणात तोच कचरा, तीच दुर्गंधी आणि तीच कुजकट परिस्थिती आम्ही भोगत होतो. किंबहुना राजकारणाने नव्या आशा, आकांक्षा आणि नवे चैतन्य निर्माण करायचे असते; परंतु काँग्रेसच्या राजकारणाने साचलेपणा निर्माण केला होता. गोव्याच्या राजकारणाने अशा चिखल ...
सत्ता ही किती क्रूर असते, याचा अनुभव पर्रीकरांचे कुटुंबीय घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सारे पक्ष आणि त्यांचे नेते संगीत खुर्चीच्या खेळात बेशरमपणे गुंतले आहेत. ...