धोरणकर्त्यांपैकी काहीजणांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव परिणामकारक उपाय वाटतो, तर टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आणण्याखेरीज काहीही साध्य झालेले नाही, असे इतर काहीजणांचे मत आहे. ...
गुन्हेगारी, राजकारण आणि अन्य सरकारी संस्थांमधील अभद्र युतीच्या संदर्भात निवृत्त केंद्रीय गृहसचिव एन. एन. व्होरा यांच्या समितीने १९९३ मध्ये एक सविस्तर अहवाल तयार केला होता. ...
योगींचे सरकार गुन्हेगारांचा नायनाट करीत आहे, असे भासविले जाते. गुन्हेगारी संपविण्यापेक्षा पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारांतील हातमिळवणीवर पडदा टाकण्याचा उद्देश त्यामागे आहे का, अशी शंका दुबे आणि त्याच्या साथीदारांशी झालेल्या चकमकीतून येते. ...
रोशनीसारख्या अशा अनेक गर्भवती मातांच्या नशिबी या यातना येतात. केवळ या नाल्यावर पूल असता तर रोशनी आणि तिच्यासारख्या माउलींचे हाल झाले नसते. नक्षलवादाचे कारण पुढे करून विकासाची लक्तरे वेशीवर टांगणारे अधिकारी गप्प होते आणि आहेत. ...
दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि आता निकृष्ट बियाणे. या फेऱ्यात विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी अडकला आहे. यंदा निर्माण झालेला प्रश्न सोयाबीन-ऐवजी उसाचा राहिला असता, तर सरकार आणि लोकप्रतिनिधी एवढे शांत बसले असते का? ...