देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी वयाच्या ४४ व्या वर्षीच महाराष्ट्राचे २७ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणे ही कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी स्वागतार्ह सुरुवात म्हणावी लागेल. ...
आजच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत त्यांना वाढते शहरीकरण, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि अर्थातच उद्योग अशा सर्वच आघाडय़ांवर आश्वासक कामगिरीचा भरवसा जनतेला द्यावा लागणार आहे. ...
महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे. नकाशात तर तो एक राहीलच. राजकीयदृष्टय़ा सुद्धा पुढील पाच वर्षात तरी त्याचे विभाजन होणार नाही, ...
महाराष्ट्र हे आता नागरीबहुल लोकसंख्या असलेले राज्य आहे. शहरे ही विकासाची इंजिने असतात आणि तीच राष्ट्राचा आणि राज्याचा रुतलेला गाडा विकास हमरस्त्यावरून पळवितात. ...
विकासाकडे नेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य अशी घोषणा देत भाजपा सत्तेत आला आहे. मंत्नालयातील प्रत्येक मजल्यावर असलेला आणि प्रत्येक फाइलखाली असलेला भ्रष्टाचार काही लपून राहिलेला नाही. ...