शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

कृष्णाकाठचे औदुंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:47 AM

कृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट.

- कौमुदी गोडबोलेकृष्णेचं पात्र जलानं काठोकाठ भरलेलं. अवघा परिसर भाव भक्तीनं भारलेला! दूरवर निळंशार आकाश पसरलेलं! पैलतीर हिरव्यागार शेतीनं तरारलेलं! ऐलतीरावर भगवान दत्तात्रयांचं वसतिस्थान. मनोहर पादुका भक्तांना भावणा-या. दगडी पाय-यांचा देखणा घाट. औदुंबर मोठा भाग्यवान! या वृक्षाच्या तळवटी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तगुरूंचा नित्य वास! त्यामुळे औदुंबर वृक्ष पूजनीय ठरला. शेकडो भक्तांच्या भावपूर्ण सहवासात रमलेला औदुंबर आणि कृष्णा नदीचं पवित्र पात्र दत्तगुरूंच्या शक्तीनं संपन्न झालेलं.शांतता, स्वच्छता याचा सुरेख संगम झालेलं सुंदर स्थान! श्री गुरूंवर दृढ-श्रद्धा असलेला वर्ग! कृष्णेच्या जलाप्रमाणे प्रवाहित होणारी भक्ती सर्वदूर पोचलेली! प्रखर निष्ठेनं, नेमस्तपणानं, नि:स्पृहतेनं या स्थानाला आगळं वेगळं महत्त्व लाभलेलं! सदैव सतेजपणाचं वरदान लाभलेली!सुमारे सात-साडेसात शतकांपासून शक्तिसंपन्न असलेलं वाडी हे स्थान! निवांतपणानं कृष्णाकाठी साधना करण्यास सुयोग्य असलेलं क्षेत्रं. हल्ली अशी स्थानं, क्षेत्रं दुर्मिळ झालेली आहेत. सगळीकडे व्यवसाय, व्यवहाराचा कोरडेपणा आलेला आहे. सर्वत्र गोंधळ दिसून येतो. कृष्णेचं जल स्वच्छ सुंदर असून संथपणानं लोककल्याणाची आस बाळगून समस्त समाजाला सामावून घेण्याच्या क्षमतेनं संपन्न आहे.साडेसातशे वर्षांपूर्वी ज्या घराण्यावर दत्तगुरूंनी कृपा केली त्यांचे वंशज आजही श्रद्धा, निष्ठा ठेवून श्रीगुरू दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये रममाण झालेले दिसून येतात. कृपेचा चांदण वर्षाव झालेल्या भक्तांमुळे हल्लीच्या काळातही भक्तीमधील शक्तीचा प्रत्यय येत आहेत. दत्तभक्ती, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कथा या काल्पनिक नसून खºया आहेत याची साक्ष देणारी घराणी, त्यांचे वंशज उभे आहेत. नितांत नितळ असणारी भक्ती हल्लीच्या धकाधकीच्या, तणावाच्या स्पर्धेच्या काळातही माणसाला उभं राहण्याचं बळ प्रदान करते.कृष्णा, पंचगंगा नद्यांचा आणि दत्तगुरूंचा जवळचा संबंध! समृद्ध परिसर, दत्तगुरूंच्या चरणाचा परिसस्पर्श लाभलेलं स्थान! पवित्र स्पंदनांची अनुभूती प्राप्त झाल्यानं चैतन्याचा परिमल मना-मनाभोवती दरवळत राहतो. चंदन उगाळलं की सुगंध येणारच! हा सुगंध जीवनाला लाभला की अवघं जीवन ऊर्जेनं उजळून उठणार यात शंका नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र