शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

वाचनीय लेख - नग्नता : ना धर्मद्रोह, ना कायदाभंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:11 IST

अंग झाकायला वस्त्र आले तेच मुळी असल्या शब्दांना बरोबर घेऊन.

न्यू यॉर्कमधील एका मासिकासाठी रणवीर सिंगचे वेगवेगळ्या शारीरिक स्थितीत नग्नावस्थेतील फोटो काढले गेले. ही छायाचित्रे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे समाजासमोर आली आणि ती चित्रपटसृष्टीतील एका वलयांकित अभिनेत्याशी संबंधित असल्यामुळे सगळीकडे त्याचा बोभाटा झाला. त्यानंतर काही संस्कृती रक्षकांनी पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कायद्याच्या कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदविला ते कळायला जसा मार्ग नाही, तसेच संस्कृती रक्षकांना कोणत्या संस्कृतीचे रक्षण करायचेय, तेही समजलेले दिसत नाही. वस्त्राचा शोध लागल्यानंतरची संस्कृती त्यांना बहुतेक जपायची असावी. कारण त्यापूर्वी माणूस नग्नावस्थेतच फिरत होता आणि नैतिक-अनैतिक, श्लील-अश्लील, लज्जास्पद नग्नता वगैरे शब्दांशी त्याचा परिचयच नव्हता. 

अंग झाकायला वस्त्र आले तेच मुळी असल्या शब्दांना बरोबर घेऊन. शरीर वस्त्रात लपेटून घेणे हे मग संस्कृतीचे लक्षण ठरले नव्हे, तर ठरवले गेले. नग्नता हा ना धर्मद्रोह आहे, ना कायदाभंग आहे. रणवीर कपडे उतरवून वेडेवाकडे चाळे करत भाजी मंडईत फिरत नव्हता, तर एका मासिकाशी केलेल्या कराराची तो पूर्तता करत होता. मनावर खोल रुजलेल्या संस्कृतीमुळे आज कोणीही चार भिंतीच्या बाहेर येऊन उघड्या देहाचे प्रदर्शन (सामान्यत:) करत नाही. संस्कृतीचा फुकाचा डंका फुंकून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे प्रकार टाळलेच पाहिजेत. तेवढा समंजसपणा किमान आजच्या समाजात असला पाहिजे. आणि नग्नतेची गणना ‘गुन्हा’ या सदरात करायची असेल तर जिथे आजही आधुनिक वस्त्र संस्कृती पोहोचलेली नाही, अशा अतिमागास भागातील आदिवासी, रस्त्यात फिरणारे विवस्त्र मनोरुग्ण, नग्न साधू या सर्वांनाच गुन्हेगार ठरवावे लागेल. 

विवस्त्र अवस्थेत रोज अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात उभे राहण्याचे फायदे रघुनाथ कर्वे यांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यासाठी बंदिस्त जागेत त्यांनी क्लबही सुरू केला होता. पण शरीर स्वास्थ्यापेक्षा संस्कृती जपणाऱ्या त्या काळात काळाच्या खूपच पुढे असलेल्या कर्वे यांच्या या क्लबसाठी एकही सदस्य मिळाला नाही. रणवीर सिंगने रघुनाथ कर्वे यांचे स्वप्न आज पूर्ण केले. अभिनंदन रणवीर!- शरद बापट, पुणे

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगViral Photosव्हायरल फोटोज्bollywoodबॉलिवूड