शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

खेळात नुसते खेळाडूच नव्हे पैसाही खेळला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 06:49 IST

IPL : मुळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाइतकी श्रीमंत संघटना क्रिकेटमध्ये कोणत्याच देशाची नाही. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून जागतिक क्रिकेटची सूत्रे भारतीयांच्या हाती असावी हे मूळ दुखणे.

अगदी १६ ते ४२ या वयोगटातले जगभरचे क्रिकेटपटू यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)मध्ये खेळतील. आयपीएल सुरू झाली तेव्हाची चमकधमक, ‘चिअर गर्ल्स’, रंगीत पार्ट्या वगैरेवरून आयपीएलला नावे ठेवण्याची टुम निघाली होती. आयपीएलमुळे क्रिकेटचा आत्मा हरवत असल्याचीही टोकाची टीका झाली. यामागे इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारख्या काहींचा केवळ मत्सरच जास्त होता. मुळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाइतकी श्रीमंत संघटना क्रिकेटमध्ये कोणत्याच देशाची नाही. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून जागतिक क्रिकेटची सूत्रे भारतीयांच्या हाती असावी हे मूळ दुखणे.

आयपीएलसारखी स्पर्धा भारताने ‘लॉंच’ करावी आणि अल्पावधीत ती यशस्वी व्हावी याचा त्रास गोऱ्यांना होणे स्वाभाविक होते. त्याची फिकीर करण्याची गरज भासली नाही. उलट आता स्थिती अशी आहे की, आयसीसी विश्वचषकानंतरची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा क्रिकेट विश्वात आयपीएल आहे. जगभरचे उदयोन्मुख क्रिकेटपटू आयपीएल खेळण्याचेच स्वप्न पाहतात. येथे मिळणारा अमाप पैसा हे कारण तर आहेच; पण आयपीएलमधल्या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडतात अशी चाकोरीच पडली आहे. आयपीएलच्या उच्च दर्जाचे हे द्योतक होय. आयपीएलमुळे जागतिक क्रिकेटची गुणवत्ता उंचावल्याचे आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मान्य करतात.

या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीची आयपीएल कोरोनाच्या कचाट्यात सापडली. एरवी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळणारी ही स्पर्धा आखाती वाळवंटातल्या रिकाम्या मैदानांमध्ये खेळवावी लागली. आयपीएलच्या लोकप्रियतेवर याचा किंचितही परिणाम झाला नाही. यंदाची स्पर्धा कुठे होणार, कशी होणार, प्रेक्षकांना प्रवेश मिळणार का याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. तरीदेखील क्रिकेटपटूंचा लिलाव मात्र जोरदार झाला. दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला आजवरची सर्वोच्च विक्रमी सव्वासोळा कोटी रुपयांची बोली लागली. मॉरिससह २९२ क्रिकेटपटू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळतील. यात सर्वाधिक चर्चा स्वाभाविकपणे झाली ती अर्जुन सचिन तेंडुलकरची. बापाच्या पुण्याईवर अर्जुनला ‘मुंबई इंडियन्स’ने स्थान दिल्याचा आरोप सोशल मीडियात होतोय. यात तथ्य आहे असे क्षणभर मानले तरी मैदानात उतरल्यानंतर सचिनची पुण्याई अर्जुनच्या कामी येणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

क्रिकेटच्या मैदानात ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशी स्थिती असते. असेल नाणे खणखणीत तर ते वाजेल. पण अर्जुनव्यतिरिक्त आणखी १६३ भारतीय खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये चमकणार आहेत. यात चेतन साकरिया या टेम्पो ड्रायव्हरच्या मुलापासून ते सचिन बेबी, शाहरूख खान, मोहम्मद अझरुद्दीन, कृष्णप्पा गौथम असे अनेकजण आहेत जे शून्यातून आले आहेत. खरे म्हणजे हीच आयपीएलची खासियत आहे. के‌वळ भारतीयच नव्हे तर जगभरच्या गुणवंतांना केवळ त्यांच्या अफलातून कौशल्याच्या बळावर येथे निवडले जाते. कारण आयपीएलमधल्या जय-पराजयाला येथे फटकावल्या जाणाऱ्या प्रत्येक चौकार-षटकाराला, टिपल्या जाणाऱ्या प्रत्येक बळीला पैशांचे मोल आहे.

मैदानात झुंजणाऱ्यांसाठी ती क्रिकेटची लढाई असते. पण त्यांच्यावर पैसा लावणाऱ्यांसाठी तो नफ्या-तोट्याचा आणि ‘ब्रँडिंग’चा रोकडा व्यवहार असतो. कोणी कितीही गमजा मारल्या तरी कला किंवा क्रीडाक्षेत्रात अर्थकारण महत्त्वाचेच असते. प्रेक्षक-श्रोते त्याहून महत्त्वाचे असतात. केवळ कलेवरच्या प्रेमाचा विषय असता तर एखादा गवई दांडेलीच्या जंगलात एकाकीपणे सूर आळवीत बसला असता. एखादा क्रिकेटपटू लडाखच्या पठारावर चेंडू फटकावत बसला असता. पण कला-क्रीडेचे महत्त्व केवळ करमणुकीकरते उरलेले नाही.

लाखो हातांना काम देणारी हजारो कोटींच्या या ‘इंडस्ट्री’ बनल्या आहेत. याला कोणी नाके मुरडण्याचे कारण नाही. ‘आयपीएल’च्या यशाचे श्रेय धमाकेदार खेळाडूंचे जितके, तितकेच श्रेय दमदार अर्थकारणाचेही आहे. अन्यथा याच ‘आयपीएल’मधले अनेक खेळाडू पाकिस्तान, बांग्लादेेश, ऑस्ट्रेलिया आदी देशातही टी-ट्वेन्टी लीग खेळतात. पण त्या स्पर्धा आयपीएलच्या जवळपासही नाहीत. क्रिकेट विश्वातली भारताची दादागिरी कायम राखण्यात आयपीएलचा मोठा वाटा आहे. आयपीएलच्या नावे खडे फोडण्याऐवजी या यशाची पुनरावृत्ती इतर खेळांमध्ये कशी करता येईल यावर खरे तर क्रीडा धुरिणांनी लक्ष केंद्रित करावे. कब्बडी, टेनिससारख्या खेळात अपवादात्मक बदल दिसू लागले हे सकारात्मक चित्र आहे. खेळात नुसते खेळाडूच नव्हे पैसाही खेळला पाहिजे.

टॅग्स :IPL 2020 Auctionआयपीएल लिलाव 2020IPLआयपीएल