शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया न्याय दिन! अखेर न्याय झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 06:09 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना अखेर शुक्रवारी पहाटे फासावर लटकविण्यात आले. हा ख-या अर्थाने ‘निर्भया न्याय दिन’ ठरला आहे. निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री बसमध्ये सहा नराधमांनी सामुदायिक बलात्कार केला. तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले. त्यानंतर सिंगापूर येथे सुरू असलेल्या १३ दिवसांच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निर्भयाचे आई-वडील सलग आठ वर्षे या खटल्यातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संघर्ष करीत होते. निर्भयावर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, त्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभर करण्यात येत होती. त्यासाठी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. सर्वच स्तरांवरील न्यायालयांनी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.अखेरचा प्रयत्न म्हणून आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला. तोदेखील फेटाळून लावण्यात आला; तरीदेखील पतियाला हाउस सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकारच्या याचिका दाखल करून आरोपी फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरही जनतेतून संताप व्यक्त होत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. देशाच्या राजधानीत घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर आठ वर्षांनी निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे. खटल्यातील कोणते ना कोणते कच्चे दुवे शोधून फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न आरोपींकडून होईल; अशीच जनभावना होती, हे धक्कादायक आहे. न्याय व्यवस्थेवरील विश्वासास नख लागण्याचा प्रकार होता.सत्र न्यायालयाने अखेर चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतर गुरुवारी अखेरचा प्रयत्न म्हणून चारपैकी मुकेश हा आरोपी घटना घडली तेव्हा राजस्थानात होतो; शिवाय आपण त्या वेळी अल्पवयीन होतो, असा दावा करून शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेतील आरोपी, त्यांचे साक्षी-पुरावे, सर्व काही तपासून झाले असताना फाशी देण्याची वेळ काही तासांवर आल्यावर असे मुद्दे कसे उपस्थित होतात? त्यावर सुनावणी तरी कशी होते? हे सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. पहाटे फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे, असे सांगितल्यावर आरोपींनी अखेरचा प्रयत्न म्हणून मध्यरात्री याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीही केली आणि पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी म्हणजे फाशी देण्यास केवळ दोन तासांचा अवधी राहिला असताना याचिका फेटाळण्यात आली. अशावेळी त्या निर्भयासाठी लढणाºया आई-वडील तसेच नातेवाईक आदींच्या मनाची काय घालमेल झाली असेल, याचा तरी मानवतेच्या स्तरावर विचार व्हायला हवा. फाशी दिल्यावर निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. ते म्हणतात, आजचा दिवस हा ‘निर्भया न्याय दिन’ आहे. भारतीय संस्कृती महान असल्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, सांस्कृतिक बदलांसाठी प्रयत्न करायला हवे आहेत. निर्भयाच्या मृत्यूनंतर जो संताप व्यक्त करण्यात आला त्याने देश हादरून गेला; मात्र, न्यायदानाची प्रक्रिया संथपणेच चालत राहिली.देशात त्यानंतरही हजारो अत्याचाराच्या घटना घडत गेल्या. त्यातील असंख्य गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत आहेत. अनेक खटले विविध पातळीवरील न्यायालयांमध्ये पडून आहेत. बालिका आणि महिलांवरील अत्याचारांचे प्रकार काही थांबलेले नाहीत. न्यायव्यवस्था गतिमान आहे असे वातावरण भारतात नाही. निर्भया अत्याचारासारखेच क्रूर प्रकार अनेक घडले आहेत. त्याची चर्चा प्रसारमाध्यमांत कमी झाली आहे. पण त्यांच्या नातेवाइकांना संरक्षण कमी मिळाले असेल आणि कायदेशीर साहाय्यताही कमी मिळाली असेल. त्यामुळे ‘निर्भया न्याय दिन’ सर्व बळी पडलेल्या महिलांच्या जीवनात यायचा असेल तर आपल्या समाजात बदलासाठी खूप प्रयत्न करायला हवे आहेत.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्ली