शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

"दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा"; ना राष्ट्रवादी, ना भाजप, खडसे समर्थकांचा नवा गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 15:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे. त्यात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील ग्रमपंचायतीची नावे टाकण्यात आली आहेत.

मिलिंद कुलकर्णी

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात राजकीय पातळीवर फार मोठा बदल होईल, असे वातावरण निर्माण केले गेले. पण तसे फार काही घडले नाही. शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगावात मोठा प्रवेश सोहळा होईल, असे मुंबईतील प्रवेश कार्यक्रमात जाहीर झाले होते. पण अद्याप तशा हालचाली नाहीत. १७ फेब्रुवारी रोजी शरद पवार, अजित पवार हे दोंडाईचा येथे येणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे. त्यावेळी जळगावचा दौरा होतो काय, हे बघायला हवे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यात्रा खानदेशात येणार असल्याचे जाहीर झाले आहे, त्यामुळे पुन्हा पवार लगेच येतात काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पवारांची तिसरी पिढी आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या आमदार रोहित पवार यांचा दौरा गेल्या आठवड्यात झाला. या तरुण नेत्याने दिवसभरात अनेक गावांना भेटी दिल्या आणि अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. पवार नावाचे वलय त्यांच्याभोवती असल्याने चांगली गर्दी होती. मात्र खडसे यांच्या प्रभावक्षेत्रात वरणगाव येथील जाहीर झालेला कार्यक्रम अचानक रद्द झाला. पक्ष कार्यालयात रोहिणी खडसे हजर होत्या. ईडीसंदर्भात केंद्र सरकार सुडबुध्दीने वागत असल्याचे खडसेंचा नामोल्लेख करीत त्यांनी वक्तव्य केले. राष्ट्रवादीत खडसेंचा पूर्णत: मानसन्मान राखला जात असल्याचा संदेश त्यातून दिला गेला. पण वरणगावचे कारण कळले नाही? लवकरच तेथे नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यादृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व होते. राज्य मंत्रिमंडळाने वरणगाव  तळवेल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. भाजपने त्याचे श्रेय घेतले. गिरीश महाजन, रक्षा खडसे यांनी वरणगावात जाऊन आनंदोत्सव साजरा केला. ही पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीने ती संधी गमावली. ग्रामपंचायत निवडणुकीत मुक्ताईनगर तालुक्यात कोणाचे वर्चस्व राहिले, यावरुन अद्यापही कवित्व सुरु आहे. शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वर्चस्वाचा दावा केला. खडसे यांच्या कोथळी या गावात सेनेचे ५ तर खडसे समर्थक ६ सदस्य निवडून आले. खडसे समर्थक सदस्यांनी खासदार रक्षा खडसे व जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या दोघींची भेट घेतली. खडसेंवर प्रेम करणारे हे सदस्य असल्याचे वक्तव्य त्यावेळी करण्यात आले. नंतर समाजमाध्यमांवर दावे प्रतिदावे झाले.

स्वतंत्र गटाची परंपराराष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे. त्यात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील ग्रमपंचायतीची नावे टाकण्यात आली आहेत. खडसे समर्थक पॅनल हे ९ गावांमध्ये विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात सालबर्डी, कोथळी, नरवेल, सुलवाडी, पुरी गोलवाडे, मस्कावद बुद्रुक, मस्कावद खुर्द, मस्कावाद सीम, कोळोदा या गावांचा समावेश आहे. ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे म्हणत सगळ्या ग्रामपंचायतींची नावे राष्ट्रवादीने जारी करीत असताना, दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. मात्र, खडसे समर्थक हा कोणता नवा गट आहे, याचा खुलासा त्यात नाही. राष्ट्रवादीचे सदस्य ते नाहीत काय, मग ते भाजपचे सदस्य आहेत काय, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. भाजपही हे सदस्य आपले असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे ना राष्ट्रवादी, ना भाजप, आम्ही खडसे समर्थक असा नवा गट तर तयार झालेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात, राजकारणात अशा स्वतंत्र गटाची परंपरा आहे. दबाव गट म्हणून त्याचा वापरही होतो. स्वपक्ष व विरोधकांवर दोघांवर दबाव वाढवायला तो कामी येतो. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुत्र नीलेश व नितेश राणे यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. गणेश नाईक यांचीही सेनेतून बाहेर पडल्यावर संघटना होती. त्याप्रमाणे, तर हा गट तयार झालेला नाही ना, भुसावळ पालिकेत नुकतीच उपनगराध्यक्ष व विषय समिती सभापतींची निवड झाली. ही निवड करताना एकनाथ खडसे यांच्याशी सल्लामसलत करण्यात आल्याचे नगरसेवक डॉ.सुनील नेवे यांनी जाहीर केले. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचे आहेत, पालिकेत बहुमत भाजपचे आहे, मग सल्लामसलत खडसे यांच्याशी कशी, हा प्रश्न उपस्थित होतो, पण भाजपनेही याविषयी कानाडोळा करण्याचे ठरविलेले दिसतेय. खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी भाजपमध्ये असल्याचा पुनरुच्चार केला असला, तरी खडसे समर्थक गट ही नव्याने सोय करून घेण्यात आली आहे, असे एकंदरीत चित्र आहे.

राष्ट्रवादीचा दावा...राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या दाव्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात ७६ ग्रामपंचायतीत विजय झाल्याचे म्हटले आहे.  खडसे समर्थक पॅनल हे ९ गावांमध्ये विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.  ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ असे म्हणत सगळ्या ग्रामपंचायतींची नावे राष्ट्रवादीने जारी करीत असताना,  दुसऱ्याच्या वरातीत नाचणे बंद करा, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस