शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

राष्ट्रवादीने पेरले ते उगवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:12 AM

अहमदनगरला महापौरपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित काहीच घडलेले नाही. ठरवून सोंगट्या बसवाव्यात अशा नियोजनबद्धपणे ही निवडणूक पार पडली.

- सुधीर लंके(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)अहमदनगरला महापौरपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित काहीच घडलेले नाही. ठरवून सोंगट्या बसवाव्यात अशा नियोजनबद्धपणे ही निवडणूक पार पडली. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याचे धोरण घेतले होते. तोच इतिहास पवारांच्या ब्रिगेडने नगरला घडविला. त्यामुळे राष्टÑवादीने पेरले ते उगवले. आपल्या नगरसेवकांवर व नेत्यांवर कारवाई करण्याची नैतिकताही राष्ट्रवादी यामुळे गमावून बसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय स्थानिक पातळीवर हा जो शहाजोगपणा पक्ष नेहमी दाखवितो त्याची फळे राष्टÑवादीला नगरला भोगावी लागली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या पक्षाला याची उत्तरे द्यावी लागतील.नगर महापालिकेत ६८ जागांपैकी सेनेच्या सर्वाधिक २४, तर भाजपाच्या १४ जागा आहेत. या दोन्ही पक्षांची नैसर्गिक युती साकारली असती तर दोन्ही पक्षांचे बहुमत होऊन युतीची सत्ता स्थापन होणे सहज शक्य होते. यात घोडेबाजार टळला असता व जनतेनेही ही नैसर्गिक युती स्वीकारली असती. यात राष्टÑवादीचा दुरान्वयेही कोठे संबंध येत नव्हता. मात्र, सेना-भाजपा या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर बोलणीच झाली नाही. आमचे मुंबईतील नेते युतीबाबत निर्णय घेतील, असे स्थानिक नेते सांगत राहिले. दुसरीकडे वर अबोला होता.याची दोन कारणे असू शकतात. एक तर उद्धव ठाकरे भाजपाबाबत आक्रमक झालेले आहेत. ‘जागावाटप गेले खड्ड्यात आधी राम मंदिर, पीक कर्जाचे बोला’ असे ते पंढरपूरमध्ये बोलले. त्या आविर्भावात त्यांनी नगरची सत्ताही अक्षरश: खड्ड्यात घातली. दुसरी बाब म्हणजे सेनेची विधानसभेची स्थानिक गणिते. भाजपा व राष्टÑवादी यांची नगर शहरात आघाडी झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आपणाला आयता मुद्दा मिळून या अभद्र युतीचे ढोल वाजविता येतील. त्यातून राष्टÑवादीला ‘डॅमेज’ करता येईल, ही सेनेची स्थानिक गणिते आहेत. त्यामुळे त्यांचे स्थानिक नेते व माजी आमदार अनिल राठोड हे आपला महापौर करण्यासाठी फार आग्रही दिसलेच नाहीत. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे हे त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या मुद्द्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत. सेनेच्या एका पराभूत उमेदवारानेच याबाबत याचिका दाखल केली आहे. मात्र, सेनेच्या नेत्यांनी हा मुद्दा महापौर निवडणुकीत प्रभावीपणे कोठेही मांडला नाही. त्यामुळे सेनेलाच नगरमध्ये सत्ता नको होती, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्यांच्या उमेदवाराबाबत पक्षातच नाराजी होती.भाजपाला गमावण्यासारखे काही नव्हतेच. गतवेळी त्यांचे नगर महापालिकेत केवळ नऊ नगरसेवक होते. या वेळी ते जेमतेम चौदा जागांवर गेले. महापालिकेत ते ‘नापास’ झाले. तरीही त्यांचा आयता महापौर-उपमहापौर झाला. खरे तर हा मतदारांचा विश्वासघात आहे. हा पक्ष जिल्ह्यात आयात केलेल्या उमेदवारांवरच उभा आहे. नगरला जिल्हा परिषद व इतर निवडणुकांत यश मिळविणे त्यांना जमले नाही. लोकसभा, विधानसभेनंतर त्यांचे हे पहिलेच यश आहे. आमच्या ताब्यात इतक्या पालिका आहेत, अशी शेखी मिरविण्यासाठी ते मोकळे झाले. पण नगरकरांना ही आघाडी रुचेल का, ही शंका आहे.राष्टÑवादी या निवडणुकीत अगोदरपासूनच निरुत्साही होती. राष्टÑवादीचे स्थानिक आमदार संग्राम जगताप हे दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. ते अटकेतही होते. काँग्रेसचे कोतकर पिता-पुत्र हे दुसºया एका खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांचे समर्थकही भाजपामध्ये गेले. सर्व गुन्ह्यांत आपणाला सरकारचे संरक्षण मिळावे यासाठीच कोतकर-जगताप यांनी भाजपासोबत मांडवली केली, अशी चर्चा आहे. गिरीश महाजनांनी नगरला येऊन राष्टÑवादीशी काय ‘बोलणी’ केली ते भविष्यात समोर येईल. आमदार जगताप पिता-पुत्रांनी व नगरसेवकांनी राष्टÑवादीचा आदेश डावलला आहे. त्यांच्यावर कारवाई करू, असे पक्षाने सांगितले. मात्र, जगतापांना बाहेर काढले तर नगरला राष्टÑवादी भुईसपाट होईल. राष्टÑवादीने काढले तरी जगतापांना आता भाजपाचे दार उघडेच आहे.काँग्रेस या निवडणुकीत फायद्यात राहिली. काँग्रेसचे नेतृत्व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे करत होते. ‘लोकसभा निवडणुकीसाठी मी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो’, अशी वादग्रस्त भूमिका सुजय यांनी घेतली आहे. त्यांनी भाजपा-सेना यापैकी कुणालाही पाठिंबा दिला असता तर त्याचे वेगळे अर्थ काढले गेले असते. त्यामुळे ते चाणाक्षपणे तटस्थ राहिले. विखेंनीही यापूर्वी नगरला जिल्हा परिषदेत भाजपा-सेनेचा पाठिंबा घेतला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विषाची परीक्षा घेतली नाही. त्यांनी राष्टÑवादीलाही पाठिंबा देण्याचे धोरण घेतले नाही, हेही महत्त्वाचे. शिवरायांचा अवमान करणाºया श्रीपाद छिंदम याने सेनेला मतदान केले म्हणून एकीकडे या पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला मारहाण केली. दुसरीकडे महापौरपदासाठी त्याचे मतही मागितले. यातून सेनेचा दुतोंडीपणा उघड झाला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारण