शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

‘नारायण, नारायण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:57 IST

शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले तेव्हाच त्यांच्या लेखी राण्यांना फारशी किंमत नाही हे सा-यांच्या लक्षात आले.

शिवसेनेत मुख्यमंत्री आणि काँग्रेसमध्ये महसूल मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा भाजपात घुसून मंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न फसला. त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे त्यांना आपल्या घरी कित्येक तास वाट पाहायला बसवून ठेवून गाणे ऐकायला निघून गेले तेव्हाच त्यांच्या लेखी राण्यांना फारशी किंमत नाही हे सा-यांच्या लक्षात आले. या अमित शहांनी राण्यांना भाजपात येण्याऐवजी आपला वेगळा पक्ष काढण्याची व राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची सावध सूचनाच तेवढी केली. ‘भाजपात नाही पण त्याच्या वळचणीला येऊन थांबा’ असा या सूचनेचा अर्थ होता. मग राण्यांनी कोणत्याही पदलोलुप अगतिकाप्रमाणे आपला ‘महाराष्ट्र स्वाभिमान (?)’ पक्ष काढून तो रालोआत सामील केल्याची स्वत:च घोषणा केली. वर ‘मी मंत्री होणारच’ असे ते महाराष्ट्राला ऐकवीत राहिले. देवेंद्र फडणवीसही त्यांना कधी गोंजारत तर कधी चुचकारत राजी राखत व स्वत:जवळ ठेवत राहिले. पण राण्यांचे मंत्रिपद मात्र त्यांना हुलकावण्या देत दूरच राहिले. या काळात आपली आठवण महाराष्ट्राला राहावी म्हणून राणे मधूनच कधीतरी सेनेला तर कधी राष्ट्रवादी पक्षाला नावे ठेवताना दिसले. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मंत्रिपदासाठी एवढा लाचार झालेला व एवढे दिवस त्याकडे डोळे लावून बसलेला माणूस दुसरा झाला नाही. त्यांची एरवीची प्रतिमा ताठर माणसाची व मुत्सद्दी नेत्याची होती. त्यांच्याजवळ असलेल्या बक्कळ संपत्तीच्या भरवशावर त्यांनी स्वत:सोबत आपल्या दोन्ही मुलांना (भुजबळांच्या पावलावर पाऊल ठेवून) लोकसभेत व विधानसभेतही आणले होते. शिवाय मुलाला त्याची एक स्वाभिमानी म्हणविणारी संघटनाही त्यांनी काढून दिली होती. सा-या कोकणावर आपलीच महासत्ता असल्याच्या तो-यात ते वावरत होते. मात्र गेल्या निवडणुकीने त्यांची पार दैना केली. ते पडले, एक मुलगा पडला आणि त्यांच्या दुस-या मुलालाच तेवढे निवडून येणे जमले. (हेही भुजबळांसारखेच झाले) पण सत्तेची पदे अनुभवलेल्या या पुढा-याला ती पदे सतत खुणावतच राहिली. सत्तेत राहिलो तरच सन्मानासह सारे मिळविता येईल अशी मानसिकता असणा-यांच्या वाट्याला आलेली ही दीनवाणी अवस्था जनमानसात त्यांच्याविषयी करुणा जागविणारी नक्कीच आहे. पण भाजपावाले नाठाळ आहेत. ते राण्यांना खेळवतात आणि सेनेचे ठाकरे त्यांना सरकारच्या दाराबाहेर ठेवण्यात आपली सारी ताकद खर्ची घालतात. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षातील नेते हा केविलवाणा खेळ पाहतात आणि न बोलता आपली करमणूक करून घेतात. राण्यांची अशी अवस्था होण्याचे एक कारण त्यांच्या मागे लागलेल्या इकॉनॉमिक डायरेक्टोरेटच्या चौकशांचे लचांड हे आहे. आपण सत्तेबाहेर आहोत तोवर या चौकशीतील माणसे आपला माग काढणार आहेत याची राण्यांना जाणीव आहे. सध्या या डायरेक्टोरेटचा धाक सत्तेबाहेरच्या साºयाच राजकारणी माणसांना आहे. (ते भुजबळांची स्थिती पाहतही आहेतच) त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर रालोआमार्फत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जाणे ही राण्यांची तातडी आहे. मात्र फडणवीसांचे सरकार सेनेच्या पाठिंब्यावर उभे असल्याने आणि सेनेचा भुजबळांएवढाच राग राण्यांवरही असल्याने तो पक्ष आपल्या सगळ्या मावळ्यांनिशी त्यांच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहे. एकेकाळी ‘सेना नसली तरी आम्ही आहोत’ असे म्हणणारे शरद पवारही राण्यांसाठी तसे म्हणायला सध्या राजी नाहीत. आपण कोणालाच कसे चालत नाही, याचा विचार अशावेळी राण्यांच्याही मनात येत असावा. मात्र त्यांच्यासारखी माणसे आपल्या आत्मपरीक्षणाला फार उशिरा तयार होतात हेच यातले दुर्दैव.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाkonkanकोकण