शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाखातर पत्नीची हत्या, न्यायालयाचा निवाडा अन् इच्छामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:36 IST

वर्षानुवर्षे मृत्युशय्येवर खितपत राहण्याऐवजी चांगल्या परिस्थितीत मृत्यू यावा, असे इच्छापत्र बनविण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असला पाहिजे आणि देशभरात ही तरतूद असावी, अशी मागणी आहे. अनावश्यक वैद्यकीय उपचार थांबवून नैसर्गिक मृत्यू यावा हा यामागील विचार आहे.

- सविता देव हरकरेस्कॉटलॅण्डच्या आयरशायरमध्ये पत्नीची हत्या करणाºया एका इसमाची निर्दोष सुटका करताना त्या व्यक्तीने पत्नीवरील प्रेमाखातर हे कृत्य केले असल्याचा निवाडा तेथील न्यायालयाने दिल्याने साºया जगाचे लक्ष या निर्णयाकडे वेधले गेले आहे.६७ वर्षीय इयान गॉर्डन यांना पत्नीच्या हत्येनंतर गेल्यावर्षी तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांनी आपली पत्नी पेट्रिसियाची तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा आरोप होता. पेट्रिसिया मागील अनेक वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करीत होत्या. आपल्या पत्नीला असे कणाकणाने मृत्यूला सामोरे जाताना बघून गॉर्डन यांचा जीव कासाविस होत होता. त्यामुळे अगतिकतेत त्यांनी पत्नीला या त्रासातून मुक्त करण्याच्या हेतूने हे टोकाचे पाऊल उचलले. पेट्रिसिया यांचीसुद्धा जगण्याची इच्छा नव्हती, अशी माहिती या दाम्पत्याच्या मुलाने न्यायालयाला दिली होती. मानवी जीवनातील गुंतागुंत समजून घेणे अत्याधिक कठीण आहे. गॉर्डन प्रेमापोटी आपल्या पत्नीस मारण्यास तयार झाले होते. ४३ वर्षांच्या सहजीवनानंतर हा निर्णय घेताना त्यांच्या जीवाची प्रचंड घालमेल झाली असणार, असेही मत न्यायालयाने नोंदविले आहे. असेच एक आगळेवेगळे प्रकरण भारतातही चर्चेत आहे. मुंबईतील लवाटे दाम्पत्याने गेल्या महिन्यात थेट राष्टÑपतींकडेच इच्छामरणाची याचिका केली आहे. हे दाम्पत्य ३० वर्षांपासून इच्छामरणाची परवानगी मागत आहे.देशात आमच्यासारखे आणखी अनेक जण इच्छामरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आपण सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांचा सुखाने जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी विनवणी त्यांनी केली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत दया दाखविली नाहीतर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा या दाम्पत्याने दिला आहे. लवाटे दाम्पत्याची ही याचिका विचारात घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण आपल्या देशात अद्याप अप्रत्यक्ष इच्छामरणाचाच (पॅसिव्ह युथनेशिया) मार्ग मोकळा झालेला नाही. पण या दोन्ही घटना इच्छामरणाच्या प्रश्नावर नव्याने विचार करण्यास बाध्य करणाºया आहेत.भारतात गेल्या अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी होत आहे. पण हा संपूर्ण प्रकारच अत्यंत गुंतागुंतीचा असल्याने शासनही यासंदर्भात सावध पावले उचलत आहे. या दिशेने एक नवे विधेयक प्रस्तावित असून इच्छामरणाचा गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाने विशेष समिती स्थापन करावी, अशी तरतूद त्यात आहे. त्याचप्रमाणे तथ्यांची मोडतोड करून माहिती दिल्यास संबंधित व्यक्तीस १० वर्षांचा कारावास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. गंभीर आजाराने ग्रासलेले अन् कोणत्याही वैद्यकीय उपचारास प्रतिसाद न देणारे रुग्ण इच्छामरणाचा अर्ज करू शकणार आहेत. या विधेयकात अर्थातच सक्रिय इच्छामरणास (अ‍ॅक्टिव्ह युथनेशिया) मात्र थारा असणार नाही. तो असूही नये. पण प्रत्येक व्यक्तीला जसा चांगले जगण्याचा अधिकार आहे तसाच तो चांगल्या परिस्थितीत मृत्यूचाही असावा. निव्वळ वैद्यकीय उपचारांच्या आधारे आयुष्य वाढविणारे अनेक रुग्ण असतात. अनेकांना मग हे जीवन नकोसे होते. पण कायद्याच्या बंधनामुळे स्वेच्छामरण घेता येत नाही. अशा असंख्य रुग्णांना सन्मानपूर्वक मरणाचा पर्याय खुला व्हावा, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. त्यांच्या मागणीवर योग्य निर्णय झाला पाहिजे.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून