शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:04 IST

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांमधील २३८७ गाळ्यांचे थकीत भाडे, नवीन करार, त्याचा दर आणि लिलावाची प्रक्रिया यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करणे राज्य शासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना अवघड होऊन बसले आहे.

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांमधील २३८७ गाळ्यांचे थकीत भाडे, नवीन करार, त्याचा दर आणि लिलावाची प्रक्रिया यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करणे राज्य शासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना अवघड होऊन बसले आहे. चार वर्षांपासून हा प्रश्न भिजत घोंगडे बनला असून व्यापाºयांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे. कुटुंबीयांसह मूक मोर्चा काढून , बंद पुकारून व्यापाºयांनी आक्रोश व्यक्त केला आहे.नगरपालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी या उदात्त हेतूने सुरेशदादा जैन यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याने जळगाव शहरात तब्बल १८ व्यापारी संकुले उभारली. जळगावला व्यापाराची असलेली परंपरा या संकुलांमुळे वृद्धिंगत झाली. सोने, कपडे, धान्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मराठवाडा, विदर्भ, नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेशातून नागरिक जळगावला येत असत. मध्यंतरी जकात, आॅक्ट्रॉय, व्हॅट, एलबीटी अशा करपद्धतीतील बदलाचा फटका जळगावच्या पेठेलाही बसला.महापालिकेच्या काही व्यापारी संकुलांतील गाळेकराराची मुदत २०१२ मध्ये संपली. नवीन करार करताना कोणता दर असावा, किती वर्षांचा करार असावा याविषयी व्यापारी आणि महापालिका यांच्यात चर्चा सुरू असताना राजकारणाचा शिरकाव झाला आणि गाळेकराराचा विषय चिघळला. पक्षीय राजकारण इतक्या टोकाला गेले की, व्यापारी संकुल हे मुळात महसूल विभागाच्या जागेवर असल्याने महापालिकेला या व्यापाºयांकडून भाडेच वसूल करता येणार नाही, असा युक्तिवाद केला गेला. महसूल विभागाकडून महापालिकेला तशा आशयाची नोटीसदेखील बजावण्यात आली. सरकारदरबारी हा विषय पोहोचविण्यात आला. दरम्यान, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेला. मात्र सगळीकडे गाळेकरार हा व्यापारी आणि महापालिका यांच्यातील व्यवहार असल्याबद्दल शिक्कामोर्तब झाले. या निकालानंतर महापालिका प्रशासनाने थकबाकीपोटी पाचपट दंड, नवीन करारासाठी रेडीरेकनरचा दर आणि ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निकालानंतर हा विषय मार्गी लागायला हवा, परंतु त्यात राज्य शासन, महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणाची भूमिका स्वीकारली गेल्याने प्रश्न चिघळत आहे. २०१२ पासून गाळेभाडे मिळालेले नाही, नवीन करार न झाल्याने मोठी रक्कम अडकून पडली आहे. ही रक्कम मिळाल्यास महापालिकेवर हुडकोचे असलेले कर्ज परतफेड करता येईल, अशी महापालिका पदाधिकाºयांची भूमिका आहे. महापालिकेने पाचपट दंडाची दिलेली नोटीस अवाजवी असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे, न्यायालयाच्या निकालानंतर याविषयी कोणती भूमिका घ्यावी, याविषयी चार महिन्यांपासून राज्य शासनाच्या नगरविकास, विधी व न्याय आणि अर्थ या विभागात खल सुरू आहे. केवळ जळगावसाठी निर्णय घेता येणार नाही, तर कोल्हापूर, नाशिकसह अनेक पालिकांमध्ये असा प्रश्न आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णयाविषयी सरकारचा ‘अभ्यास’ अद्याप सुरू आहे. भाजपाच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांची मात्र गोची झाली आहे. एकीकडे आपलेच सरकार तर दुसरीकडे मतदार, भूमिका कोणती घ्यावी हा पेच आहे. मोर्चात सहभागी होऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.