शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’त भारतीय उपखंडाच्या खाद्यशैलीला दाद; दिसली कच्ची कैरी, वरण-भात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 09:16 IST

भारतीय जेवण म्हणजे बटर चिकन, करी आणि कोर्मा नव्हे, हे जस्टीन नारायणसारखे शेफ जगासमोर सिद्ध करताहेत, हे उत्तमच!

भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा यंदाचा विजेता ठरला आहे जस्टीन नारायण हा भारतीय वंशाचा तरुण. जस्टीनचे यश ही भारतीय उपखंडाच्या खाद्यसंस्कृतीला दिलेली दाद आहे. जगभर प्रसारित होणाऱ्या फूड रिॲलिटी शोजमध्ये मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यामुळे जस्टीन विजेता झाल्याबरोबर समाजमाध्यमांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली. स्पर्धा जिंकल्यावर त्याला तब्बल एक कोटी साठ लाख रुपये मिळाले. इतर अनेक फायदे. खाद्य व्यवसायाच्या क्षेत्रातल्या अनेक संधी त्याला आता मिळू शकतात. कँडी पेटेटो टाको किंवा ब्री चीझ आइस्क्रीमसारखे अफलातून पदार्थ सादर करणारा जस्टीन भारतीय पदार्थ तितक्याच सहजतेने करतो. लहानपणी आईने भरवलेला वरण-भात (दाल-राईस) असो की, लहानपणी खालेल्ली कच्ची कैरी, जस्टीनच्या स्वयंपाकात डोकावत राहते.

भारतीय जेवण म्हणजे बटर चिकन, करी आणि कोर्मा, असा एक फार मोठा गैरसमज भारताबाहेर आहे; पण रिॲलिटी शोजमध्ये भाग घेणारे जस्टीनसारखे अनेक जण हा समज खोटा ठरवत आहेत. डाळभातासारखे साधे पोटभरू खाणे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, ग्रेव्हीज, रोटी नानचे प्रकार;  मास्टरशेफच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जस्टीनबरोबर दुसरी फायनलिस्ट होती किश्वर चौधरी. बांगलादेशात मूळ असलेल्या किश्वरने फायनल राउंडला पाँता भात आणि आलू भोरता ही डिश सादर केली. पाँता भात हलक्या आंबवलेल्या पाण्यात बनतो. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन्ही ठिकाणचे हे गरिबाघरचे खाणे. आदल्यादिवशी रात्री उरलेल्या भाताचा दुसऱ्या दिवशी पाँता भात बनतो. हा पदार्थ तिने ‘smoked rice water’ अशा फॅन्सी नावाने सादर केला. तिच्या या कृतीत तिला तिचे मूळ, बांगलादेशचा इतिहास, परिस्थिती आणि खाद्यसंस्कृती याबद्दल बरेच काही सांगायचे होते. तिची पाककृती सोशल मीडियावर व्हायरल होताच मराठी मंडळी फोडणीची पोळी nutty crushed bread म्हणून सादर करायला मोकळी झाली म्हणायची. 

या आधीच एक मराठी तरुण मास्टरशेफच्या पाचव्या पर्वात गाजला. ऋषी देसाई. मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूरला महाराष्ट्राच्या खाद्य जीवनात विशेष स्थान. ऋषीने मास्टरशेफ जिंकली नाही तरी इथे मिळालेल्या अनुभवाचा फायदा करून त्याने स्वतःचा फूड शो चालवला. शिवाय  भारतीय खाद्यपदार्थांबद्दल त्याचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले. 

फॅमिली मॅन या गाजलेल्या वेब शोमधले एक पात्र चेन्नईला गेल्यानंतर म्हणते, आज मला साउथ इंडियन खायचे आहे! त्यावर तिथला स्थानिक चिडून म्हणतो, ‘हे बघ, दक्षिण भारतात पाच राज्ये आहेत, तुला नेमके काय खायचे आहे?’- असेच काहीसे भारताबाहेरच्या भारतीय जेवणाबद्दल आहे. भारतात प्रांतागणिक, समाजागणिक, चालीरीतीगणिक खाद्यसंस्कृती बदलते. ती फक्त करी कल्चरच्या एका नावाखाली प्रसिद्ध झाली ती परदेशी उघडलेल्या पंजाबी उपाहारगृहांमुळे. त्यात  भर पडली  उडुपी रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या इडली, दोसा या प्रकारांमुळे; पण भारतीय जेवण किती वेगवेगळ्या स्वरूपात सादर होऊ शकते, हे आता अशा रिॲलिटी शोजमुळे जगासमोर येत आहे. शशी चेलय्या या मूळच्या तामिळ बल्लवाचार्याने मास्टरशेफच्या दहाव्या पर्वात विजेतेपद मिळवले. सिंगापूरला आईच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शशी ऑस्ट्रेलियात आला. त्याच्या भारतीय आणि चायनीज पाककृती विशेष गाजल्या. 

मास्टरशेफच्या अनेक देशात आवृत्या निघाल्या; पण ऑस्ट्रेलियाची लोकप्रियता इतर कुणालाही लाभली नाही. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांचा समूह आहे. त्यामुळे सादर होणारे पदार्थ विविधांगी असतात. स्पर्धेचे जजेस स्वतः शेफ असतात, खाद्यपदार्थ जोखताना, त्यातील घटक, चवीचे संतुलन (टोकाच्या तिखट, आंबट, खारट चवी नसतानाही, वेगळ्या चवी असणे महत्त्वाचे), सादरीकरण अशा सगळ्या बाबतीत दादा असलेली मंडळी इथे येतात. इतक्या दिमाखदार शोमध्ये जस्टीनला मिळालेले यश  भारतीयांना निश्चितच सुखावणारे आहे.

bhalwankarb@gmail.com

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाIndiaभारतfoodअन्न