शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विवाह हा ‘संस्कार’, तर लिव्ह इन रिलेशनशिप केवळ ‘व्यवहार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 09:12 IST

उत्तरदायित्व नको असलेले संबंध ही लिव्ह इन रिलेशनशिपची पूर्वअटच होय! ज्यात फक्त दोनच व्यक्ती असतात, कुटुंब नसते; तो विचार ‘भारतीय’ नाहीच!

- विजया रहाटकरभाजप राष्ट्रीय सचिव,(माजी अध्यक्षा, महाराष्ट्र महिला आयोग)

देशभरात लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भरपूर चर्चा सुरू आहे. त्यात व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकापासून  संस्कृतीरक्षकांचा लिव्ह इन रिलेशनशिपला पूर्ण विरोध, अशी टोकाची मते व्यक्त होताना दिसतात. पण भारतीयांनी आधुनिक जीवनशैली अंगीकारताना त्यातले सांस्कृतिक अंग विसरलेच पाहिजे, असे  नव्हे. भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्याला निश्चित महत्त्व आहे. यात व्यक्ती, मतं, धर्म, अभिव्यक्ती या सर्व स्वातंत्र्यांचा समावेश नक्की आहे. पण व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक मात्र  अजिबात अभिप्रेत नाही.  भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्य आणि समष्टी विचार - विकास यात परस्पर सहयोग दिसतो. 

मुळात लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये तरी कशी आली आणि कशी रुजली?-  त्यामागे कुटुंबेतर व्यक्ती संस्थात्मक विचार अधिक आहे. जो विचार भारताचा नव्हे! कारण कुटुंब  हे तर भारतीय संस्कृतीचे खरे वैशिष्ट्य!  भारतीय संस्कृतीत जे चार आश्रम मानले गेले आहेत, त्यामधला मुख्य  गृहस्थाश्रम हा कुटुंब प्रणालीचा हा अपरिहार्य घटक आहे. कुटुंब प्रणालीत  उभय मान्य वैवाहिक संस्कार संबंधांना अधिक महत्त्व आहे, अधिकृतता आहे! यात “संस्कार” या शब्दाला अधिक महत्त्व आहे. कारण विवाह हा भारतीय विचारानुसार “संस्कार” आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिप हा “व्यवहार” आहे!! इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास लिहिताना “कुटुंब” घटकावर या अर्थाने विशेष भर दिला आहे. 

 केवळ पाश्चात्य संकल्पना म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपवर आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि तसा हेतूही नाही. पण ज्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये फक्त दोनच व्यक्तींचा विचार आहे आणि कुटुंब विचार हा त्यात अनुस्युत नाहीच, तो विचार भारतीय नाही.  स्त्री सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा घटक इथे दुय्यम स्थानावर जातो. कोणाही जीवाची, विशेषतः महिलेच्या जीवाची किंमत मोजून लिव्ह इन रिलेशनशिप हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही! जर महिलाच सुरक्षित नसेल, तर लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेलाच छेद जातो. शिवाय स्त्री-पुरुषामधले नाते निर्माण करताना, टिकवताना आणि फुलवताना जी मूलभूत सपोर्ट सिस्टिम लागते, ती भारतीय कुटुंब संस्था विवाह या “संस्कार” संकल्पनेतून मिळवते. आज कुटुंबे विभक्त झाली आहेत. ही सपोर्ट सिस्टिमच डळमळीत झाली आहे. 

 अनेकदा कौटुंबिक उत्तरदायित्व नको म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडला जातो, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. उत्तरदायित्व नको असलेले संबंध ही लिव्ह इन रिलेशनशिपची पूर्वअट किंबहूना व्याख्या असता कामा नये. लिव्ह इन रिलेशनशिपमधूनच गेल्या काही वर्षांमध्ये महानगरांमध्ये ज्या अमानुष घटना घडल्या, त्यातला एक महत्त्वाचा धागा कुटुंबाच्या पाठिंब्याअभावी  निर्माण झालेल्या महिला असुरक्षिततेचा आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधून महिला सुरक्षितता हा घटक दुर्लक्षित राहणे अक्षम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे लिव्ह इन रिलेशनशिपला आज अप्रत्यक्षपणे भले कायदेशीर मान्यता असेल, पण त्याबाबत स्वतंत्र कायदा झालेला नाही. तो जितका लवकर होईल, तितके चांगले!  पण तरीही कुटुंब जीवन हे भारतीय विचार प्रणालीतले परिपूर्ण जीवन आहे आणि ते आधुनिक काळातही भारतीय राज्यघटनेचा लेटर अँड स्पिरिटमध्ये अवलंब करतानाही मान्य केले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न