शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

मराठा राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा!

By अतुल कुलकर्णी | Updated: December 11, 2017 00:58 IST

मराठा पार्टी ही राष्ट्रवादीची प्रतिमा पुसण्यास जर मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे.

सरत्या आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांना विधानसभेची लॉटरी लागली. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर लाड निवडून आले. काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन तर राष्ट्रवादीने यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल यात्रा काढली. राज्यात दोन्ही काँग्रेस सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या असताना मुंबईत मात्र दोन्ही काँग्रेसची मिळून नऊ मतं भाजपाच्या पारड्यात पडली. त्यातली तीन मतं जगजाहीर होती. नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे दोन काँग्रेसी आमदार आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या असल्या तरीही दोन्ही काँग्रेसच्या सहा मतांवर भाजपाने हल्लाबोल केला. त्यासाठी कोणाला कोणत्या देवाचा प्रसाद मिळाला याची चर्चा आता रंगली आहे. भाजपाची रणनीती यशस्वी ठरली अशा कौतुकाच्या बातम्याही सुरू झाल्या. पण प्रसाद वाटप चालू असताना कोणी हात पुढे केला तर त्यात नवल ते काय? देणा-यानेच साधनसुचिता ठेवली नसेल तर घेणा-याला तरी का दोष द्यायचा? आपल्या पक्षाचे नेते रोज दहा पंधरा किलोमीटरची पायपीट करत आंदोलन करत असताना काही आमदार सरकारी पक्षाच्या गळ्यात गळे घालतात याची चिंता मात्र आता दोन्ही काँग्रेसने करण्याची वेळ आली आहे.हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीला राज्यभर नेता येईल असा चेहरा धनंजय मुंडेच्या रूपाने मिळाला आहे. या हल्लाबोल यात्रेत जो प्रतिसाद धनंजय मुंडेंना मिळतोय तेवढा राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना मिळताना दिसलेला नाही. विदर्भात एका शेतकºयाने आपल्या उभ्या कापसावर ट्रॅक्टर चालवा आणि शेत मोकळं करा अशी भावनिक सादही धनंजय मुंडेंना सुप्रिया सुळेंच्या समोर घातली. त्याचे कारण सरळ आहे. मुंडेंची पाटी कोरी आहे. त्यांच्या आक्रमकपणामुळे ते काहीतरी करून दाखवतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आधीचे नेते ‘टेस्टेड’ आहेत. त्यांच्या मर्यादा आणि क्षमता पंधरा वर्षात जनतेने पाहिल्या आहेत. म्हणूनच या हल्लाबोल यात्रेत म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही हे लक्षात येताच काही नेत्यांवर पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन चार किलोमीटरचा प्रवास केल्याच्या बातम्या देण्याची वेळ आली.आर.आर. पाटील पक्षाचा चेहरा असतानाही त्यांना त्यावेळी पक्षाने कधी तसे प्रोजेक्ट केले नव्हते. त्याचे भले बुरे परिणाम पक्षाला भोगावेही लागले. आता लोक धनंजय मुंडेंना पहायला, ऐकायला येत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या कामाचे मूल्यमापन वेगळ्या विश्लेषणाचा भाग असला तरी आज लोक त्यांच्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काळाची ही बदललेली पावले ओळखूनच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला बारामती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंडेंच्या प्रचारसभा ठेवाव्या लागल्या. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आणि विविध निवडणुकांसाठी सातत्याने मुंडे राज्यभर फिरत आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे त्यांना पुढे करत आहेत. यानिमित्ताने मराठा पार्टी ही प्रतिमा पुसण्यास मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे. शिवाय मुंडेंच्या रूपाने ओबीसींचा नेता उभा रहात असेल तर त्याचा फायदा ओळखण्याइतके पवार कुटुंबीय चाणाक्ष आहेत. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र