शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

यंदाचा महाराष्ट्र दिन झाला श्रमाचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:41 AM

सर्व गदारोळात साजरा झाला तो ५८ वा महाराष्ट्र दिन. हा महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील अनेक आश्वासक गोष्टी माझ्यासमोर आल्या.

- डॉ. उदय निरगुडकर(न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक)या आठवड्यात एकीकडे भाजप-शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू होती. दुसरीकडे कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला होता. १५ मिनिटं वादविवाद करा, असं राहुल गांधींचं मोदींना आव्हान आणि विश्वेशरय्या शब्द नीट बोलून दाखवा, तुमच्या आईच्या भाषेत का होईना कर्नाटकातील प्रश्नांवर चार शब्द मांडा, असं मोदींचं प्रतिआव्हान. कोण किती वादग्रस्त बोलतो यासाठी भाजपच्या वाचाळवीरांमध्ये तर अक्षरश: स्पर्धा लागलीय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरून दिल्लीत मानापमान नाट्य घडलं. पत्रकार जे. डेंच्या हत्येचा निकाल तब्बल सात वर्षांनी लागला,आणि छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली. दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी फुकटात दूध वाटायला सुरु वात केलीय. या सर्व गदारोळात साजरा झाला तो ५८ वा महाराष्ट्र दिन. हा महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील अनेक आश्वासक गोष्टी माझ्यासमोर आल्या.यंदाचा महाराष्ट्र दिन वेगळा होता. कारण एरवी बांधाच्या वादात पिढ्यान्पिढ्या भांडणारी माणसं त्यादिवशी एकमेकांच्या शेतात जाऊन बांधबंदिस्तीची कामं करत होती. चºया काढत होती. पण जलसंधारणाच्या निमित्तानं त्यांचं मनसंधारण झालं. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानं गावागावात उत्साह ओसंडून वाहताना दिसला. पाणी फाऊंडेशननं सुरू केलेली पाण्यासाठीची ही चळवळ आज गावखेड्यात पसरलीय. वर्षानुवर्षे दुष्काळानं होरपळलेल्या गावांना पाण्याचं महत्त्व समजलंय. म्हणूनच भल्या पहाटे गावागावांत शेकडो लोकांची पावलं श्रमदानाच्या कामासाठी माळरानाकडे, शेतशिवाराच्या दिशेनं पडतायत. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसतात त्या गावातल्या महिलांना. ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी आमिर खानसारखा अभिनेता झटतोय. त्याचे चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होतात. ते सुपरहीट करण्यासाठी त्याला उन्हातान्हात हातात कुदळ, फावडं घेऊन स्टंटबाजी करण्याची गरज नाही. दुष्काळानं पिचलेल्या गावातल्या लोकांना त्याच्या कामात खरेपणा दिसला असेल म्हणूनच आज त्यांनी आमिरच्या हाकेला ओ दिलीय. आपण ज्यासाठी कुदळ हातात घेतलीय, त्याचं फळ वरुण राजा निश्चितच देणार, याची त्यांना खात्री आहे.पॅडवुमन स्वातीताईस्वाती बेडेकर मूळच्या महाराष्ट्रातल्या आता गुजरातमध्ये ग्रामीण भागात जाऊन काम करतायत. तिथं विज्ञान शिक्षिका म्हणून काम करताना वयात येणाºया मुलींचे प्रश्न लक्षात यायला लागले. मासिक पाळी आणि त्यासंदर्भात घ्यायला हवी ती काळजी याबद्दल जी अनास्था होती ती पाहून त्या अस्वस्थ झाल्या. या विषयीचे गैरसमज दूर करत असतानाच त्याच महिलांना सोबत घेऊन स्वातीतार्इंनी सॅनिटरी पॅड बनवायची युनिट्स सुरू केली. त्या सर्व महिलांना स्वयंसिद्धा बनवलं. या कार्याची सुरुवात चक्क गावातील हनुमान मंदिरातून झाली हेदेखील अचंब्याचं. टं्र२ि ्रल्ल कल्ल्िरं ३ङ्म ेंीि ्रल्ल कल्ल्िरं हा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन सगळ्यांपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचला. त्याआधी कित्येक वर्षे आपल्या स्वाती बेडेकर गुजरातच्या ग्रामीण भागात पॅडवुमन म्हणून अढळस्थान प्राप्त करून आहेत.जगावेगळे ध्येयवेडेकृष्णकांत माने स्वत: दृष्टिहीन. परंतु हे झालं शारीरिक. त्यांच्या अंत:चक्षूंना जे दिसलं ते भल्याभल्यांना करता आलं नाही. आयटी क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन आयआयटीत काम करणारा हा तरुण प्रोफेसर. गावोगावी जाऊन तिथल्या माणसांना कॉम्प्युटर आणि इंटरनेट त्यांच्या रोजच्या जीवनात कसं उपयोगी पडतं, या विषयांवर मार्गदर्शन करतोय. सर्व टेक्नॉलॉजी मोफत मिळायला हवी, यासाठी डिजिटल फ्रिडम फाऊंडेशन ही संस्था त्यानं सुरू केलीय. बदल घडवतोय.रस्त्यावरचे भिकारी पाहिल्यानंतर आपण फूटपाथ बदलतो. त्यात जर तो भिकारी लुळापांगळा असेल तर तिकडे बघणदेखील टाळतो. इथचं पुण्याच्या डॉ. अभिजित सोनावणे यांना आपल्या आयुष्याचं ध्येय सापडलं. ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ या संस्थेची स्थापना करत त्यांनी भिक्षेकºयांना मोफत वैद्यकीय सेवा द्यायला सुरु वात केली. काम जगावेगळं आणि अत्यंत कठीण होतं. आतापर्यंत ५०हून अधिक भिक्षेकºयांना भीक मागण्यापासून परावृत्त करत त्यांनी स्वत:चे व्यवसाय सुरू करून दिलेत.एकीकडे डॉक्टरांचे काळे धंदे समोर येत असताना समाजाची काळी बाजू दूर करण्याकरिता अभिजित सोनावणे आपला वेळ देताहेत, कष्ट करताहेत हे फार आश्वासक आहे. नाशिकमधील डॉ. भरत केळकर खरंतर प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ, स्वत:च सुसज्य हॉस्पिटल आणि दणकून प्रॅक्टिस. पण तरीही केळकर आपलं सामाजिक भान विसरले नाहीत. त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत गरजूंना मोफत औषध वाटायचं काम ते गेली दोन दशकं करताहेत.‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय सेवा देणा-या सेवाभावी संस्थेचे डॉ. केळकर नोंदणीकृत कार्यकर्ते बनले ते याच भावनेतून. सिरिया, जॉर्डन, येमेनच्या युद्धकहाण्या आणि तिथली हलाखीची परिस्थिती आपण चॅनलवर रोज पाहत असतो. आसपासचा भाग बॉम्बनी उद्ध्वस्त होत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉ. केळकर तिथं रुग्णांवर उपचार करताहेत. युद्धात होरपळलेल्या लोकांना दिलासा देताहेत. त्यांची भाषा येत नसताना त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद संपादन करताहेत.तिकडे जळगावमध्ये यजुवेंद्र महाजन हा ध्येयवेडा तरुण विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन थक्क करावं असं काम करतोय. मातेच्या स्तरावर जाऊन तो काम करतो, प्रज्ञाचक्षू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच पालकत्व यजुवेंद्र घेतो, त्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. तिकडे ठाणे जिल्ह्यातील विक्र मगड, जव्हार या ग्रामीण भागात मिलिंद थत्ते आदिवासींमध्ये काम करतोय, कोणताही गाजावाजा न करता, लोकशाही मार्गाने आपले अधिकार मिळवण्यासाठी त्यानं एक चळवळ उभी केली आणि आज रचनात्मक कार्याचा पाया या भागात उभा केला.बँकेत असणारी सर्वसामान्य महिला ही सीमेवर लढणा-या जवानांची अनूमावशी किंवा अनूआंटी होऊ शकते, हे पुण्यात स्थायिक झालेल्या अनुराधा प्रभू-देसार्इंनी सिद्ध केलं. कारगील दिनाला कारगीलमधील त्यांची उपस्थिती शेकडो जवानांसाठी, सेनादलाच्या अधिकाºयांसाठी गौरवाचा विषय असते. आपले जवान प्रतिकूल परिस्थितीत काम करतात त्याची जाणीव तरु ण पिढीला व्हावी म्हणून त्या दिवसरात्र झटताहेत. लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांशी त्यांनी पारिवारिक नातं जोपासलंय. त्यांचं कर्तृत्व आणि काम संमोहित करणारं आहे.पाणी हा आज आणि उद्याचा सर्वात मोठा प्रश्न असणार, हे तर आज स्पष्टच झालंय. तामिळनाडूसाठी पाणी सोडा असा कोर्टानं आदेश देताक्षणी आमच्याकडे द्यायला कावेरीत पाणी कुठे आहे, अशी भूमिका कर्नाटकनं मांडली. यापुढची लढाई ‘पाणी’पताची असणार आहे, हे केव्हाच सिद्ध झालंय. नद्या, त्यांच्या आजूबाजूची संस्कृती आणि त्याचं पुनरु ज्जीवन यावर विलक्षण आत्मीयतेनं आणि प्रचंड संशोधक वृत्तीनं परिणिता दांडेकर काम करतायत. नद्यांसाठी नुसतं उत्सवी न राहता प्रत्येक नदीचं अंतरंग ओळखून त्या करत असलेलं काम निव्वळ अफलातून आहे. मराठवाड्यातील डॉ. शीतल सोमाणी, मूळच्या डेन्टिस्ट. मारवाडी कुटुंबातल्या. पण शेतकºयांसाठी परवडेल आणि उपयुक्त ठरेल असं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलंय. या संशोधनासाठी अमेरिकेतील डेल कंपनीनं त्यांना तब्बल ६० हजार डॉलर्सचा पुरस्कार दिला. केवढा प्रचंड उत्साह आहे या शीतल सोमाणींमध्ये.थॅलेसेमिया हा रक्ताचा दुर्धर आणि आनुवंशिक रोग. अशा रु ग्णांना आजन्म रक्तपुरवठा,औषधोपचार, चाचण्या यांची आवश्यकता असते. मग, गरीब परिस्थितीतील रु ग्णांना हे कसं परवडणार? आज मुंबईच्या सुजाता रायकर अशा शंभरहून अधिक मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी आनंदानं निभावताहेत. अशा रु ग्णांची आई बनण्याचं भाग्य त्यांना मिळालं यात त्या धन्यता मानताहेत. भारतातील ५० हजारांहून अधिक गावांची माहिती जमवून त्या गावात आपल्या ‘ग्यान की’ प्रकल्पांतर्गत दर्जेदार पुस्तकं आणि संगणक पोहोचवलेत ते प्रदीप लोखंडे या पुण्यातील ध्येयवेड्या माणसानं. दुर्दम्य आशावादी असणाºया प्रदीप लोखंडे यांचा अधिकतम वेळ हा विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जातो. ते काहीतरी चांगलं घडवण्यासाठी. १ मेच्या या आठवड्यात या सर्वांच्या कार्याला कडकडीत सलाम.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाsocial workerसमाजसेवकMaharashtraमहाराष्ट्र