शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

ते ‘चुकलेले गणित’,‘कोळसा घोटाळा’ झालाच नव्हता; पाहा कोळसा केंद्रीय सचिव अनिल स्वरूप यांची मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 8:46 AM

सध्याच्या कोळसा संकटाबाबत केंद्रीय कोळसा सचिव अनिल स्वरूप यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत.

सध्याच्या कोळसा संकटाबाबत केंद्रीय कोळसा सचिव अनिल स्वरूप यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत.

कोळसा क्षेत्राच्या अडचणी नेमक्या काय आहेत?  सातत्याने कोळसा कमी का पडतो? 

एकतर तथाकथित कोळसा घोटाळ्यानंतर सर्व खाणी लिलावाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. त्यात कोळसा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी कोल इंडिया  लिमिटेडवर जवळपास वर्षभर चेअरमनच नेमला गेला नव्हता. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय रखडले. शिवाय कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे वाघिणीही कमी पडत आहेत. 

 “तथाकथित घोटाळा” असा शब्दप्रयोग करता ?

हा घोटाळा नव्हताच. तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी केलेली ती हिशेबातली गडबड होती.  कोल इंडियाद्वारे विकल्या जाणाऱ्या कोळशाचा बाजारभाव आणि उत्पादन खर्चाची सरासरी याचा हिशेब घालून त्यांनी संभाव्य लाभ १.८ लाख कोटी सांगितला. जो बरोबर नव्हता.कोळसा किती खोलवरून काढला जात आहे, वाहतूक किती लांबवर करावी लागणार आहे आणि खाणीमध्ये कोळसा किती आहे, अशा अनेक गोष्टींवर कोळसा काढण्यासाठी येणारा खर्च  अवलंबून असतो.  त्यांनी सगळा हिशेब १९५ रुपये प्रतिटन फायद्याच्या हिशेबाने केला. वास्तवात  उत्पादन खर्च चारशे रुपयांपासून ३,५०० रुपये प्रतिटन इतका असतो. याची सरासरी काढून हिशेब करणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांनी काढलेला नफ्याचा  आकडा अवास्तव फुगला.

हा अहवाल सर्वोच्च न्यायालयानेही  स्वीकारला ?

विनोद राय यांनी २००४ पासूनची मोजदाद केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तर १९९० च्या दशकात झालेल्या कोळसा खाण वाटपाचे करारही रद्द केले. त्याचा मोठा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला. 

परंतु आपण तर कोळसा खाणींचे लिलाव केले. त्यातून सरकारला किती पैसा मिळाला? 

प्रारंभीच्या उत्साहामुळे लिलावाची एकूण रक्कम १.८ लाख कोटीपर्यंत पोहोचली. मात्र कालांतराने हे आकडे अवास्तव असल्याचे  बोली लावणाऱ्यांच्या  लक्षात आले. त्यामुळे माझ्या कार्यकाळात लिलाव रकमेच्या केवळ दहा टक्के इतकेच पैसे सरकारला मिळाले.

सरकारला ५० हजार कोटीसुद्धा मिळालेले नाहीत. म्हणजे कोळसा घोटाळा झालाच नव्हता? 

काही कंपन्यांना फायदा झाला असण्याची शक्यता आहे. परंतु महालेखापालांनी आपल्या अहवालात जी लाभाची आकडेवारी मांडली, ते वास्तवात केवळ  अशक्य होते. महालेखापालांनी आपला अहवाल संसदेत सादर करायचा असतो. त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने त्यांचा मनसुबा उघड झालाच होता.

कोळसा उत्पादनावर याचा काय परिणाम झाला? 

सर्वोच्च न्यायालयाने २०४ कोळसा ब्लॉक्सचे वाटप रद्द करून टाकले होते. त्यावेळी ४६ कोटी टन कोळशाचे उत्पादन होत होते. त्यातला नऊ कोटी टन कोळसा या खाणीतून येत असे. 

आज कोळशाचा तुटवड्याचे कारण हेच आहे का? 

तेव्हापासून आजपर्यंत विजेची मागणी सातत्याने वाढली आहे. पण २०१८ ते २०२० या काळात कोळशाचा पुरवठा मात्र ६० कोटी टनावर स्थिर राहिला. कोळसा उत्पादनातील वाढीचा दर २०१४-१५ मध्ये नऊ टक्के होता.  हा वेग कायम राहिला असता, तर आज कोल इंडिया लिमिटेडचे उत्पादन ८५ ते ९० कोटी टन इतके असते. मग कोळसा संकट निर्माण झालेच नसते.

कोल इंडियासमोर आर्थिक संकटही आहे काय?

२०१४-१५ मध्ये कोल इंडियाकडे असलेला ३५ हजार कोटींचा राखीव निधी सरकारने लाभांश वाटपात खर्च केला. आज केवळ आठ हजार कोटीचा राखीव निधी आहे; त्यापैकी बरेच पैसे देणेकऱ्यांनी थकवलेलेच आहेत. त्यामुळे खाणी सुरू करता येत नाहीत आणि कोळसा संकट सरत नाही.

तत्कालीन कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना नुकतीच शिक्षा फर्मावली गेली ?

खरेतर न्यायालयाच्या आदेशात खासगी कंपनीच्या आकड्यांवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत; एच. सी. गुप्तांवर नाही. परंतु कोळसा खाण वाटप समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जबाबदार धरले गेले. त्यांना शिक्षा दिली जात असेल तर समितीच्या इतर सदस्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे. कारण त्या निर्णयात तेही सहभागी होते. 

या  प्रकरणाचा नोकरशाहीवर काय परिणाम झाला? 

यानंतर अधिकाऱ्यांनी फायलींवर निर्णय घेणेच बंद करून टाकले. कोणी जबाबदारी घ्यायलाच तयार होत नव्हते. कारण एच. सी. गुप्ता यांच्याप्रमाणे शिक्षा भोगायची कोणाचीच तयारी नव्हती. आता केंद्र सरकारने नियमावलीत दुरुस्ती केली आहे.  एखाद्या निर्णयाचा लाभ एखाद्या अधिकाऱ्याला व्यक्तिगत स्तरावर झाला आहे हे सिद्ध होत नाही, तोवर त्याला शिक्षा होऊ शकत नाही.

कोळसा घोटाळ्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? 

कोळशाचे भाव वाढले. आपल्याला लागणाऱ्या कोळशाच्या जवळपास २० टक्के कोळसा महागड्या दराने आयात केला जात आहे. वीज उत्पादन कंपन्या आणि पोलाद कंपन्यांचा उत्पादन खर्च खूपच वाढला. त्यामुळे अनेकांना आपापल्या उद्योगाला टाळे ठोकावे लागले.

टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाIndiaभारत