शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Lok Sabha Election Result 2024 : तारे-तारकांचा ‘पोलिटिकल’ लखलखाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 09:52 IST

Lok Sabha Election Result 2024 : रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते.

- विनय उपासनी (मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई)

रूपेरी पडद्यावर आपली कला पेश करणारे तारे-तारका, क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेला राजकारणात ‘वापरून घेण्या’चा मोह कोण कसा टाळणार? मै हूँ भारत का नागरिक. बार बार नए लोगों को वोट देता हूँ लेकिन कुछ नहीं बदलता हैं. पाँच घंटे चलनेवाली मच्छर कॉइल के लिए कितने सवाल करते हो. लेकिन पाॅंच साल अपनी सरकार को एक सवाल तक नहीं करते, कुछ नहीं पुॅंछते...’ - गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘जवान’ या चित्रपटातील शाहरूख खानचा हा डायलॉग. या डायलॉगला आणि चित्रपटालाही लोकांनी डोक्यावर घेतले. थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पडला. कट टू... ६ जून २०२४. 

नुकत्याच लोकसभेवर निवडून गेलेल्या रुपमती अभिनेत्री कंगना राणावत यांना चंडीगड येथील विमानतळावर सुरक्षारक्षक महिलेने श्रीमुखात लगवल्याने गदारोळ उडाला. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या आपल्या आईला कंगना अनाबशनाब बोलल्याचा राग तिने  कंगनावर काढला. खरेतर वरील दोन्ही गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही. बॉलिवूडचा ‘किंग’ असलेला शाहरूख खान आणि बॉलिवूडची ‘क्वीन’ असलेली कंगना राणावत हे दोन्ही भिन्न टोकाचे कलाकार. मात्र, त्यांच्या भोवती असलेले तेजोवलय  सगळ्यांना आकर्षित करते. हे वलय कमीअधिक प्रमाणात सर्वच बॉलिवूड कलाकारांभोवती असते आणि त्याचा वापर  करता यावा, म्हणून त्यांना राजकारणात येण्याची गळ राजकीय पक्षांकडून घातली जाते. यंदा ही माळ कंगना राणावत या  अभिनेत्रीच्या गळ्यात पडली आणि ती सत्ताधारी पक्षाकडे वळती झाली. पुढचा सारा इतिहास काल-परवाच घडलेला आहे. 

रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते. अशा या तारामंडळांचा लाभ आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी करून  घेत संसदेतल्या आपल्या संख्याबळात भर घालावी, हा सुज्ञ विचार राजकीय पक्ष करणारच! बॉलिवूडचे आद्य घराणे असलेल्या कपूर खानदानापासून अमिताभ बच्चन यांच्यामार्गे कंगना राणावतपर्यंत सर्व मंडळींनी स्वातंत्र्यानंतरच्या सात-साडेसात दशकांत वेगवेगळ्या पक्षांतर्फे लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत हजेरी लावल्याचे दिसते. त्यांच्या उपस्थितीने संसद उजळून निघाली हे खरे, परंतु ही मंडळी ज्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत होती, त्या मतदारसंघांमध्ये काय दिव्य प्रकाश पडला, हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकतो. 

राज कपूर, नर्गीस हे दोघेही राज्यसभा सदस्य होते. त्यानंतर ही यादी सुनील दत्त, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, विनोद खन्ना, हेमा मालिनी, गोविंदा यांच्यापास्सूनन, किरण खेर, सनी देओल, मनोज तिवारी, रवि किशन, स्मृती इराणी, अरुण गोविल, कंगना राणावत या नव्या जुन्या अभिनेत्यांपर्यंत पसरट होत जाते. चेतन चौहान, गौतम गंभीर आणि आता युसूफ पठाण यांच्यासारखे क्रिकेटविश्वातील तारेही राजकीय पक्षांनी जवळ केले आहेत. 

प्रादेशिक भाषांमधील अभिनेत्यांनाही राजकीय क्षेत्र वर्ज्य नसल्याचे वेळोवेळी दिसले आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्ये तर त्यासाठी अधिक सुपीक समजली जातात. जयललिता यांनी तर थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. शिवाजी गायकवाड अर्थात आपला रजनीकांत यालाही राजकारणात येण्याचा मोह झाला होता, मात्र त्याने तो वेळीच आवरला. तूर्त तरी खान मंडळी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आहे. कदाचित त्यांनाही कोणीतरी गळ घालून राजकारणात आणेलच, तोही दिवस दूर नाही... 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल