शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
2
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
3
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
4
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
5
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
6
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता
7
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित! जगातील १८.१ कोटी मुलांना सकस आहार मिळेना , युनिसेफचा अहवाल
8
लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव
9
जा, गपचूप बॅटींग कर! अम्पायर नितीन मेनन यांनी भरला मॅथ्यू वेडला दम, Video Viral 
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावा, १४ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम 
11
पाकिस्तानच्या आफ्रिदीनं बुमराहच्या 'लेका'ला काय दिलं होतं खास गिफ्ट? संजनानं केला खुलासा
12
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा
13
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
14
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
15
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
16
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
17
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
18
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
19
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
20
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार

सारांश: शरयूतीरी तिसऱ्या सत्तामंदिराचा पाया?

By shrimant mane | Published: March 31, 2024 12:08 PM

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड व झारखंड ही दहा राज्ये म्हणजे सत्तेचे हृदयस्थान मानला जाणारा हिंदी पट्टा होय. या पट्ट्यात २०१९ मध्ये भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०३ जागा जिंकल्या होत्या तर विरोधकांच्या वाट्याच्या २२ जागा आल्या होत्या. यावेळी काय चित्र राहू शकते, याचा हा थोडक्यात धांडोळा...

- श्रीमंत माने(संपादक, लोकमत, नागपूर)

सत्तेचे हृदयस्थान मानल्या आणाऱ्या हिंदी पट्टबात चंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शरयूतीरी प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराची उभारणी हा भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या सत्तामंदिराचा पाया ठरेल की उत्तर प्रदेश, बिहारमधील जातगणना किंवा 'पीडीए' सारखा प्रयोग राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होईल, याची मोठी उत्सुकता आहे. जातीपाती व धर्माच्या राजकीय भिंती पाडून टाकणारी लाभार्थीची मतपेढी भाजपच्या बाजूने आणि पेपरफुटी, रद्द कराव्या लागलेल्या परीक्षा या रूपातील लाखो बेरोजगारांचा आक्रोश विरोधात, अशी आणखी एक स्पर्धा सोबत आहेच, निम्म्यापेक्षा अधिक लोक हिंदी बोलतात, अशी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड व झारखंड ही दहा राज्ये या टापूत येतात. या राज्यांमध्ये लोकसभेच्या तब्बल २२५ जागा आहेत. २०१९ मध्ये यातील २०३ जागा भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या. विरोधकांच्या वाट्याच्या २२ जागांपैकी पंधरा आगा रालोआ उत्तर प्रदेशात हरली. महागठबंधन बनवून लढलेल्या बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्षाने अनुक्रमे दहा व पाच जागा जिंकल्या, झारखंड व छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन आणि बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात केवळ प्रत्येकी एक अशी हिंदी टापूत काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीला मिळालेल्या जागांची संख्या केवळ सात होती. राजस्थान (२५), हरयाणा (१०), दिल्ली (७), उत्तराखंड (५), हिमाचल प्रदेश (४) या पाच राज्यांमध्ये यूपीएने खातेही उघडले नाही.

हिंदी पट्टयात उत्तर प्रदेश, बिहार व थोड्या प्रमाणात झारखंड वगळता इतरत्र भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई आहे आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यात काँग्रेसचा दारूण पराभव होत आला आहे. अन्यत्र भाजप किंवा काँग्रेसचा खेळ बिघडविणारा तिसरा खेळाडू नाही. उत्तर प्रदेशात सपा-बसपा महागठबंधनाने भाजपला कड़वी झुंज दिल्याने रालोआच्या जागा घटल्या. बसपाला अधिक फायदा झाला. काँग्रेसला केवळ सोनिया गांधी यांची रायबरेली जिंकता आली. अमेठीत राहुल गांधी पराभूत झाले. बिहारमध्येही राजदला खाते उघडता आले नाही.

काय होऊ शकेल या लोकसभा निवडणुकीत?१) छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग काँग्रेसला थोडे अधिक यश मिळवून देईल का? मध्य प्रदेशात गेल्यावेळेची छिंदवाड़ा सोडून आणखी कोणत्या जागी काँग्रेसला यश मिळते का? आणि अशोक गहलोत सचिन पायलट हे दोघे राजस्थानमध्ये यंदा तरी पक्षाला खाते उघडून देतील का?, याकडे देशाचे लक्ष असेल. २)  हेमंत सोरेन वांचीं अटक, चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि शिबू सोरेन यांच्या थोरल्या सूनबाई सीता यांचा भाजपप्रवेश यामुळे झारखंडमध्ये वंदा भाजपपुढील आव्हान तितकेसे कड़वे नसेल. हरयाणात रालोआमध्ये बरीच उलथापालथ झाली आहे. मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला करून लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा डाव भाजपला गेल्यावेळच्या यताची पुनरावृत्ती करून देतो की उमेद वाढलेल्या इंडिया आघाडीला काही जागा मिळतात, हे पाहणे रंजक असेल.

३) हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये गेल्यावेळचा शतप्रतिशत यशाचा अश्वमेध कायम ठेवण्याचा भाजपचा प्रवल राहील. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेले काँग्रेसचे यश मुख्यमंत्र्यांविरोधातील बंडखोरीमुळे झाकोळून गेले आहे. त्याचा भाजपला फायदा होईल.

४) संपूर्ण देशाला उत्कंठा असेल ती दिल्लीची. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दा तिथले भाजपचे गणित बिघडवू शकतो. ते जितके दिवस तुरुंगात राहतील तितका त्यांच्या तसेच मनीष सिसोदिया, संजय सिंह आदींच्या अटकेचा मुद्दा तापत राहील,

तरुण चेहऱ्यांचा बोलबाला- यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टच म्हणजे उत्तर प्रदेश व बिहार या दोन मोठ्या राज्यांमध्ये तीन प्रमुख पक्षांची पुरा वडिलांकडून मुलांच्या हाती आली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर कुटुंबात यादवी माजली. कालांतराने सगळी सूत्रे अखिलेश यांच्या हाती आली. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभठ झाला तरी तो सन्मानजनक होता.- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलात लालूप्रसाद पुन्हा सक्रिय झाले असले तरी पक्षाचा चेहरा तेजस्वी यादव हाच आहे. तिसरा लोक जनशक्त्ती पक्ष. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग व बंधू पशुपती पारस यांच्यातील भाऊबंदकीत भाजपने तात्पुरती व्यवस्था म्हणून पारस यांना जवळ घेत मंत्री बनवले. 'मी मोदीचा हनुमान म्हणणाऱ्या चिराग याना दूर ठेवले. आता पारस यांना बाजूला करून चिरागला सोबत घेतले आहे.

जातगणना व पीडीए फॅक्टर- बिहार व उत्तर प्रदेशात जातगणना हा महत्वाचा फैक्टर आहे. बिहारमध्ये जातगणना झाली खरी; पण मशागर्तीचे पीक कापण्याआधीच महागठबंधन सुटले. नितीश कुमार पुन्हा 'रालोआ मध्ये दाखल झाले. आता जातगणनेचे राजकीय श्रेय घेण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्यात इंडिया आघाडी सरसावली आहे.- उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सतत जातगणनेची मागणी करीत आले आहेत. सत्तेबाहेर असल्यामुळे त्यांना बिहारसारखा निर्णय घेता आला नाही. परंतु, एनडीए शी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी 'पीडीए फॉर्म्युला पुढे आणला. पीडीए हे पिछडे (मागास व ओबीसी), दलित व अल्पसंख्याक यांचे संक्षिप्त रूप. मुलायमसिंह यादव यांच्या 'माय' (एमवाय) म्हणजे मुस्लीम- यादव फॉम्र्युल्याचा हा विस्तार आहे. ग्रसपा सुप्रीमो मायावती भाजपविरुद्ध लडत नाहीत, असा आरोप करीत त्यांची मते आपल्याकडे ओढायची. हा त्यामागील हेतू आहे.- मायावतींनी एकला चलो'चा नारा दिल्यामुळे मतविभाजन अटळ आहे • आणि बहेनजींनी ही भूमिका भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठीच घेतली हा 'इंडिया' आघाडीच्या प्रचाराचा मुख्य धागा आहे.

भाजपला न साधलेला असाही विक्रम- गेल्या दोन्ही निवडणुकीपेक्षा मोठचा यशाचे ध्येय नजरेसमोर ठेवलेल्या भाजपला उत्तर प्रदेशात १९७७ किया ११८४चा विक्रम खुणावत असेल. दोन्हीवेळेस उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचाच भाग होता. लोकसभेच्या ८५ जागा होत्या.- काँग्रेसची देशात एकहाती सत्ता असतानाही जमला नाही, असा अफलातून विक्रम आणीबाणीनंतरच्या १९७७च्या निवडणुकीत भारतीय लोकदलाने सर्व ८५ जागा जिंकून नोंदविला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४च्या निव- डणुकीत काँग्रेसने चारसौं पार विक्रम नोंदविला तरी उत्तर प्रदेशात सर्व जागा जिंकता आल्या नाहीत. पक्षाला ८३ जागा मिळाल्या.

२०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाताने भाजपने जिंकलेल्या ७१ जागा ही तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी, वंदा भाजपच्या हाती सममंदिर उभारणीचा धार्मिक मुद्दा आहे. असा विक्रम साधला गेला तर योगी आदित्यनाथ हे भाजपचा राष्ट्रीय चेहरा ठरतील. त्यासाठीच इंडिया आघाडीतून राष्ट्रीय लोकदल हा पक्ष फोडण्यात आला आणि चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी रालोआत घेण्यात आले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी