शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:03 IST

ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही, याचे कारण काय असावे?

धुर्जती मुखर्जी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक

सक्षम आणि सर्वांना बरोबर घेणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या काळातील, म्हणजेच अमृतकाळातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अलीकडेच एका आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकात लिहिले आहे. याचा अर्थ कदाचित विद्यमान सरकारला माहीत असेल; परंतु या अमृतकाळाचा परिणाम म्हणावा तेवढा दिसत नसल्याने तरुणांना कदाचित तो अर्थ पुरेसा उमगणार नाही; तरुण हा लोकसंख्येतला एक अत्यंत गतिशील आणि चैतन्यपूर्ण घटक असूनही सरकारला त्यांच्या प्रश्नांच्या विविध बाजू दुर्दैवाने समजलेल्या नाहीत, असे युवकांचे नेते आणि सामाजिक विश्लेषणकर्त्यांना वाटते आहे. जगात  तरुणांची जास्त संख्या सध्या भारतात आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १५ ते  २९ वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या लोकसंख्येच्या २७.२ टक्के इतकी आहे. वर्ष २०३६ पर्यंत ती २२.७ टक्के इतकी कमी होईल; तरीही ३४.५ कोटी हा आकडा मोठाच आहे.निवडणूक प्रक्रियेत सर्वसाधारण तरुणांना फारसे स्वारस्य नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट होय. जीडीपी वाढीचे अंदाज काहीही असले तरी ग्रामीण युवकांना शेती किफायतशीर वाटत नाही आणि त्या भागात छोटे रोजगार फारसे उपलब्ध नाहीत. नव्या पिढीत त्यामुळे भ्रमनिरास आणि नैराश्याची स्थिती आहे. खरे तर चालू निवडणुकीत यावर चर्चा होऊ शकली असती; पण नवे सरकार या प्रश्नात लक्ष घालील असे या पिढीला वाटत नाही. भारतातील बेरोजगारीवर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या ताज्या अहवालात देशातल्या एकूण बेरोजगारात ८३ टक्के तरुण असल्याचे दाखवले आहे. ६६ टक्के शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. भारतात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. २३ टक्के या सर्वाधिक प्रमाणात भारत येमेन, इराण, लेबनॉन आणि इतर अशा देशांबरोबर गणला जातो. ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे पुरेसे तरुण नेतृत्व नाही. भावी पिढीचे प्रश्न हे पक्ष प्रामाणिकपणे हाताळत नाहीत. यातून ही उदासीनता आली आहे. राजकीय पक्ष देत असलेली हमी किंवा आश्वासने तरुणांना आकृष्ट करू शकली नाहीत. या आश्वासनांमागचे हेतूही प्रामाणिक नाहीत. तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी मौन राखले असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.‘लॅन्सेट’च्या एका लेखातील आकडेवारीनुसार आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपाविणाऱ्यांत ७५ टक्के पुरुष असतात. त्यातही आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत असलेले तरुण अधिक. १९७८ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण  ६.३ टक्के इतके होते. मागच्या जनगणनेत शहरांची ४४ टक्के वाढ झालेली दिसत असताना हे प्रमाण १२.४ टक्क्यांवर गेले. ग्रामीण भागातील आत्महत्या सहसा नोंदल्याही जात नाहीत.राज्यांनी तसेच केंद्राने पुरस्कारलेल्या योजना ग्रामीण युवकांना आकर्षक वाटत नाहीत, सगळ्या सारख्याच वाटतात. सत्तारूढ पक्ष श्रीमंतांना धार्जिणा आहे, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे देशातील संपत्ती नेमकी कोणाकडे किती आहे, याचे सर्वेक्षण करून पुनर्वाटप करण्याचे आश्वासन पक्षाने दिले. तरुण याचे स्वागत करतील की नाही, हे अनिश्चित आहे. दुसरीकडे कंपन्या अधिकाधिक यंत्रनिर्भर होत असून, नोकर कपातीच्या मागे लागल्या आहेत.देशातील गुणवान  तरुणवर्ग मतदानाचा हक्क बजावण्यास नाखूश का आहे, याचा विचार राजकीय पक्षांना करावाच लागेल. समतोल सामाजिक, आर्थिक विकासात भावी पिढीला सामील करणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर प्रभाव पडेल, त्यांना प्रेरणा मिळेल, असे धोरण हेच यावरचे उत्तर आहे. काही अर्थतज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे बेरोजगारी भत्ता सुरू करण्याचीही गरज आहे. अशा प्रकारचा भत्ता सुरू करण्यासाठी श्रीमंतांवर एखादा टक्का कर लावला तरी चालेल. प्रगत देश होण्याकडे वाटचाल करताना तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान