शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कमी झोपाल, तर संसर्गाचा धोका मोठा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 09:25 IST

आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी ७ वाजता आणि पहाटे ५ वाजता  IL-6 सगळ्यात उच्च पातळीवर असते. झोपेचा परिणाम या रसायनांच्या पातळीवर होतो.

आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पहिल्या फळीत मोनोसाइट, मॅक्रोफाज अशा पेशींचा समावेश असतो. या पेशी आपल्या शरीरामध्ये गस्त घालत असतात. कुठलाही वेगळा जीव (विषाणू / जीवाणू) आढळला तर त्याला नेस्तनाबूत करणे, गिळून टाकणे हे यांचे काम असते. परकीय जीव ओळखण्यासाठी या पेशींच्या पृष्ठभागावर रिसेप्टर असतो.  परका जीव ओळखताच या पेशींमधील  जनुके वेगवेगळ्या प्रकारची रसायने बनवू लागतात.  काही रसायने त्याच भागातील इतर पेशींना सावध करतात तर काही अंतर्दाह (Inflammation) निर्माण करतात. यामुळे त्या भागाचा रक्तपुरवठा वाढतो, नसांवर परिणाम होऊन वेदना झाली की सर्व शरीराचे लक्ष त्या भागाकडे वेधले जाते. अंतर्दाह वाढवण्यात  IL-6 आणि TNF  या दोन रसायनांचा विशेष वाटा असतो.

आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी ७ वाजता आणि पहाटे ५ वाजता  IL-6 सगळ्यात उच्च पातळीवर असते. झोपेचा परिणाम या रसायनांच्या पातळीवर होतो. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून ‘कमी झोपेचे’ परिणाम ही रसायने वाढवण्यामध्ये म्हणजेच पर्यायाने शरीरातील अंतर्दाह अनेक पटीने वाढवण्यामध्ये होतो हे सिद्ध केले आहे.  एखादा माणूस सातत्याने कमी झोप घेत असेल आणि त्याने एक रात्र झोप घेतली नाही, तर त्याच्यामध्ये या रसायनाची पातळी कैक पटींनी वाढलेली आढळते.

कॅरॉल या शास्त्रज्ञाने २०१५ साली वयोमानाचा परिणाम  आणि कमी झोपल्याने झालेला अंतर्दाह याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की पौगंडावस्थेतील मुले (वय १३ ते १८) यांच्यामध्ये कमी झोपेमुळे सर्वाधिक अंतर्दाह निर्माण होतो. कमी झोपेमुळे या पेशी (मोप्नोसाईट) अधिक बहकल्यासारखे करू लागतात म्हणजे कुणी परकीय जीवाणू नसला तरीही ही रसायने स्रवू लागतात. 

तुम्हाला वाटेल, जर या पेशी अधिक रसायने तयार करीत असतील तर त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही का? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. तुम्ही “लांडगा आला रे..” ही गोष्ट ऐकली असेलच. त्या गोष्टीत जसे सारखा लांडगा आला रे असे ओरडल्यामुळे एक प्रकारची गाफीलता येते आणि लांडगा खरेच आल्यावर काही प्रतिसाद मिळत नाही, तसेच शरीरातही होते.कमी झोपेमुळे होणाऱ्या सततच्या अंतर्दाहामुळे जेंव्हा विषाणूंचा हल्ला होतो तेव्हा ऐन वेळेला या रसायनांची फार वाढ होत नाही; म्हणजेच कमी झोपेमुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते!

- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस