शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विशेष लेख - किडनी ट्रान्सप्लांट : कुठे, काय चुकतंय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 05:57 IST

अवयवदानाबाबत गैरसमज, फसवणूक, यंत्रणेचा अभाव आणि बदनामीच्या धास्तीने मागे हटणारे डॉक्टर्स-रुग्णालये असे अनंत अडथळे आहेत!

डॉ. प्रशांत मुळावकर 

अवयव प्रत्यारोपण ही  आधुनिक विज्ञानाची फार महत्त्वाची देणगी. निकामी झालेले अवयव दुरुस्त करणे किंवा तेथे सुदृढ व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपित करण्याची  किमया मानवाने आत्मसात केली आहे. सर्वाधिक यशस्वी प्रत्यारोपण किडनी (मूत्रपिंड) ट्रान्सप्लांट  आहे.  भारतात दरवर्षी एक ते दोन लाख व्यक्तींना किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते. पैकी  फक्त पाच हजार रुग्णांचे किडनी ट्रान्सप्लांट होते.  ९०% किडनी दाता हे जिवंत व्यक्ती असतात. फक्त १०% च मृत दाता असतात. मृत दात्यांकडून अवयवदान व्हावे, यासाठीच्या प्रयत्नात फारसे यश आलेले नाही. रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१९ साली १,५१,११३ लोकांनी अपघातात जीव गमावला. समजा यातील दहा टक्के लोकांनी जरी किडनी दान केली तरी मागणी आणि पुरवठा यातील तूट भरून येऊ शकते; पण तसे होत नाही. अवयवदानाबाबत  जागरुकता नसणे, आरोग्य सेवेवर अविश्वास ही  यामागील महत्त्वाची कारणे! 

पूर्वी जिवंत दात्यामध्ये आई, वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण हेच किडनी दान करू शकत होते. नवीन तरतुदीनुसार आजी, आजोबा आणि नातवंडांचाही समावेश झाला आहे. दोन जवळच्या नातेवाइकांचे  रक्त गट, टिश्यू मॅच होत नाही. त्याकरिता कायद्यामध्ये किडनी अदलाबदल करण्याची सुद्धा तरतूद आहे. रुग्णाबद्दल प्रेम, आपुलकी असलेली व्यक्तीसुद्धा किडनी दान करू शकते. त्यासाठी शासकीय अधिकृतता समितीची पूर्वपरवानगी गरजेची असते. यातील तरतुदींच्या गैरवापराची उदाहरणे सतत समोर येत  असतात.  जिवंत व्यक्ती किडनी दान करते, तेव्हा  संबंधित रुग्णालय व अधिकृतता समिती ओळख पटवण्यासाठी कागदपत्रांची छाननी करते; पण  फिंगर प्रिंट आणि बुबुळ स्कॅन करण्याचे अधिकार रुग्णालयाला नसतात. ते दिल्यास  बऱ्याच गैरप्रकारांना आळा बसू शकतो. गैरप्रकार झाल्यावर किडनी विकणारा व विकत घेणारा यांच्यावर प्रथम कारवाई करणे हाही मार्ग आहे. बऱ्याच वेळा हे लोक मोकाट सुटतात आणि संबंधित डॉक्टर, रुग्णालय, शासकीय अधिकारी अडकतात. त्यामुळे डॉक्टर वर्गात ट्रान्सप्लांटविषयी अनास्था निर्माण होणे, हे मोठ्या चिंतेचे कारण आहे.

जिवंत अथवा मृत किडनीदात्याविषयी  समाजात विशेष आस्था नाही. मृत दात्यांच्या निकटवर्तीयांना  काही शासकीय सवलती देता येतील काय, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे अवयव दानाला प्रोत्साहन मिळून मृत अवयव दात्यांचे प्रमाण वाढू शकते.   जिवंतपणी अवयव दानाचा फॉर्म भरलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास  नातेवाइकांच्या परवानगीशिवाय अवयव काढण्यास कायद्याने परवानगी नसणे ही एक अडचण आहे. प्रगत देशात मृत अवयव दानाच्या परवानगीचे दोन प्रकार आहेत. ‘‘ऑप्ट इन कंसेंट’’मध्ये दात्यांची (जिवंत असतानाची) स्पष्ट संमती लागते.  ही प्रणाली यूके, जर्मनी, नेदरलँड्समध्ये प्रचलित आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बनवतानाच त्या व्यक्तीची स्पष्ट संमती घेतली जाते.  ‘‘ऑप्ट आऊट कंसेंट’’ ही एक गृहीत संमती आहे. यानुसार कुणालाही अवयव दानास नकार देण्याचा अधिकार आहे. तसा नकार दिला नसल्यास मात्र संमती गृहीत  धरली जाते. ऑस्ट्रिया, बेल्जियम, स्लोव्हाकिया आणि लक्झमबर्गमध्ये ही  पद्धत वापरली जाते. भारतात ‘‘ऑप्ट इन कंसेंट’’मध्येही मृताच्या निकटवर्तीयांची लिखित संमती आवश्यक आहे. जिवंत  किडनी दाता परमार्थ भावनेने हे दान करतो, असे गृहीत  धरले जाते. कायदेशीर  अपेक्षाही तीच आहे; परंतु वास्तव तसे नाही. जवळच्या नातेवाइकांमध्ये सुद्धा शेतजमीन/ घर नावावर करणे, मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था, अशी कायद्याच्या चौकटीबाहेरील देवाण-घेवाण होते. अशा जिवंत किडनी दात्याला कायद्याच्या चौकटीतच  नैतिकदृष्ट्या योग्य असा काही मोबदला ठरवणे शक्य आहे काय, यावर बऱ्याच विचारधारा आहेत. जगात किडनीची किंमत ठरवण्याचा अर्थशास्त्रीय प्रयत्नही झाला आहे.  

अर्थात,  आपल्याकडे जिवंत दात्यांना सुविधांपेक्षा अडचणीच जास्त येतात! किडनी दात्याला  मेडिक्लेम पॉलिसी नाकारू नये, असा कायदा आहे. तरीसुद्धा नागपूरमधील एका दात्याला तीन-तीन कंपन्यांनी पॉलिसी दिली नाही. शेवटी  पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यावर त्यांना पॉलिसी मिळाली.ओळख आणि नातेसंबंधांची पडताळणी ही जबाबदारी डॉक्टरांच्या हातातून काढून त्यासाठी  एक स्वतंत्र, जबाबदार, मजबूत यंत्रणा/प्रणाली स्थापन करणे हा गैरप्रकार थांबवण्याचा महत्त्वाचा मार्ग ! खोटी ओळख आणि नातेसंबंधांसंबंधी कोणताही गुन्हा  खपवून न घेता संबंधितांना  क्रूरपणे शिक्षा केली पाहिजे. यात आधी किडनीचे व्यवहार करून, मग पुरेसा आर्थिक लाभ न झाल्यास फसवणुकीची तक्रार करणारेही आलेच! जवळचे नाते वैध धरण्यासाठी  डीएनए फिंगर प्रिंटिंगचा वापर करावा. किडनी देणाऱ्याची व घेणाऱ्याची बायोमेट्रिक ओळख पडताळणीसाठी सशक्त यंत्रणा ही आजची फार निकडीची गरज आहे, हे मात्र खरे! 

(लेखक यूरोलॉजिस्ट, यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे मानद सचिव आहेत) mulawkar.prashant@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरHealth Tipsहेल्थ टिप्स