शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक सिद्धीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 04:48 IST

सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी निवडणूकपूर्व वर्षामध्ये लोकानुनयी अर्थसंकल्पच सादर केला जात असतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. ते दर पाच वर्षांनी घडत असते. त्यामुळे हा अर्थसंकल्प तशा अर्थाने काही वेगळा नाही.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारकडून सादर झालेला अंतरिम अर्थसंकल्प हा निवडणूक सिद्धीसाठीचा संकल्प आहे, मध्यमवर्गीय, नोकरदार, संघटित आणि असंघटित कामगार, शेतकरी, छोटे व्यापारी अशा सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न करून आगामी निवडणुकांसाठीची मतपेरणी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे सातत्याने होत असलेली आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची मागणी एका फटक्यात दुप्पट करून अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीय नोकरदारांना चांगलाच दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे स्टॅण्डर्ड डिडक्शनमध्ये झालेली वाढ, व्याजावरील स्रोतातच करकपातीमध्ये मिळालेली वाढ या बाबींनीही या दिलाशामध्ये वाढ झाली आहे. ग्रॅच्युईटीच्या कमाल मर्यादेमध्ये दुप्पट वाढ करून नोकरदारांना आणखी खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसऱ्या घराच्या खरेदीला करसवलत देऊन रिअल इस्टेटच्या वाढीला हातभार लागला आहे.अलीकडेच काही विधानसभा निवडणुकांमध्ये कॉँग्रेसचा विजय झाल्यानंतर तेथे जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळण्याची अपेक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होती. ती या वेळी फलद्रूप झाली आहे. लहान शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये मदत देण्याची पंतप्रधान किसान योजना, पिकविम्याला मिळालेली आणखी सवलत, पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे दोन टक्के दराने होणारा कर्जपुरवठा अशा विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येसारख्या घटना कमी होण्याला हातभार लागला तर फारच चांगले होणार आहे.असंघटित क्षेत्रामधील कामगारांनाही सरकारने यंदा प्रथमच काहीतरी दिले आहे. याआधी आयुष्मान भारत योजनेद्वारे आरोग्य विमा योजनेचे संरक्षण त्यांना मिळाले होते; आता त्यांच्यासाठी पंतप्रधान श्रमजीवी मानधन योजना तसेच बोनसची घोषणा करण्यात आली आहे. यामागे हा वर्ग आपल्याकडे आकृष्ट करण्याचा मनसुबा असला तरी त्यानिमित्ताने ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा अमलात आणण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. याशिवाय संरक्षण, रेल्वे, दळणवळण, महिला व बालकल्याण अशा विविध विभागांना काही ना काही दिल्याचे दाखविण्यात आले आहे. मनरेगासाठी ६0 हजार कोटी रुपयांची तरतूद करून नवीन रोजगाराच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला आहे. यापैकी काही योजनांची घोषणा ही यापूर्वीच केली गेली आहे. मात्र सर्वसामान्यांची स्मृती ही अल्पकालीन असते अशा गृहीतकावर या योजनांची नव्याने घोषणा करून त्या त्या घटकांना सरकार आपल्याकडे आकर्षित करीत आहे, हे उघड गुपित आहे.मात्र सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी निवडणूकपूर्व वर्षामध्ये लोकानुनयी अर्थसंकल्पच सादर केला जात असतो, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प तशा अर्थाने काही वेगळा नाही. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण हे केवळ विविध योजनांची माहिती आणि त्यासाठी केलेली तरतूद असे असते. मात्र यंदाचे भाषण हे मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेणारेच होते. त्यामुळे लष्करासाठी वन रॅँक वन पेन्शन अथवा गर्भवती महिलांसाठी जाहीर झालेली योजना अशा विविध गोष्टी या नव्यानेच केल्या गेल्या असे भासविले जात आहे. मात्र भारतीय मतदार दूधखुळा नाही, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांनी ठेवणे गरजेचे आहे. कोणतीही संसदीय प्रथा पाळायची नाही, असा संकल्पच बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला दिसतो. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही घोषणा न करण्याचा संसदीय लोकशाहीमध्ये संकेत आहे. पण तोही संकेत मोदी सरकारने पायदळी तुडविला आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९