- अश्वनी कुमार (वरिष्ठ विधिज्ञ, सर्वोच्च न्यायालय; माजी केंद्रीय मंत्री विधि व न्याय)पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरसंदर्भात घेतलेला धाडसी निर्णय बराक ओबामा यांच्या ‘आॅडॅसिटी होप’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या शीर्षकाशी साधर्म्य दाखविणारा आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून दोन केंद्रशासित प्रदेशांत या राज्याची फेररचना केल्याने काश्मिरी जनतेला शांतता लाभेल, वैभवशाली भवितव्य हा त्याचा आधार आहे.वेळेआधी हा निर्णय घेतला किंवा असा निर्णय घेण्याची वेळ आली होती का, या विचाराचे उत्तरही यथावकाश इतिहासच देईल. लोकप्रिय राष्टÑीय भावना आणि एकात्मिक बळाच्या रूपाने उपयोगितेच्या बाजूने हा निर्णय असला तरी घटनात्मक वैधतेच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राजकीयदृष्ट्या हा धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता काय? या मुद्द्यावर निर्णय द्यावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.अनुच्छेद ३७० अस्ताव्यस्त करणे म्हणजे भारतीय संघराज्य रचनेवरील हल्ला होय. काश्मिरी जनतेप्रति आपल्या ऐतिहासिक उत्तरदायित्वासंबंधी सामीलनाम्यातील संहिता उघडपणे नाकारणारा आणि घटनेचे विद्रूपीकरण करणारा होय, असे याचिकाकर्ते आणि जाणकारांचे म्हणणे आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला की, अनुच्छेद ३७० च्या कलम (३) चा वापर घटनात्मक हमीसंदर्भातील महत्त्वाचा गाभा रद्द करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. तेव्हा अशी व्याख्या करणे किंवा अर्थ लावणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे संघराज्य असलेले राष्टÑ आहे. राज्यांचा दर्जा कमी करण्यासाठी सार्वभौम सत्तेचा वापर राज्यांच्या फेररचनेसाठी कधीही करण्यात आलेला नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार जरुरी असताना केंद्र सरकारचा एकतर्फी निर्णय जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी मान्य न करणे, याला मुख्य आक्षेप आहे.जनतेच्या लोकशाहीपूर्ण सहभागातून कायदा करण्यासह विधानसभेच्या अधिकाराचे उल्लंघन आणि घटनात्मक तत्त्वे झुगारणारा हा निर्णय आहे. अमाप कार्यकारी अधिकारापासून रक्षण करणाऱ्या घटनात्मक सहायक अधिकाराचा अनादर करण्यात आला असून, यामुळे घटनेच्या अनुच्छेद १४ चे उल्लंघन झाले आहे, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
काश्मिरींची प्रतिष्ठा आणि स्वत्व पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 06:52 IST
अनुच्छेद ३७० अस्ताव्यस्त करणे म्हणजे भारतीय संघराज्य रचनेवरील हल्ला होय.
काश्मिरींची प्रतिष्ठा आणि स्वत्व पणाला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}