शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

काश्मीरमधील बहुभाषा संमेलनाचे औचित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:31 IST

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले.

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले. त्या काळात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पंजाबी लेखक कवी स्व. गुरुदयाळ सिंग यांनी मराठी संमेलन पंजाबमध्ये होणे ही तर देश जोडण्याची पुन्हा सुरू झालेली प्रक्रिया आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा देश अनेक भाषा, संस्कृती, तसेच जातीधर्मामध्ये विभागला गेला आहे़ त्याच्या विविधतेतील एकता हिच त्याची शक्ती आहे. म्हणूनच भाषा वाचविणे आणि भाषांचा समन्वय निर्माण करणे, ही भूमिका वेळोवेळी अनेक थोरामोठ्यांनी मांडली आहे. साने गुरुजींनी तर आंतरभारतीचे स्वप्न पाहिले होते तेही महाराष्टÑातून. त्यानंतरही गुलजार यांच्यापासून अनेक मान्यवरांनी बहुभाषा संमेलनाची कल्पना मांडली, त्यातूनच प्रतिवर्षी बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय झाला. भाषा वाचवा याच्याऐवजी ती वाढवा, अशी भूमिका घेऊन भाषांचा परिघ अधिक विस्तारित नेण्याच्या उद्देशाने संस्थेकडून घुमान बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषेचा पंजाबी आणि काश्मिरी भाषांच्या सहकार्याने भारतीय भाषांसाठी पुढाकार अशी या संमेलनाची संकल्पना आहे. प्रत्येकाने आपल्या भाषाचा अभिमान बाळगून इतर भाषांचा सन्मान केला पाहिजे. कारण आजही भारताला जोडणारी एकच अशी प्रभावी भाषा नाही. आपल्याला पुन्हा-पुन्हा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर इंग्रजीला विरोध न करता, भारतीय भाषांची जोडणी होणे मात्र आवश्यक आहे. या भावनेतून यंदाचे संमेलन निसर्गाने लटलेल्या कवी, लेखक आणि कलाकारांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या काश्मीरमध्ये होत आहे.

पहिले घुमान बहुभाषा संमेलन पंजाबमध्ये झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कधी-कधी छोट्या वनस्पतीला टिकविण्यासाठी संपूर्ण जंगल टिकण्याची आवश्यकता असते.’ ही भूमिका भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी मांडत असतात. त्यांनी २०१० साली ‘भाषासंगम’ या नावाने अशाच धर्तीवर एक संमेलन बडोदा येथे घेतले होते़ भाषा टिकल्या तरच देशही सामर्थ्यवान, हाच विचार या संमेलनामागचाही असल्यामुळे भाषांच्या संदर्भात भरीव काम ज्या डॉ.गणेश देवी यांनी केले आहे, त्यांनाच या संमेलनाचे अध्यक्ष होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही वारी पुढे निघाली आहे. आता पुढचे संमेलन काश्मीरमध्ये होत आहे. ज्या काश्मीरने कधी काळी भारताचे बौद्धिक नेतृत्व केले होते, तो आज मात्र दहशतवादाने होरपळत आहे. अशा काळात सरहद संस्थेने हे बहुभाषा संमेलन काश्मीरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, प्रशांत तळणीकर, संजय सोनवणी, नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अरुण नेवासकर, तसेच काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. सत्यव्रत शास्त्री, प्रोफेसर रहमान राही, तसेच पद्मश्री सुरजित पाथर, नसीम शफाई यासारखे अनेक साहित्यिक, महत्त्वाचे प्रकाशक आणि नामवंत कवी, तसेच कलावंत या संमेलनात सहभागी होणार आहेत. जम्मू-काश्मीर कल्चरल अकादमी आणि सांस्कृतिक परिषद यांसारख्या संस्थांनाही यात निमंत्रित केले आहे. विविध भाषांतील ३०० ते ४०० लोक यात सहभागी होतील. डॉ. गणेश देवी, तसेच प्राणकिशोर कौल यांच्या मार्गदर्शनासाठी या काश्मीरमधील संमेलनाचे नियोजन सुरू आहे. काश्मीरमध्ये पर्यटकही जात नसताना अथवा दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असताना या संमेलनाचे प्रयोजन काय, असाही प्रश्न विचारला गेला. यापूर्वीही दोन वेळा येथील हिंसाचाराच्या घटनांमुळे हे संमेलन रद्द करण्यात आले होते. मात्र, महाराष्टÑातून आलेल्या लेखक आणि साहित्यिकांनी व्यक्त केली. म्हणूनच या देशाच्या भाषिक ऐक्याची चळवळ आपण विद्येची देवता असे जिचे वर्णन करतो, त्या सरस्वती शारदापीठापासून संस्कृत भाषेचे व्याकरणकार पाणिनी ऋषी, इतिहासकार पंडित कल्हण, तसेच आचार्य अभिनव गुप्त यांच्यामार्फत, संत कवयित्री कल्लेश्वरी, हब्बा खातून आणि गुलाम सय्यद अहमद महजून हे मोतीलाल साकी आणि दिनानाथ साकी यांच्यापर्यंत, काश्मीरची स्वत:ची मोठी अशी साहित्यिक आणि भाषिक परंपरा आहे, जी ऋषिमुनींची आणि पार्वतीची भूमी आहे, असा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो, त्या काश्मीरमध्ये हे बहुभाषा संमेलन होणे म्हणजे, महाराष्टÑ आणि काश्मीरच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा मिळण्यासारखेच आहे.फाळणीच्या काळात देश धार्मिक विद्वेषामध्ये जळत असताना, काश्मीर खोऱ्यात मात्र एकही दंगल अथवा हत्याकांड झाले नाही. तेव्हा महात्मा गांधीना अंधारामध्ये आशेचा किरण केवळ काश्मीरमध्येच दिसत होता. दुर्दैवाने भविष्यात शत्रूच्या डावपेचांना यश मिळाले आणि याच काश्मीर दहशवादाच्या गर्तेत सापडले आहे. अशा काळात तेथील अंधार दूर करण्यासाठी देशभरातील विविध भाषांच्या लोकांनी तिथे यावे, काश्मिरी भाषा, तिचे उर्वरित भारताशी संबंध, काश्मीरच्या प्राचीन परंपरा याबरोबरच भारतीय भाषांच्या भवितव्यावर चर्चा व्हावी, हा संमेलनाचा उद्देश आहे. दारा शुकोह ज्या ठिकाणी विविध धर्म आणि विचारांच्या लोकांना बोलावून संवाद साधत असत, त्या परिमहलमध्ये काश्मिरी साहित्यिक आणि उर्वरित भारतातील साहित्यिकांचा संगम कदाचित काश्मीरमधील भविष्यातील शांततेत नांदी ठरावी, अशी आशा.- संजय नहार,संस्थापक अध्यक्ष सरहद.