शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

नार्जेस मोहम्मदी : ३१ वर्षे तुरुंगात कोंडले, हिंमत कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 09:09 IST

इराणसारख्या देशात राजकीय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत आपल्याला परवडण्यासारखी नाही हे  सांगायची. ही भीती शेवटी खरी ठरली.

५१ वर्षांच्या नार्जेस मोहम्मदी.  इराणमधील  स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध सरकारला खडे बोल सुनावणाऱ्या नार्जेस मोहम्मदी म्हणजे पेटती मशालच. इराण सरकारने त्यांना वर्षानुवर्षं तुरुंगात डांबून ठेवलं पण, तुरुंगाच्या भिंती भेदून बाहेर पडणारा मोहम्मदी यांचा इराण सरकारविरुद्धच्या निषेधाचा आवाज इराणमधील राजवट कोंडू शकली नाही. तुरुंगाच्या भिंतीआड त्यांच्या आयुष्याची ३१  वर्षं गेली. मोहम्मदी  लहान होत्या तेव्हा त्यांची आई त्यांना ‘ मोठं होऊन चुकूनही राजकारणात जाऊ नकोस म्हणून बजावायची. इराणसारख्या देशात राजकीय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत आपल्याला परवडण्यासारखी नाही हे  सांगायची. ही भीती शेवटी खरी ठरली.

 सध्या नार्जेस मोहम्मदी या देशविरोधी प्रचार केल्याच्या गुन्ह्यासाठी तेहरानमधल्या  तुरुंगात  १० वर्षांच्या तुरुंगवासाची  शिक्षा भोगत आहेत.अर्थात, तुरुंगवास आणि वेदनादायी फटके यांना घाबरून शांत बसण्याचा नार्जेस मोहम्मदी यांचा स्वभाव नाही. त्यांना  १६ वर्षांची जुळी मुलं (मुलगा आणि मुलगी) आहेत, त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना वर्षं झालं आहे. गेल्या आठ वर्षांपासून मोहम्मदी यांना आपल्या मुलांच्या डोक्यावरून साधा मायेचा हातही फिरवता आलेला नाही. मोहम्मदी यांचे  ६३ वर्षांचे पती ताघी रहमानी हेदेखील लेखक आणि कार्यकर्ता आहेत. त्यांनी १४ वर्षं तुरुंगात काढली आणि आता आपल्या जुळ्या मुलांसमवेत ते फ्रान्समध्ये निर्वासित म्हणून राहात आहेत.  

इराणमधल्या झांजण शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात मोहम्मदी लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील खानसामे आणि शेतकरी होते तर, आई गृहिणी.  १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीने इराणमधील राजेशाही उलथवून टाकली. त्यानंतर कार्यकर्ते असलेल्या त्यांच्या मामाला आणि त्यांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली. रोज कामं आवरली की मोहम्मदी यांच्या आई टीव्हीसमोर बसून देहदंड झालेल्या कैद्यांची नावं कान देऊन ऐकायची. एका दुपारी टीव्हीवर फाशी दिलेल्या कैद्यांच्या नावात दोन भाच्यांची नावं ऐकली. ती ऐकून त्यांच्या आईने शोक अनावर होऊन जमिनीवर लोळण घेतली. हे सर्व ९ वर्षांची मोहम्मदी पाहात होती. तेव्हाच छोट्याशा मोहम्मदीने इराणमधल्या या देहदंडाच्या शिक्षेविरुद्ध काम करण्याचा निर्धार केला.

आण्विक भौतिकशास्रातून पदवी मिळवलेल्या मोहम्मदी पुढे इंजिनिअर झाल्या. काॅलेजमध्ये असताना त्यांनी विद्यार्थिनींचं संघटन करून त्यांना नागरी हक्कांबाबत जागरूक केलं. काॅलेजमध्ये असतानाच इराणच्या बुद्धिवाद्यांमध्ये महत्त्वाचं नाव असलेल्या ताघी रहमानी यांच्याशी मोहम्मदी यांची ओळख झाली. रहमानी हे इराणमधील तरुणांचे गुप्त वर्ग घ्यायचे.  रहमानी यांच्या वर्गाला मोहमदीही जायच्या. नंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नानंतर ते तेहरानमध्ये राहू लागले. मोहम्मदी यांनी नागरी हक्क, स्त्रियांचे हक्क याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी एक संघटन तयार केलं. या संघटनेच्या माध्यमातून मोहम्मदी  इराणमधील अल्पसंख्याकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायच्या, देहदंडाच्या रांगेत असलेल्या कैद्यांना वाचवण्यासाठी धडपडायच्या. मोहम्मदी यांनी वर्तमानपत्रात सरकारच्या धोरणांविरुद्ध जहाल  लेख लिहिले. त्याची शिक्षा म्हणून सरकारने मोहम्मदी काम करत असलेल्या कंपनीला त्यांना काढून टाकण्याचं फर्मान ठोठावलं. 

इराणमधल्या न्यायालयाने मोहम्मदी यांना आतापर्यंत १३ वेळा तुरुंगवासात पाठवलं आहे. त्या एकूण ३१ वर्षे तुरुंगात राहिल्या.  २०२३ मध्ये त्यांच्यावर आणखी ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या शिक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जवळपास अख्खी हयात तुरुंगात गेल्यानंतरही मोहम्मदी यांनी स्वत:मधील प्रेम,ओलावा, विरोधाची धार आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा आशावाद जिवंत ठेवला आहे. तेहरानच्या इव्हिन प्रिझनमध्ये एक छोटीशी खिडकी आहे. त्या खिडकीतून त्यांना पाऊस, जंगली फुलांनी नटलेले डोंगर  आणि  इराणमधील क्षितिज दिसतं.  हे स्वातंत्र्याचं क्षितिज आपल्याला कायम दिसत राहील, हा मोहम्मदी यांचा विश्वास आहे आणि निर्धारही.

मग जन्म का दिला?मोहम्मदी यांच्या मुलाला आपली आई जे काम करतेय त्याचा अभिमान वाटतो. पण, मुलगी कियाना मात्र आईचा सहवासच नसल्याने वैतागली आहे. तुम्हाला जर आयुष्यभर चळवळ करायची होती तर मग तुम्ही मुलांना जन्म का दिला, अशी तिची तक्रार आहे. वाढदिवस, सुट्या आणि सणाच्या दिवशी मुलांना आपल्या जवळ आपली आई नाही याचा जास्त त्रास होतो, असं ती म्हणते!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीIranइराण