शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘खांदेरी’मुळे वाढणार सामरिक ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 4:24 AM

नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

- कॅप्टन डी.के. शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नौदल (निवृत्त)नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे. खांदेरी पाणबुडी पूर्वी रशियाकडून भारताकडे आली होती. सन १९६७ मध्ये कलवरी, त्यानंतर ६८ मध्ये ६९ मध्ये व ७० मध्ये अशा प्रकारे सलग चार पाणबुड्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात रुजू करण्यात आल्या होत्या. खांदेरी भारतीय नौदलात ६ डिसेंबर १९६८ ला रुजू झाली होती. नौदलात रुजू झालेली ती दुसरी पाणबुडी होती. दिवंगत कमांडर एम.एन. वासुदेवा यांच्या नेतृत्वात सोव्हिएत बंदर रिगा येथे त्याचे हस्तांतरण झाले होते. नौदलामध्ये खांदेरी पाणबुडीने तब्बल २१ वर्षे सेवा बजावली होती. भारतीय नौदलाची ३० वर्षांची पाणबुडी निर्मितीची योजना आहे. त्या अंतर्गत प्रोजेक्ट ७५ मध्ये ६ पाणबुड्या बनवण्यात येत आहेत. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये या पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे.

१७ डिसेंबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलवरी नौदलाच्या ताफ्यात रुजू केली होती. नऊ महिन्यांनंतर खांदेरी ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत येण्याची गरज होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे विलंब झाल्याने २८ सप्टेंबर २०१९ ला ही पाणबुडी सेवेत रुजू होत आहे. ही पाणबुडी अगदी तयार स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोणत्याही मोहिमेवर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ही अत्यंत सायलेंट प्रकारची पाणबुडी आहे. याची बांधणी अत्याधुनिक आहे. माझगाव डॉक शिपमध्ये फ्रान्सच्या नौदल गटासोबत याची निर्मिती केली गेली. देशाच्या नौदलात गरजेपेक्षा पाणबुड्या कमी होत्या. सध्या १४ पाणबुड्या कार्यरत आहेत. कलवरी, खांदेरी या पाणबुड्यांची ताफ्यात भर पडली आहे.
पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सागरी किनाऱ्याचे मोठे संरक्षण याद्वारे केले जाते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब होते. देशाचे नौदल अत्यंत सशक्त आहे. इंडियन ओशिएन विभागात सर्वात ताकदवान भारतीय नौदल आहे. नौदलाच्या पाणबुडी क्षमतेत आणखी वाढ केली जात आहे. अशा प्रकारच्या आणखी एकूण ६ पाणबुड्या ताफ्यात येणार आहेत. ही पाणबुडी जुन्या पाणबुडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. यात वापरण्यात आलेल्या सामग्रीचा दर्जा अत्युत्तम आहे. ही पाणबुडी सेवेत येण्यासाठी काही काळ विलंब झाला. मात्र याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ही पाणबुडी थेट संरक्षणासाठी तैनात करता येईल.
सुरुवातीला ही पाणबुडी मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर नौदल त्याला कारवार किंवा अन्यत्र पाठवू शकेल. मुंबईत तैनात असतानादेखील पूर्ण अरबी समुद्रातील सुरक्षेसाठी या पाणबुडीवर अवलंबून राहता येणे शक्य होणार आहे. एकदा पाण्यात गेल्यानंतर एक महिनाभर ही पाणबुडी पाण्यात राहून आपले काम करू शकेल. या पाणबुडीवर सुमारे ५० जणांचा ताफा कार्यरत राहू शकतो. या पाणबुडीत कार्यरत असलेल्या जवान, अधिकाऱ्यांचा शिधा संपल्यावर त्यांना परत मागे किनाऱ्याकडे यावे लागते. अन्यथा आणखी काही काळदेखील ही पाणबुडी समुद्रात पाण्याखाली राहून सक्षमपणे काम करू शकते.
या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये ऊर्जेसाठी बॅटऱ्या लावलेल्या असतात. सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनंतर या पाणबुडीतून पाइप बाहेर काढून त्याद्वारे ऑक्सिजन आत घेऊन बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. शक्यतो ही कार्यवाही रात्रीच्या वेळी गडद अंधारात केली जाते. कोणालाही पाणबुडी नेमकी कुठे आहे हे कळू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तर दिवसाउजेडी ही पाणबुडी खोल पाण्यामध्ये असते. २०० ते ३०० मीटर पाण्याखाली जाऊन कार्यरत राहण्याची क्षमता या पाणबुडीची आहे. अत्यंत सक्षम अशा या पाणबुडीचे चांगले डिझाइन तयार करण्यात आले आहे.
खांदेरीला देदीप्यमान इतिहासाचा वारसा असल्याने खांदेरीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे व खांदेरीकडून ही अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल यात कोणतीही शंका नाही. १९७१ च्या युद्धामध्ये खांदेरीने पूर्व किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. रशियन बनावटीच्या या फॉक्सट्रोट गटातील या पाणबुडीने देशाच्या सेवेत सुमारे २१ वर्षे उत्तम कामगिरी केली. नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर विशाखापट्टणम येथील आयएनएस वीरबाहूच्या संचालन मैदानात पुढील पिढ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या स्मृती जतन करण्यात आल्या.
नवीन खांदेरी माझगाव डॉक येथील ११८७६ यार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. ७ एप्रिल २००९ रोजी तिच्या निर्मितीस प्रारंभ झाला होता. पाच भागांत ही निर्मितीची प्रक्रिया करण्यात आली व हे पाच भाग नोव्हेंबर २०१६ मध्ये एकत्र करण्यात आले व तिला खांदेरीचे आजचे रूप देण्यात आले. ६७.५ मीटर लांब व १२.३ मीेटर उंच अशा बलाढ्य आकारमानाची ही खांदेरी पुढील काही वर्षे देशाच्या सेवेत कार्यरत राहून विरोधकांना धडकी भरवेल यात शंका नाही.

टॅग्स :indian navyभारतीय नौदल