शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

आमची उंची तुम्ही ठरवणार तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 3:22 AM

गोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले.

-दिलीप तिखिलेगोंधळी सारे नागपुरात गोंधळाला गेले... मुंबईचे विधानभवन कसे शांत शांत झाले. बऱ्याच दिवसांनंतर या संकुलाला अशी शांतता लाभली होती. या नीरव (मोदी नव्हे) शांततेत मग संकुलातील महापुरुषांच्या पुतळ्यांत संवाद सुरू झाला. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, स्वामी रामानंद तीर्थ, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आठ महापुरुषांचे पुतळे विधानभवन परिसरात उभारण्यात आले आहेत. पण हे पुतळे कमी-जास्त उंचीचे का उभारण्यात आले हे आमच्या सर्वसामान्य बुद्धीसाठी अजूनही कोडेच आहे. अर्थात पुतळे उभारताना त्या-त्या वेळचा राजकीय दबाव यासाठी कारणीभूत असू शकतो हे आम्ही आताच्या घडामोडींवरून सांगू शकतो.पण या पुतळ्यांच्या संवादात मात्र या कमी-जास्त उंचीचा, उचनीचतेचा लवलेशही नव्हता. संवादाचा विषय अनायसे ताजाच होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांत प्रचंड खडाजंगी झाली. या वादाने इकडे मुंबईचे पुतळे अस्वस्थ झाले.१६ फुटाचा (यात २१ फुटाची चौथºयाची उंची वेगळी) म.फुलेंचा पुतळा ७.२ फुटाच्या (१०.६ फुटाचा चौथरा वेगळा) शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणाला, शिवबा... अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया तुझ्या पुतळ्याच्या उंचीवरून हा काय वाद चालवला आहे, या लोकांनी? उंची मोजायचीच तर ती कर्तृत्वाची मोजा ना! हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तू... प्रतापगडाजवळ अफजलखानचा वध करायला निघालास तेव्हा त्या धिप्पाड खानाच्या उंचीचा तू विचार केला होतास का? पुण्याच्या लालकिल्ल्यात दीड लाखाची सेना घेऊन डेरा टाकून बसलेल्या शाहिस्तेखानावर निधड्या छातीने वार करून त्याची बोटे छाटली तेव्हा तुझी छाती ५६ इंची होती की आणखी किती, याचे मोजमाप झाले होते का?अरे... आज तुझ्या या ९ फुटी पुतळ्यापुढे बोलताना माझ्या १६ फुटी पुतळ्याला खाली मान घालावी लागते याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या कर्तृत्वाला माझा हा सलाम आहे. पण आपली ही लेकरं म्हणतात, शिवबाचा पुतळा सर्वात लहान का केला. राजकारण आहे हे दुसरे काही नाही.शिवबाच्या पुतळ्याच्या चेहºयावर खिन्नतेचे भाव होते. एवढा वेळ शांत असलेल्या शिवबाने आता मौन सोडले.शिवबा : आतापर्यंत झाले ते झाले... पण, अरबी समुद्रात उभारण्यात येणाºया पुतळ्याबद्दलच माझा आक्षेप आहे. समुद्री जैवविविधतेला हानी पोहचणार असेल, पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर कशाला उभारायचा पुतळा? अडीच हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत म्हणे या माझ्या पुतळ्यावर! शिवाय ३०० कोटी रु. जीएसटी वेगळीच. म्हणजे आमचे पुतळे उभारून सरकार आपली तिजोरीही भरु पाहात आहे. एवढा पैसा मला त्या काळात मिळाला असता तर माझ्या रयतेच्या कल्याणासाठी मी तो खर्च केला असता? एक म्हणतो उंची कमी केली. दुसरा म्हणतो, नाही... उंचावलेल्या तलवारीच्या टोकापासून पायापर्यंत मोजा. . असं वाटते...तीच तलवार उगारून धडा शिकवावा यांना.शिवबाचा संताप सर्वच पुतळ्यांनी ग्राह्य ठरविला. इतर पुतळ्यांच्याही आपआपल्या व्यथा होत्या, त्यांनाही बरंच काही बोलायचे होतं पण मध्येच सुरक्षा रक्षक आले आणि संवाद थांबला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज