शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडले, की पोट दुखलेच !

By शिवाजी पवार | Updated: December 19, 2023 08:39 IST

निर्यातीमधील धरसोड वृत्तीमुळे शेतीत दुप्पट उत्पन्न सोडाच, किमान दरही शेतकऱ्याला मिळत नाही, शिवाय भारत ‘बेभरवशाचा निर्यातदार’ बनला आहे!

- शिवाजी पवार उपसंपादक, लोकमत, अहमदनगरकेंद्र सरकारने २०१८ मध्ये सर्वसमावेशक कृषी निर्यात धोरण आणले. येत्या काही वर्षांत कृषी निर्यात दुपटीने वाढवत ८ लाख कोटी रुपयांवर नेण्याचा उद्देश त्यामागे होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचा दावा केला गेला. केंद्रातील सरकारची ही सर्वांत लोकप्रिय घोषणा होती. याला जोडूनच एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 

सरकार भले काहीही दावा करो, मात्र साखर, तांदूळ, गहू आणि आताच केलेल्या कांदा निर्यातबंदीवरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मे २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकांमुळे शेतमालाचे दर नियंत्रित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाची अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक प्रणालीतून ८० कोटी लोकांना वितरित केल्या जाणाऱ्या रेशनिंगची या निर्यातबंदीला किनार आहे. मात्र, शेतकरी संघटनांना हा तर्क मान्य नाही. सरकारकडे अन्नधान्य आणि साखरेचा बफर साठा आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय व्यापारी धार्जिणा असल्याचा संघटनांचा आरोप आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या शेतमाल निर्यात धोरणावरून डब्ल्यूटीओ आणि अमेरिकेने टीकेची झोड उठवली आहे. भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातबंदीमुळे अनेक देश अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले गेले. जागतिक बाजारपेठेतील तांदळाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या भारताच्या या भूमिकेला अमेरिकेने ‘अनावश्यक’ म्हटले. गव्हाच्या बाबतीतही भारताची तीच गत! रशिया-युक्रेन युद्धाचा लाभ उठवून गव्हाची निर्यात वाढविण्याची संधीही आपण गमावली.  हे करून शेतकऱ्यांच्या खिशात पडू शकणारे जास्तीचे पैसे सरकारने रोखल्याचे शेतकरी संघटनांचे मत आहे. त्यामुळे देशांतर्गत गव्हाचे दर क्विंटलमागे २२७५ रुपयांखाली (एमएसपी) आले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी केंद्राने बी हेवी मोलासिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली होती. कारखानदार आणि शेतकऱ्यांनी त्याचा समाचार घेल्यानंतर ही बंदी अंशतः मागे घेण्यात आली आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. इथेनॉलवर धावणाऱ्या लक्झरी कार आता रस्त्यावर आल्या आहेत. इथेनॉलचे स्वतंत्र पंप सुरू करण्याची केंद्राची योजना होती. शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य यातून उज्ज्वल होण्याची शक्यता या नव्या धोरणाने धूसर झाली आहे.

साखर निर्यात तर ऑक्टोबरपासूनच बंद आहे. ऊसदरावरून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सामना करणाऱ्या कारखानदारांना त्यामुळे हुडहुडी भरली. उसाची उपलब्धता कमी असूनही शेतकऱ्यांना वाढीव दर देण्यात कारखानदार हात आखडता घेतील, हे नक्की. काही कारखानदारांना तर निमित्तच मिळेल.मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या घोषणांखाली आपण कधी दबलो गेलो, हे कळलेच नाही. सोयाबीनसारख्या तेलबियांना चांगले दर मिळतील अन् येत्या काळात शेतकरी भारताची तेलाची गरज भरून काढतील, ही शक्यता मावळली आहे. कारण, सध्या भारत पामतेलाचा जगातील सर्वांत मोठा ग्राहक  बनून बसला आहे.कांद्याची तर कथाच निराळी म्हणावी लागेल. २०२० मध्ये आपण कांदा निर्यातीचे धोरण तब्बल ७ वेळा बदलले होते. २०२३ मध्ये त्याचीच पुनरावृत्ती पहायला मिळाली. कांदा निर्यात बंदीच्या आदेशाची माहिती शेतशिवारात धडकेपर्यंत बाजारभाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी घसरले. राज्यभरातील कांदा उत्पादक रस्त्यांवर उतरले आहेत, यात नवल नाही!

हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे सप्टेंबरमध्ये निधन झाले. त्यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने शेती संकटावर उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी यूपीए-२ पासून होऊ शकलेली नाही. शेतमाल उत्पादनातील बियाणे, कीटकनाशके आदींचा खर्च, कौटुंबिक श्रम, जमीन व इतर स्थावर मालमत्तेची गुंतवणूक या सर्वंकष बाबींचा मेळ घालत एमएसपी देण्याची स्वामीनाथन यांची प्रमुख शिफारस होती. मात्र सध्याची एमएसपी ही केवळ उत्पादनातील बियाणे व कीटकनाशके हे प्रारंभिक खर्च धरूनच (काही अंशी श्रम) दिली जाते, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. त्यासाठी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची संघटनांची तयारी आहे.निर्यातीमधील धरसोड वृत्तीमुळे दुप्पट उत्पन्नाचा विषय लांबच, एमएसपीवरही पाणी सोडण्याचे प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवत आहेत. दुसरीकडे जागतिक पातळीवर ‘अत्यंत बेभरवशाचा निर्यातदार’ अशी आपली प्रतिमा बनत आहे. कांद्यातील भारताचा प्रमुख आयातदार असणाऱ्या बांगलादेशने २०२० पासून तुर्कस्तान व अन्य देशांना दिलेली पसंती, हे त्याचे द्योतक होय!pawarshivaji567@gmail.com

टॅग्स :Farmerशेतकरी