शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

पक्षाबाहेर हाकलत नाहीत, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 05:33 IST

हार्वर्ड विद्यापीठात गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्र शिकवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी बुजुर्ग नेते आहेत. ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेला संवाद! 

डॉ. सुब्रमण्यम स्वामीज्येष्ठ नेते

हार्वर्ड विद्यापीठात गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्र शिकवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी बुजुर्ग नेते आहेत. ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेला संवाद! 

देशाची आर्थिक परिस्थिती सध्या कशी आहे? भारताचे एकंदर देशांतर्गत उत्पन्न २०१५ पासून सातत्याने घसरते आहे. गुंतवणुकीचे प्रमाण कमी होत गेल्याने ते आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. २०२० च्या पहिल्या तिमाहीत कोरोनाकाळात वाढीचा दर ३.१ टक्क्यांपर्यंत खाली आला. छोट्या आणि मध्यम  उद्योगांची स्थिती वाईट आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर कामगार कपातीमुळे बेरोजगारीत वाढ होते आहे. 

..तरीही जीएसटी संकलन वाढते आहे, हे कसे?त्यात काय कठीण आहे? अगदी क्रूरकर्मा गद्दाफीही मजबूत महसूल गोळा करीत असेच की! २०१९ साली मी देशाच्या अर्थव्यवस्थेवर ‘रिसेट’ या नावाचे पुस्तक लिहिले. त्यातले भाकीत खरे ठरले आहे.

अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा एखादा मार्ग आहे काय? अर्थातच आहे. योग्य प्रकारे हाताळली गेल्यास अर्थव्यवस्थेची दिशा नक्की बदलेल. सध्या ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशा घसरणीला फक्त निमित्त हवे असते. श्रीलंकेची अर्थव्यवस्था चहा-तांदळाची निर्यात, तसेच पर्यटनावर अवलंबून होती. तांदळाच्या पिकावर कीटकनाशके वापरू नयेत हा फतवा श्रीलंकेत निमित्त ठरला. सगळे पीक किडीने फस्त केले. लोकांना खायला अन्न उरले नाही आणि त्यांनी सरकारविरुद्ध उठाव केला.

भारतात असे कोणते निमित्त उद्भवू शकते? ते मी कसे सांगणार? २०१६ पासून २०१९ पर्यंत मी पंतप्रधानांना सातत्याने पत्र लिहीत होतो. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शेवटी नाद सोडला. पण तुम्हाला तर पंतप्रधान मोदी यांनीच राज्यसभेवर नियुक्त केले आहे.. मला भाजपाने राज्यसभेवर नियुक्ती दिलेली नाही. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे, हे मी स्पष्ट करतो. भारतीय जनसंघाच्या प्रारंभीच्या नेत्यांमध्ये मी एक होतो. गांधीवादी समाजवाद हे मार्गदर्शक सूत्र घेऊन वाजपेयी आणि अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली, तेव्हा मी जनता पक्षात राहायचे ठरवले. पुढे हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा स्वीकार केल्यानंतर मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करून टाकला.

मग त्यावेळी चूक कुठे झाली? २०१३ मध्ये मला मुंबईतून लोकसभेची जागा लढविण्यास सांगण्यात आले. पण २०१४ साली तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मला नवी दिल्लीतून उभे राहण्याची सूचना केली.  मी नाखुशीनेच तयार झालो; परंतु अगदी ऐनवेळी राजनाथ सिंग यांनी बोलावून घेऊन मला सांगितले की, अरुण जेटली यांनी तुमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. मोदी यांच्यासह सर्वांनी त्या बैठकीत मौन पाळले असेही मला कळले. निवडणुका झाल्यावर सर्वांत आधी तुम्हाला राज्यसभेवर नियुक्ती दिली जाईल असे वचन त्यांनी दिले; परंतु पुढे तेही प्रत्यक्षात आले नाही.

मग तुम्ही काय केले? २०१५ मध्ये मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो. मी आता भाजप सोडत आहे, कुठेही गेलो तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मला पाठिंबा असेल असे मी मोदींना सांगितले. विहिंपचे अध्यक्ष अशोक सिंघल, सरसंघचालक मोहन भागवत यांनी तशाच आशयाचा निरोप मोदी यांना दिला. नंतर मला राज्यसभेवर नियुक्ती देण्यात आली आणि तिही भाजपच्या तिकिटावर नव्हे! मी नामनिर्देशित सदस्य आहे. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत सामील होण्यास त्यांनी मला मज्जावच केला. 

आता भाजप तुम्हाला पुन्हा राज्यसभेत पाठवणार नाही, मग तुम्ही जनता पक्ष पुनरुज्जीवित करणार? नाही. पक्षाबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत मी भाजपमध्येच राहणार आहे.

भारत हिंदू राष्ट्र होऊ शकेल? ते तर अपरिहार्य आहे! ज्यांनी हिंदूंना विरोध केला नाही अशा कोणाहीविरुद्ध हिंदू कधीही नव्हते. पारशी, शीख, बुद्धिस्ट, जैन या सगळ्यांशी हिंदूंचे मधुर संबंध राहिले. भारत हा जगातला एकमेव देश आहे ज्याने ज्यूंचे शिरकाण केले नाही. फाळणीनंतर सांस्कृतिकदृष्ट्या मुस्लिमांनीही हिंदूसारखे व्हावे, अशी अपेक्षा होती. तसे झाले असते तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या; पण हल्ली धर्मनिरपेक्षता ही फॅशनच झाली आहे. घटनेचे ३७० कलम रद्द झाले. राम जन्मभूमी मंदिर पुन्हा उभे राहते आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचेही नवनिर्माण  झाले. हिंदुत्वाचा  आणखी काही

कार्यक्रम अपूर्ण राहिला आहे का? होय. अजून दोन गोष्टी बाकी आहेत. भारतीय भाषांमधील दुवा म्हणून संस्कृतचा वापर करणे आणि दुसरे, जन्माने नव्हे तर कर्माच्या आधारावर वर्ण अधिकृतपणे ठरवणे. म्हणजे उद्योग करणारा वैश्य ठरेल आणि जो शिक्षक असेल तो ब्राह्मण..

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी