शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील दृश्ये कशी चालतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:36 IST

भारूड, शाहिरी जलसा, पोवाडे, नाटक आणि आता प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कलेला निर्बंध असू नयेत टीकेला असावीत. 

- विनायक पात्रुडकर

समाज प्रबोधनासाठी अनेक माध्यमे आहेत. भारूड, शाहिरी जलसा, पोवाडे, नाटक आणि आता प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कलेला निर्बंध असू नयेत टीकेला असावीत. अश्लीलपणाला असावीत. सध्या याउलट परिस्थिती सुरू आहे. निर्बंध कलेला आली आहेत आणि अश्लीलपणा स्वतंत्र झाला आहे. त्यावर कोणी आक्षेप घेत नाही व कोणी विरोधही करत नाही. मात्र अजून न्यायपालिका पारदर्शक असल्याने तिने कलेवर येणा-या निर्बंधांविषयी मोकळेपणाने मत व्यक्त केले आहे. नुसते मत व्यक्त केले नाही तर सेन्सॉर बोर्डाचे वाभाडे काढले आहेत. एका चित्रपटाला परवानगी न मिळाल्याने निर्मात्याने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावरील सुनावणीत न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाचे कान उपटले. तुम्ही ठरवू नका, कोणी काय बघायचे, अशा शब्दात न्यायालयाने बोर्डावर टीका केली. न्यायालयाची टीका योग्यच आहे. कारण कोणी काय बघावे व काय बघू नये हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य घटनेने हा अधिकार दिला आहे. असे असताना एखाद्या चित्रपटाला प्रदर्शनासाठी परवानी न देणे अयोग्यच आहे. याआधीही अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत. कार्टूनिस्ट असिम त्रिवेदीची अटक असो की ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नवीन नाटक संहितेविरोधात केलेली याचिका असो. न्यायालयाने प्रत्येक प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हा झाला न्यायालयीन प्रक्रियेचा भाग. त्याही पलिकडे विचार केला तर सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट असतील ज्यामध्ये चुंबनाचे दृश्य नसेल किंवा अश्लील दृश्य नसतील. प्रबोधनाचे सक्षम माध्यम म्हणून ओळखले जाणा-या चित्रपटात विनाकारण अश्लील दृश्ये दाखवली जातात. ज्याचा कधी कधी कथेशी काहीही संबंध नसतो. 

असले प्रकार सेन्सॉर बोर्डाला कसे चालतात, असा प्रश्न विचारणे वावगे ठरणार नाही. निर्बंध असायलाच हवेत. पण ते कशासाठी व का, याचे स्पष्टीकरण बोर्डाला देता आले पाहिजे. कलेवर निर्बंध आणण्यापेक्षा अश्लीलपणासाठी कठोर नियम करायला हवेत. हिंदीसोबत मराठी चित्रपटांतदेखील अश्लील दृश्यांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाणही कमी करायला हवे. येथे विषय भाषेचा  नाही, पण अनावश्यक गोष्टी टाळायलाच हव्यात. त्यामुळे बोर्डाने कलेवर निर्बंध आणण्याआधी चित्रपटातील बिभत्स वृत्तीकडे लक्ष द्यायला हवे.