शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या ‘जेन झी’चे ‘जेन एक्स’ आई-बाबा किती, का वेगळे होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 07:58 IST

काहीशा सावध, स्वावलंबी ‘जेन एक्स’ला आधी नीट समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांनीच आजच्या जेन झी पिढीला वाढवलेलं आहे.

राही श्रु. ग.

सीनिअर रिसर्च फेलोजवाहरलाल नेहरू विद्यापीठ

‘मला वाटतं या जगात जर देव असेलच तर तो आपल्यापैकी कोणात नसेल. माझ्यात किंवा तुझ्यात तो सापडणार नाही,  आपल्यादरम्यान असलेल्या या जागेत तो सापडेल. या जगात जर कसली जादू असेल तर ती कोणी आपल्याला मनातलं काही सांगत असताना ते समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आहे. कदाचित आपण समोरच्याला कधीच  समजून घेऊ शकणार नाही, म्हणून काय झालं? उत्तर आपल्या प्रयत्नात दडलं आहे.’

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बिफोर सनराईज’ या सिनेमात सेलीन जेसीशी बोलत असते. सेलीन ही फ्रेंच मुलगी आणि जेसी हा अमेरिकन मुलगा रात्रभर व्हिएन्नामध्ये चालत, बोलत राहतात. स्वतःविषयी, एकमेकांविषयी, जगाविषयी. शीतयुद्धानंतरच्या जगात आपलं तारुण्य घालवणारे हे दोघे पक्के पाश्चिमात्य ‘जेन एक्स’चे प्रतिनिधी आहेत. आजच्या मिलेनियल्स आणि जेन झी यांचे हे पालक. उच्चशिक्षित, पण जेमतेम परवडणाऱ्या नोकऱ्या करू शकणारे, आधुनिक जगात वाढणारे पण काहीसे बावरून दिशाहीन वाटू लागलेले, प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल खोलवर विचारात रमणारे सेलीन आणि जेसी यांच्या रोमँटिक जगात आपण हरवून जातो आणि त्यांच्यासोबत रात्रीच्या निःशब्द प्रहरातल्या युरोपियन शहरात अंतर्मुख होऊन जातो.

भारतीय परिप्रेक्ष्यात बेबी बूमर्स आणि जेन एक्स यांच्याच काळात जन्मलेले लोक मात्र जणू वेगळ्या पिढ्यांमधले वाटावेत इतकी वेगळी परिस्थिती आणि विचारप्रक्रिया असलेले आहेत. तरीही या पाश्चात्य ‘जेन एक्स’ला समजून घेतलं पाहिजे. कारण यांनीच आजच्या जेन झीला वाढवलेलं आहे.  १९९०च्या दशकात डग्लस कूपलँड यांच्या  ‘जनरेशन एक्सः टेल्स फॉर ॲन ॲक्सिलरेटेड कल्चर’ या कादंबरीत विशीतल्या अशा तरुणांचं चित्रण होतं जे आर्थिक ताण, सच्च्या नातेसंबंधांचा शोध आणि चंगळवादी बाजारपेठेच्या तिठ्यावर धास्तावून उभे होते. 

१९६५ ते १९८०च्या दरम्यान जन्मलेले लोक हे जेन एक्स.  ही पिढी मोठ्या आर्थिक आणि सांस्कृतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर वाढली. अमेरिकेत ही पहिली पिढी, ज्यांचे आई-वडील दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडू लागले होते. शाळेतून स्वतः कुलूप उघडून घरी येणारी पहिली पिढी असल्याने तिला ‘लॅच की’ जनरेशन असंही म्हणतात. अमेरिकेत या पिढीने आईवडिलांचं विभक्त होणंही पाहिलं. बरेच जेन एक्स तरुण एकल पालकांसोबत वाढले. यांच्या बालपणातून त्यांना स्वावलंबन आणि कल्पकतेचे धडे मिळाले. 

समस्यांमधून व्यावहारिकपणे मार्ग काढण्याचा त्यांचा दृष्टिकोन, कामाबरोबरच आयुष्यातल्या सुखदुःखांसाठी वेळ आणि ऊर्जा देण्याची त्यांची वृत्ती यासाठी ते ओळखले जातात. बूमर्सच्या सरळसोट आशावादापुढे जेन एक्सची जगाकडे पाहायची नजर काहीशी सावध, संशयी वाटते.  ८०च्या दशकातली एड्सची साथ आणि सरकारने ड्रग्सच्या विरोधात उचललेली पावलं या पार्श्वभूमीवर ही पिढी वाढली. राजकीय बाबतीत जेन एक्स हे बूमर्सपेक्षा अधिक उदारमतवादी आणि विविधतेचे समर्थक समजले जातात. अशा पालकांनी वाढवलेली मिलेनियल आणि जेन झी मुलं त्यांच्या जगाविषयीच्या दृष्टिकोनातून बरंच शिकत, स्वतःला घडवत गेली. मोठ्या सामाजिक क्रांतीतून गेलेल्या या जेन एक्सने आजच्या जेन झीकडे पाहताना आपल्या तारुण्याकडे मागे वळून पाहायला हवं.    raheeshrutiganesh@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : How 'Gen X' parents differ from today's 'Gen Z' children?

Web Summary : Gen X, shaped by economic shifts and cultural changes, valued practicality and work-life balance. They raised Millennials and Gen Z with a cautious yet liberal worldview, fostering independence and adaptability in their children.