शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उडती छत्री, जी मालकाला ओलं होऊ देणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 04:54 IST

मातीची घरं असणारे लोक आपलं घर पावसाळ्यात गळणार तर नाही ना, याची काळजी घेतात. 

पावसाळा सुरू झाला किंवा पावसाळ्याच्या उंबरठ्यावर लोकांची लगबग सुरू होते. दुकानदार, त्यातही रस्त्यावरील फेरीवाले आपला माल ओला तर होणार नाही ना, याची काळजी घेतात. त्याची तजवीज आधीच करून ठेवतात. मातीची घरं असणारे लोक आपलं घर पावसाळ्यात गळणार तर नाही ना, याची काळजी घेतात. 

सर्वसामान्य नागरिक गेल्या वर्षाचे आपापले रेनकोट काढून ठेवतात किंवा नवे रेनकोट घेतात. काही नागरिक सर्वात आधी आपली छत्री तपासतात, कुठं ती फाटली तर नाही ना किंवा नवी छत्री घ्यायची आवश्यकता आहे का, हे तपासतात. छत्री खराब झाली असेल तर ती दुरुस्त करून घेतात. पण आता पारंपरिक छत्री घेऊन चालण्याची, ती हातात धरायची आणि पावसापासून वाचायची कसरत करण्याची अनेक लोकांची झंझटच कायमची संपणार आहे!कितीही जोराचा पाऊस असू द्या, हे लोक पावसात बिनधास्त चालत फिरतील. अंगावर ना रेनकोट, ना हातात छत्री! लहान मुलांच्या गोष्टींमध्ये जसा उडता गालिचा असतो, तसा एक उडता गालिचा या व्यक्तींच्या मागोमाग फिरेल आणि त्यांच्या अंगावर पावसाचा थेंबही पडणार नाही याची काळजी घेईल! हो, लहान मुलांच्या गोष्टीतली ही कहाणी नाही, पण हे खरोखर प्रत्यक्षात आलं आहे. 

हाँगकाँगमधल्या एका इंजिनिअरनं उडणारी छत्री बनवली आहे. या इंजिनिअरचं नाव आहे जॉन त्से. त्याने अशी छत्री तयार केली आहे, ज्या छत्रीला हात लावायचीच गरज नाही! या छत्रीचा मालक जसा जाईल आणि जिथे जाईल तिथे ही छत्री आपल्या मालकाच्या डोक्यावर घिरट्या घालत राहते आणि त्याच्यासोबत चालत राहते! 

ही अनोखी छत्री ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात ‘टाइम-ऑफ-फ्लाइट डेप्थ’ कॅमेरा बसवला आहे, जो व्यक्तीचं अंतर आणि लोकेशन मोजतो. ‘रास्पबेरी पाय कॉम्प्युटर’ हा डेटा प्रोसेस करतो आणि फ्लाइट कंट्रोलरला सूचना देतो. त्यानंतर ही छत्री वापरकर्त्याच्या डोक्यावर केंद्रित राहून त्याच्या हालचालींप्रमाणे पुढे-मागे हलत राहते.

खरं तर जॉन त्से यांनी सुरुवातीला हा उपक्रम दोन आठवड्यांचा प्रोजेक्ट म्हणून सुरू केला होता. मात्र यात त्याला अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे हा प्रोजेक्ट अनेक वर्षं चालत राहिला. त्यानं बनवलेला सुरुवातीचं मॉडेल रिमोट कंट्रोलवर चालत होतं, पण आता ही छत्री पूर्णपणे स्वयंचलित आहे.

ही छत्री कस्टम ड्रोन फ्रेमवर आधारलेली आहे, ज्याला फोल्डिंग आर्म्स आहेत. वर सामान्य छत्री बसवलेली आहे, त्यामुळे खाली असलेलं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान दिसत नाही. वापरात नसताना या छत्रीचा आकार ट्रायपॉडएवढा होतो. या छत्रीच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. पण पाऊस कसाही असो, उभा, तिरपा, वेडावाकडा.. ही छत्री आपल्या मालकाला ओलं होऊ देत नाही. जोरदार पावसातही ही छत्री यशस्वीपणे काम करताना दिसली. मुसळधार पावसातही छत्री धरायची झंझट संपल्यानं अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. ही छत्री आपल्यापर्यंत कशी आणि कधी येईल, याची ते प्रतीक्षा करीत आहेत. सर्वसामान्य लोक, शेतकरी, फेरीवाले, विद्यार्थी या छत्रीची प्रतीक्षा करताहेत...

 

English
हिंदी सारांश
Web Title : Flying umbrella keeps owner dry, no hands needed!

Web Summary : Hong Kong engineer creates a drone umbrella that automatically follows its owner, providing hands-free rain protection. Equipped with advanced sensors and a computer, it ensures the user stays dry in any weather, eliminating the need for traditional umbrellas.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीtechnologyतंत्रज्ञानRainपाऊस