-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)प्रिय श्यामराव,२७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नाशिकमध्ये चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने आत्तापासूनच आमचा नातू थेट सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागातून आपल्या गावाकडे आला आहे. इथला क्राउड बघून त्याला खूप लो फिल होत आहे. पण तिकडून येताना त्याने विश्वभरातून खूप सारे 'साहित्य' आणले आहे.
त्या सगळ्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही नक्की या. नातू सांगत होता, नाशिकला कोणीतरी विष्णू वामन शिरवाडकर नावाचे पोएट होऊन गेले. त्यांच्या बर्थडेच्या दिवशी मराठी भाषेचा डे साजरा केला जातो म्हणे... तिकडे लंडनमध्ये फादर्स डे, मदर्स डे, रोझ डे, किस डे असे डे असतात. या सगळ्या डे च्या दिवशी तिकडे वेगवेगळ्या पार्ष्या होतात. तुमच्या मराठी भाषेच्या डे ला कसली पार्टी असते? नेमके कोणते साहित्य लागते? हे लक्षात न आल्यामुळे मी वेगवेगळे साहित्य आणले असे तो सांगत होता.
काही ब्राउन, डार्क ब्राउन कलरचे पाणी असलेल्या बाटल्या आहेत. काही ट्रान्सपरंट, पाण्यासारख्या दिसणाऱ्याही बाटल्या आहेत. तुम्ही सगळे इकडे येता की आम्ही दोघे सगळं साहित्य घेऊन तिकडे यावे..? लगेच इन्फॉर्म करा, सो माय नातू कॅन प्लॅन... मागे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बे एरियात पार पडले होते. त्या संमेलनाच्या आधल्या रात्री असलेल्या वेलकम पार्टीला बे एरियातले सगळे मान्यवर हजर होते. रात्री उशिरापर्यंत पार्टी चालू राहिली.
पार्टीचा माहौल असा काही होता की, त्याचा "अमल' सकाळी उशिरापर्यंत राहिला. त्यामुळे संमेलनाची उद्घाटनाची वेळ बदलावी लागली. सकाळी १० वाजता संमेलन सुरू होणार म्हणून आपल्या मुंबईत राज ठाकरे सकाळीच उठून बसले होते म्हणे... अखेर दुपारी १२च्या सुमारास संमेलन सुरू झाले होते. तुमच्याकडे असे काही होते का? ही आस्किंग मला हां... तिकडे संयोजनाची जबाबदारी तिथल्या नवतरुण साहित्यिकांवर असल्याने त्यांनी दीपप्रज्वलनाऐवजी शाम्पेनचा कॉक उघडून ओपनिंग केले होते.
सगळ्यांनी टाळ्या वाजवत चिअर्स केले होते. तसेच नॉन राइटर पण साहित्य महामंडळाचे तेव्हाचे प्रेसिडेंट असलेल्यांनी पितळेचा तांब्या सोबत आणला होता. त्यांनी लगेच तांब्याभर शॅम्पेन घेतली. परदेशी संमेलनाच्या उद्घाटनाची हृद्य - आठवण म्हणून...
आमच्या नातवाच्या घरी त्यावेळी काही साहित्यिक गेले होते. त्याच्या घरी खूप साऱ्या रंगीत पाण्याच्या बाटल्या खूप साऱ्या रंगीत पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. आमचा नातू किचनमध्ये काहीतरी कुकिंग करत होता... आमच्या फॉरेनच्या सूनबाई कौतुकाने त्याला हाय सनी, व्हॉट आर यू डुइंग.... असे विचारत त्याच्याजवळ गेली. तर तो म्हणाला, ममा, यू नो, आय
अॅम डुइंग स्पेशल डीश् साहित्य. ममा, लिसन का... अरे मी सगळा स टाकला. त्यावर पाणी टाकला. त्यावर स्पॅगेट ओव्हनमध्ये ठेवला... कौतुकाने आमच्या पो सी... महऱ्हाटी संमेलन सनी किती छान मराठ आता तर संमेलन काय ते लवकर कळव सगळे प्लॅनिंग करता र अँड सोयाबॉल्स, फेर्दा व्होडका, बेक्ड झिटी, शिकागो डीप डिश पि सिसिलियन स्क्वेअर 1 साहित्य अॅम डुइंग स्पेशल डीश. वॅट्स कॉल्ड मिस्क साहित्य. ममा, लिसन मी काय केला माहिती हाय का... अरे मी सगळा साहित्य एका भांड्यात टाकला. त्यावर पाणी ओतला, थोडा वाइन पण टाकला. त्यावर स्पॅगेटी टाकला आणि तो भांडा ओव्हनमध्ये ठेवला... ते ऐकून आमची सूनबाई कौतुकाने आमच्या पोराला म्हणाली होती, मॅक्स..., सी... महऱ्हाटी संमेलन घेण्याचा प्रॉफिट... आपला सनी किती छान मराठी बोलत हाय..
आता तर संमेलनच इथे नाशकात होत आहे. काय ते लवकर कळवा म्हणजे आमच्या नातवाला सगळे प्लॅनिंग करता येईल. त्याने येताना स्पॅगेटी अँड सोयाबॉल्स, फेटुचिनी अल्फ्रेडो, पेन्ने अला व्होडका, बेक्ड झिटी, न्यूयॉर्क स्टाइल पिझ्झा, शिकागो डीप डिश पिझ्झा, पेपरोनी पिझ्झा, सिसिलियन स्क्वेअर पिझ्झा या सगळ्यांचे सगळे साहित्य आणले आहे. नाशिकला साहित्य संमेलनात स्टॉल असतात, नसतात ही डोन्ट नो.... तुम्ही देखील सगळे तयारीने या... आपल्या गावाकडे आपापले ग्लास घेऊन येतात तसे इथे घेऊन येऊ नका... नातवाने डिस्पोजेबल ग्लास आणले आहेत. सरकारी पैशाने सगळे पाहुणे जगभरातून येत आहेत. आपण त्यांच्या एन्जॉयमेंटची व्यवस्था करू... संमेलन होत राहील...- तुमचाच बाबूराव
Web Summary : Grandson arrives from the US for Marathi Sammelan, bringing 'special ingredients' for a global feast. Recalling a past event with late-night revelry, he prepares for a unique cultural celebration in Nashik, complete with disposable glasses for all.
Web Summary : पोता मराठी सम्मेलन के लिए अमेरिका से 'विशेष सामग्री' लाया। पिछली रात की पार्टी को याद करते हुए, वह नासिक में एक अनोखे सांस्कृतिक उत्सव की तैयारी कर रहा है, जिसमें सभी के लिए डिस्पोजेबल गिलास भी शामिल हैं।