शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

हातातील शस्त्राने त्याला बनवले माथेफिरू, त्याची हीच शस्त्रे उठली अनेकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:10 IST

लास वेगास शहरात माथेफिरूने घडविलेले मृत्यूचे तांडव ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच अतिशय भयानक घटना म्हणता येईल.

शस्त्रे जीवावर उठतीलास वेगास शहरात माथेफिरूने घडविलेले मृत्यूचे तांडव ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच अतिशय भयानक घटना म्हणता येईल. याआधी अमेरिकेच्या टिष्ट्वन टॉवरवर हल्ला झाला होता. ते अतिरेक्यांचे कृत्य होते. लास वेगासमध्ये अंदाधुंद गोळीबार करणारा ६४ वर्षे वयाचा स्टीफन पॅडॉक हा एक गॅम्बलर, म्हणजे जुगारी होता. पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. हा हल्ला आपण घडवून आणल्याचे इसिसने जाहीर केले असले तरी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी ती शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. पॅडॉक हा दहशतवादी नव्हता, असा त्यांचा दावा आहे. तरीही त्याने क्रौर्याची जी परिसीमा गाठली ती अर्थातच दहशत निर्माण करणारी होती. एकटा इसम २३ शस्त्रे घेऊन एका हॉटेलात राहतो आणि आपल्या रुममधून कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार करतो, हा प्रकार भयानकच आहे. एकट्याने हल्ला करायचा आणि स्वत:ला संपवून घ्यायचे ही ‘लोन वुल्फ’ अटॅक थिअरी दहशतवादी संघटना वापरत असतात. त्यामुळे पॅडॉकने घडविलेले मृत्यूचे तांडव दहशवादी कृत्य नव्हते, याबाबत जोपर्यंत पूर्ण सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत ठामपणे सांगता येणार नाही. पण या भीषण धक्क्यातून बाहेर यायला लोकांना बराच काळ लागेल आणि ही चौकशीही अनेक दिवस चालेल. त्या इसमाने हल्ला का केला, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याच्या रुममध्ये पोहोचले, तेव्हा तो मृतावस्थेत होता. त्यामुळे तपासात अडचणी येतील. पण या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखादा इसम तब्बल २३ शस्त्रे घेऊन हॉटेलात येतो, राहतो आणि तरी सुरक्षा यंत्रणा गाफिल असतात, हे गंभीर आहे शिवाय एखादा इसम इतकी शस्त्रे विकत घेईपर्यंत अमेरिकेतील तपास व पोलीस यंत्रणांना कल्पनाही नसते, ही तेथील सुरक्षा व्यवस्थेतील मोठीच चूक म्हणायला हवी. अमेरिकेतील सुरक्षा व तपास यंत्रणांचे जगभर कौतुक होत असते. पण १६ वर्षांपूर्वीचा अतिरेकी हल्ला आणि आता माथेफिरूचे कृत्य याबाबत त्या पूर्णपणे अंधारात होत्या. त्यामुळे या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानिमित्ताने अमेरिकेमध्ये खुलेआम शस्त्रे विकली जातात आणि ती घेणाºयांची संख्याही प्रचंड आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेतील प्रत्येक १00 लोकांपैकी ८८ जणांकडे शस्त्रे असतात. अन्य देशांमध्ये शस्त्रे बाळगणाºयांचे प्रमाण लोकसंख्येच्या जेमतेम ५ ते १0 टक्के आहे. अमेरिकेत शस्त्रे बाळगण्याची वा विकत घेण्याची जी कारण आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे असुरक्षितता. दुसरे कारण म्हणजे आपण कार, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन घेतो, तसे तिथे शस्त्रांची खरेदी केली जाते. शिवाय ती सहजपणे मिळतात. लास वेगाससारखा प्रकार घडला की, शस्त्रांवर निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी होते. आताही तशी मागणी तेथील सिनेट सदस्यांनी केली आहे. पण असे निर्बंध तिथे घातले जात नाहीत. त्याचे कारण म्हणजे शस्त्र उत्पादक व विक्रेते यांच्या लॉबीचा दबाव. दरवर्षी ३0 हजार अमेरिकन गोळीबारात मरण पावतात. त्यापैकी २0 हजार लोक स्वत:वर आपल्याच बंदुकीने गोळी झाडून घेतात आणि १0 हजार लोक इतरांच्या गोळीबारात मरतात. तिथे दरवर्षी साधारणपणे एक लाख लोकांवर गोळीबार होतो. हातात शस्त्र असणारा इसम कोणत्या क्षणी कसा वागेल आणि काय करेल, हे सांगता येत नाही, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे असते. लास वेगासमधील स्टीफन पॅडॉक याच्याकडे शस्त्रे नसती आणि तो कोणत्याही कारणांमुळे संतापला असता, तरी त्याला राग गिळावा लागला असता. पण हातातील शस्त्राने त्याला माथेफिरू बनवले. त्याची हीच शस्त्रे अनेकांच्या जीवावर उठली.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद