हातातील शस्त्राने त्याला बनवले माथेफिरू, त्याची हीच शस्त्रे उठली अनेकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:10 IST2017-10-04T03:09:06+5:302017-10-04T03:10:28+5:30

लास वेगास शहरात माथेफिरूने घडविलेले मृत्यूचे तांडव ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच अतिशय भयानक घटना म्हणता येईल.

Hand weapons make him mothafiru. This same weapon arose on the life of many | हातातील शस्त्राने त्याला बनवले माथेफिरू, त्याची हीच शस्त्रे उठली अनेकांच्या जीवावर

हातातील शस्त्राने त्याला बनवले माथेफिरू, त्याची हीच शस्त्रे उठली अनेकांच्या जीवावर


शस्त्रे जीवावर उठती
लास वेगास शहरात माथेफिरूने घडविलेले मृत्यूचे तांडव ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच अतिशय भयानक घटना म्हणता येईल. याआधी अमेरिकेच्या टिष्ट्वन टॉवरवर हल्ला झाला होता. ते अतिरेक्यांचे कृत्य होते. लास वेगासमध्ये अंदाधुंद गोळीबार करणारा ६४ वर्षे वयाचा स्टीफन पॅडॉक हा एक गॅम्बलर, म्हणजे जुगारी होता. पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. हा हल्ला आपण घडवून आणल्याचे इसिसने जाहीर केले असले तरी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी ती शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. पॅडॉक हा दहशतवादी नव्हता, असा त्यांचा दावा आहे. तरीही त्याने क्रौर्याची जी परिसीमा गाठली ती अर्थातच दहशत निर्माण करणारी होती. एकटा इसम २३ शस्त्रे घेऊन एका हॉटेलात राहतो आणि आपल्या रुममधून कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार करतो, हा प्रकार भयानकच आहे. एकट्याने हल्ला करायचा आणि स्वत:ला संपवून घ्यायचे ही ‘लोन वुल्फ’ अटॅक थिअरी दहशतवादी संघटना वापरत असतात. त्यामुळे पॅडॉकने घडविलेले मृत्यूचे तांडव दहशवादी कृत्य नव्हते, याबाबत जोपर्यंत पूर्ण सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत ठामपणे सांगता येणार नाही. पण या भीषण धक्क्यातून बाहेर यायला लोकांना बराच काळ लागेल आणि ही चौकशीही अनेक दिवस चालेल. त्या इसमाने हल्ला का केला, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याच्या रुममध्ये पोहोचले, तेव्हा तो मृतावस्थेत होता. त्यामुळे तपासात अडचणी येतील. पण या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखादा इसम तब्बल २३ शस्त्रे घेऊन हॉटेलात येतो, राहतो आणि तरी सुरक्षा यंत्रणा गाफिल असतात, हे गंभीर आहे शिवाय एखादा इसम इतकी शस्त्रे विकत घेईपर्यंत अमेरिकेतील तपास व पोलीस यंत्रणांना कल्पनाही नसते, ही तेथील सुरक्षा व्यवस्थेतील मोठीच चूक म्हणायला हवी. अमेरिकेतील सुरक्षा व तपास यंत्रणांचे जगभर कौतुक होत असते. पण १६ वर्षांपूर्वीचा अतिरेकी हल्ला आणि आता माथेफिरूचे कृत्य याबाबत त्या पूर्णपणे अंधारात होत्या. त्यामुळे या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानिमित्ताने अमेरिकेमध्ये खुलेआम शस्त्रे विकली जातात आणि ती घेणाºयांची संख्याही प्रचंड आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेतील प्रत्येक १00 लोकांपैकी ८८ जणांकडे शस्त्रे असतात. अन्य देशांमध्ये शस्त्रे बाळगणाºयांचे प्रमाण लोकसंख्येच्या जेमतेम ५ ते १0 टक्के आहे. अमेरिकेत शस्त्रे बाळगण्याची वा विकत घेण्याची जी कारण आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे असुरक्षितता. दुसरे कारण म्हणजे आपण कार, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन घेतो, तसे तिथे शस्त्रांची खरेदी केली जाते. शिवाय ती सहजपणे मिळतात. लास वेगाससारखा प्रकार घडला की, शस्त्रांवर निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी होते. आताही तशी मागणी तेथील सिनेट सदस्यांनी केली आहे. पण असे निर्बंध तिथे घातले जात नाहीत. त्याचे कारण म्हणजे शस्त्र उत्पादक व विक्रेते यांच्या लॉबीचा दबाव. दरवर्षी ३0 हजार अमेरिकन गोळीबारात मरण पावतात. त्यापैकी २0 हजार लोक स्वत:वर आपल्याच बंदुकीने गोळी झाडून घेतात आणि १0 हजार लोक इतरांच्या गोळीबारात मरतात. तिथे दरवर्षी साधारणपणे एक लाख लोकांवर गोळीबार होतो. हातात शस्त्र असणारा इसम कोणत्या क्षणी कसा वागेल आणि काय करेल, हे सांगता येत नाही, असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे असते. लास वेगासमधील स्टीफन पॅडॉक याच्याकडे शस्त्रे नसती आणि तो कोणत्याही कारणांमुळे संतापला असता, तरी त्याला राग गिळावा लागला असता. पण हातातील शस्त्राने त्याला माथेफिरू बनवले. त्याची हीच शस्त्रे अनेकांच्या जीवावर उठली.

Web Title: Hand weapons make him mothafiru. This same weapon arose on the life of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.