शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अस्मानी संकटांवेळी शेतकऱ्यांप्रती सरकारी असंवेदनशीलतेचाच प्रत्यय!

By किरण अग्रवाल | Published: April 18, 2019 8:53 AM

नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? Government's insensitivity about known problems of farmers

 

- किरण अग्रवालअजाणतेपणातून जेव्हा एखाद्या बाबीकडे दुर्लक्ष घडून येते तेव्हा ते समजून घेता यावे, मात्र विषयाचे महत्त्व, त्याची गंभीरता व त्यासंबंधीच्या दुर्लक्षातून होऊ शकणारे परिणाम हे सारे माहीत असतानाही त्याकडे काणाडोळाच केला जाताना दिसून येतो, तेव्हा ती बाब व्यक्ती असो की यंत्रणा; तिची असंवेदनशीलताच अधोरेखित करून देणारी ठरते. निवडणुकीच्या धामधुमीत घडून आलेल्या शेतकरी आत्महत्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, या शेती व शेतकऱ्यांशी संबंधित दोन्ही विषयांकडे झालेल्या शासनाच्या दुर्लक्षाकडेही त्याच संदर्भाने बघता यावे.सध्या देशाच्या व राज्याच्याही सत्तेत असलेला पक्ष व त्याचे नेते विरोधकाच्या भूमिकेत होते, तेव्हा शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर त्यांनी चांगलेच रान पेटवले होते. परंतु ते सत्ताधारी बनल्यावरही या आत्महत्या थांबू शकलेल्या नाहीत. किंबहुना त्यांचे प्रमाण वाढलेच आहे. दुर्दैव असे की, एकीकडे निसर्गाने अडचणीत आणून ठेवल्याने हताश व निराश झालेल्या बळीराजाला सरकारकडूनही मदतीचा, सहानुभूतीचा हात मिळेनासा अगर विश्वास वाटेनासा झाल्याने तो गळफास घेण्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहे. सरकार नावाची मठ्ठ यंत्रणा मात्र जागची हलून संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही. याबाबत लोकांमध्ये चीड का उत्पन्न होते किंवा राग का व्यक्त केला जातो, तर अस्मानी संकट थोपवणे आपल्या हातातील बाब नाही; पण हे वा असे संकट ओढवल्यानंतर सत्ताधाऱ्यांचाही ‘सुल्तानीपणा’च अनुभवास येतो म्हणून. साधे बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसायला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून लढ म्हणायलाही सत्ताधा-यांकडे वेळ नसावा, हे खेदजनक आहे.सध्या तर सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आपल्याकडे आचारसंहितेचा बाऊ करून कामचुकारपणा करण्याची प्रवृत्ती तर यंत्रणेत अशी काही बळावली आहे की विचारू नका. त्यामुळे आत्महत्या घडल्या काय किंवा अवकाळी गारपिटीने शेतपिके उद्ध्वस्त झाली काय, त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातीलच आकडेवारी पाहिली तर निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत तब्बल १७४ शेतकºयांच्या आत्महत्या घडून आल्या आहेत. यातील सर्वाधिक ९१ आत्महत्या या दुष्काळाचा चटका सोसत असलेल्या मराठवाड्यातील आहेत. त्यानंतर विदर्भाचा (४९) नंबर लागतो. पण सत्ताधारीच काय, सारेच नेते आपापल्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तिकीट न मिळाल्याने रुसलेल्या-फुगलेल्यांच्या घरी धावत जाऊन त्यांच्या दाढ्या धरायला नेत्यांना वेळ आहे; पण आत्महत्या केलेल्याच्या घरी जाऊन संबंधित कुटुंबीयांचे साधे सांत्वन करताना कुणी दिसून आलेले नाही.महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये तेथील शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले गेल्याने त्याचाच फटका मोठ्या प्रमाणात बसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा सारेच जण बळीराजासाठीचा कळवळा प्रदर्शित निवडणूक प्रचारात उतरलेले आहेत; पण या दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबतही तातडीने दखल घेतली गेलेली दिसून आली नाही. अवकाळी पावसामुळे देशभरात ५० जणांचा बळी गेला त्यांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून मदत घोषित केली गेली; परंतु जागोजागी अनेक घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, संसार उघड्यावर आले त्याचप्रमाणे शेतमालाचेही मोठे नुकसान झाले. खळ्यात व चाळीत साठवलेला कांदा भिजला, द्राक्षाच्या बागा भुईसपाट झाल्या, गहू, हरभराही भिजला. पण वरून आदेश न आल्याने स्थानिक शासकीय यंत्रणेने अद्याप या नुकसानीचे पंचनामे करण्याची तसदी घेतलेली नाही. वरून आदेशही कधी येणार व कोण देणार? नेते प्रचारात आहेत तर मंत्रालयीन अधिकारी निवांत आहेत. याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय? बळी पडलेल्यांच्या कुटुंबाला साहाय्यता निधी घोषित केला गेला; परंतु उघड्यावर आलेल्या कुटुंबाचे काय? त्याची साधी विचारपूसही कुणी करताना दिसत नाही. चीड आणणारेच हे चित्र आहे.   

टॅग्स :Nashikनाशिक